व्यावहारिक कौटुंबिक आराखडा तयार करा
१ डोंगरावरील प्रवचनात, येशूने आपल्या श्रोत्यांना असे आर्जवले: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.” (तिरपे वळण आमचे.) (मत्त. ६:३३) आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिले जाईल अशाप्रकारे कुटुंबाच्या कार्यांची योजना करण्याचा एक व्यावहारिक मार्ग म्हणजे, एक लेखी आराखडा तयार करणे. या पुरवणीच्या पान ६ वरील रिकाम्या आराखड्याचा उपयोग करून, तुमच्या आठवड्याचा कौटुंबिक आराखडा तयार करण्यासाठी वेळ काढा. कौटुंबिक उपक्रम म्हणून तुम्ही खाली दिलेली कात्रणे काढून आराखड्यातील रकान्यात चिकटवू शकता. किंवा तुमची इच्छा असल्यास आराखड्यावर त्या त्या रकान्यात, कोणती कार्ये करायची आहेत हे लिहू शकता.
२ खाली दिलेल्या नमुना आराखड्यानुसार तुम्हाला तुमचा आराखडा तयार करता येईल. तुम्हाला दिसून येईल, की यात चार मूलभूत कार्यांचा समावेश होतो: (१) मंडळीच्या सभांना उपस्थित राहणे, (२) कुटुंब मिळून क्षेत्र सेवेत जाणे, (३) कौटुंबिक अभ्यास आणि (४) दैनिक वचनाची चर्चा. या चारही गोष्टींचा आपल्या आराखड्यात समावेश केल्याने तुम्हाला “जे श्रेष्ठ ते” अर्थात जे अधिक महत्त्वाचे आहे त्याची खात्री करण्यास मदत होईल. (फिलिप्पै. १:१०) या चार मुद्द्यांवर अधिक सूचना पान ४-५ वर आहेत.
३ तुमच्या कौटुंबिक आराखड्यात केवळ या चार गोष्टीच असू नयेत. जर तुम्ही कुटुंब यानात्याने काही सभांची एकत्र मिळून तयारी करत असाल तर ते तुमच्या आराखड्यावर लिहा. दैनिक वचन वाचल्यानंतर किंवा इतर वेळी तुम्ही सोबत मिळून बायबलचा भाग वाचत असाल तर तेही आराखड्यावर लिहा. तुम्ही कुटुंब मिळून विशिष्ट वेळी काही मनोरंजन करत असाल तर तेही आराखड्यावर लिहायला हरकत नाही.
४ घरातील सर्वांच्या गरजा आणि परिस्थितीनुरूप कौटुंबिक आराखडा तयार करा. या आराखड्यानुसार सर्व काही सुरळीत चालले आहे की नाही ते वेळोवेळी तपासून पाहा आणि आवश्यक ते फेरबदल करा.
[३ पानांवरील चार्ट]
कौटुंबिक आराखड्याचा नमुना
सकाळ दुपार संध्याकाळ
रवि. दैनिक वचन
जाहीर भाषण आणि
टेहळणी बुरूज अभ्यास
सोम. दैनिक वचन कौटुंबिक अभ्यास
मंगळ. दैनिक वचन मंडळीचा पुस्तक
अभ्यास
बुध. दैनिक वचन
गुरू. दैनिक वचन ईश्वरशासित सेवा
प्रशाला आणि
सेवा सभा
शुक्र. दैनिक वचन
शनि. दैनिक वचन
कौटुंबिक क्षेत्र सेवा
(नियतकालिक दिन)
[६ पानांवरील चार्ट]
कौटुंबिक आराखडा
सकाळ दुपार संध्याकाळ
रवि.
सोम.
मंगळ.
बुध.
गुरू.
शुक्र.
शनि.
.................................................................
दैनिक दैनिक दैनिक दैनिक दैनिक दैनिक दैनिक
वचन वचन वचन वचन वचन वचन वचन
जाहीर ईश्वरशासित मंडळीचा कौटुंबिक कौटुंबिक कौटुंबिक कौटुंबिक
भाषण सेवा पुस्तक अभ्यास क्षेत्र बायबल मनोरंजन
आणि प्रशाला अभ्यास सेवा वाचन
टेहळणी आणि
बुरूज सेवा
अभ्यास सभा