पुन्हा साक्ष मिळण्यासाठी त्यांना मदत करा
१ सुवार्तेचा प्रचार करत असताना आपल्याला बहुतेकदा आपल्या क्षेत्रात न राहणारे लोक भेटतात किंवा दुसरी भाषा अथवा संकेत भाषा बोलणारे लोक भेटतात. किंवा कधीकधी आपण ज्यांच्याबरोबर बायबलच्या विषयांवर अनेकदा चर्चा करू शकलो होतो असे लोक आपल्या क्षेत्रातून दुसरीकडे राहायला जातात. अशा लोकांना पुन्हा साक्ष मिळण्याकरता आपण काय व्यवस्था करू शकतो? कृपया पुनर्भेट द्या (S-43) हा फॉर्म आपण भरू शकतो.
२ लोकांना आपल्या मातृभाषेत सुवार्ता ऐकायला मिळाल्यावर ते अधिक लक्षपूर्वक ऐकतात. (प्रे. कृत्ये २२:१, २) यास्तव, आपण जेव्हा दुसरी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला भेटतो तेव्हा, त्या व्यक्तीने राज्य संदेशात आस्था दाखवली नसली तरीसुद्धा हा फॉर्म भरला पाहिजे. परंतु, परकी भाषा बोलणाऱ्या लोकांचा मोठा समाज असेल व त्याला त्याच्या भाषेत नियमितरीत्या साक्ष मिळत असेल, तर अशावेळी ती भाषा बोलणाऱ्या एखाद्या व्यक्तीने आस्था दाखवली तरच हा फॉर्म भरावा, अन्यथा गरज नाही.
३ फॉर्म भरणे: व्यवहारचातुर्याचा उपयोग करून त्या व्यक्तीचे नाव, तिचा पत्ता आणि तिचा फोन नंबर मिळवा. त्या व्यक्तिला किती आस्था आहे, तिला कधी भेटता येईल, तिला कोणते प्रकाशन देण्यात आले होते, किंवा तिने मागितले होते, तिला कोणती भाषा चांगल्याप्रकारे अवगत आहे हे सर्व त्या फॉर्मवर लिहा. फॉर्म भरल्यानंतर तो मंडळीच्या सचिवांना द्या; मंडळीचे सचिव मग योग्य मंडळीला अथवा गटाला तो पाठवतील.
४ फॉर्म पाठवणे: हा फॉर्म कोणत्या मंडळीला किंवा गटाला पाठवला पाहिजे हे सचिवांना माहीत नसेल किंवा त्यांच्याजवळ पत्ता नसेल तर ते आवश्यक माहिती प्राप्त करण्यासाठी शाखा दफ्तरातील क्षेत्र विभागाला (टेरीटरी डेस्क) फोन करू शकतात. आता पूर्वीप्रमाणे, फॉर्म पाठवताना शहर पर्यवेक्षकांना (सिटी ओव्हरसियर) कळवण्याची गरज नाही.
५ एका मंडळीला किंवा एखाद्या गटाला, कृपया पुनर्भेट द्या हा पूर्णपणे भरलेला फॉर्म मिळतो तेव्हा, त्या व्यक्तीला होता होईल तितक्या लवकर भेटण्याची व्यवस्था करण्यात यावी. आपण आपले काम तत्परतेने केल्यावर, यहोवा “सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी योग्य मनोवृत्ती बाळगणाऱ्या” लोकांचे अंतःकरण उघडेल, ही खात्री आपण बाळगू शकतो.—प्रे. कृत्ये १३:४८, NW.