ख्रिस्ती जीवन
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा या पुस्तिकेचा तुम्ही फायदा करून घेत आहात का?
तुम्ही दररोज न चुकता दैनिक वचनाचं वाचन करता का? नाही, तर याची आतापासूनच सवय लावण्याचा प्रयत्न करा? बरेच जण सकाळीच दैनिक वचन वाचून दिवसाची सुरुवात करतात. त्यामुळे मग दिवसभराची कामं करत असताना त्यावर विचार करायला त्यांना वेळ मिळतो. (यहो १:८; स्तो ११९:९७) पण दैनिक वचनात दिलेल्या शास्त्रवचनाचा आणखी फायदा व्हावा म्हणून तुम्ही काय करू शकता? वचनाचा संदर्भ लक्षात यावा म्हणून बायबलमधून त्याच्या मागची आणि पुढची वचनं वाचा. मग त्या वचनात दिलेलं तत्त्व कोणत्या बायबल अहवालात दिसून येतं ते आठवण्याचा प्रयत्न करा. आता ते तत्त्व स्वतःच्या जीवनात कसं लागू करता येईल याचा विचार करा. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाला तुमच्या जीवनावर परिणाम करू देता, तेव्हा तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल आणि त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल.—स्तो ११९:१०५.
जगभरातल्या बेथेल कुटुंबामध्ये सकाळच्या नाष्ट्याच्या वेळीच दैनिक वचनावर चर्चा केली जाते. आणि अलिकडच्या काळात तर त्यातल्या काही चर्चा तुम्हाला JW ब्रॉडकास्टींगवर PROGRAMS AND EVENTS या विभागात पाहायला मिळतात. तुम्ही यापैकी एखादी चर्चा कधी पाहिली आहे का? तुम्हाला हवी असणारी माहितीच कदाचित त्यात दिलेली असेल. उदाहरणार्थ, निर्णय घेत असताना लोटचा अहवाल तुम्हाला कशी मदत करू शकतो, याचा विचार करा.
जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका (१यो २:१५) हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
सकाळच्या उपासनेच्या या कार्यक्रमात कोणत्या बायबल तत्त्वावर चर्चा करण्यात आली आहे?
जग आणि त्यातल्या गोष्टींवर प्रेम करण्याच्या धोक्याबद्दल लोटचा अहवाल आपल्याला कशा प्रकारे सावध करतो?—उत्प १३:१२; १४:१२; १९:३, १२, १३, २४-२६
आपण जग आणि त्यातल्या गोष्टींवर नाही तर यहोवावर प्रेम करतो हे कसं दाखवू शकतो?
देवाच्या वचनाची मला खरंच कदर आहे हे मी कसं दाखवून देऊ शकतो?