वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०५ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००५
आमची राज्य सेवा—२००५
km २/०५ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता फेब्रुवारी: यहोवाच्या जवळ या हे पुस्तक सादर करावे. ज्या मंडळ्यांकडे हे पुस्तक नाही त्या पर्यायी सादरता म्हणून निर्मिती (इंग्रजी) हे पुस्तक किंवा प्रकटीकरणाचा कळस हे पुस्तक सादर करू शकतात. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक सादर करून गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करावा. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या प्रती द्याव्यात. आणखी जाणून घेण्याची इच्छा असलेल्या लोकांकडे, तसेच जे स्मारकविधीला व/किंवा इतर ईश्‍वरशासित कार्यक्रमांना येतात पण मंडळीच्या कार्यांत सक्रिय सहभाग घेत नाहीत अशा व्यक्‍तींकडे पुनर्भेटी करताना देवाची उपासना पुस्तक देण्याचा खास प्रयत्न करावा. यामागचा उद्देश, खासकरून ज्यांनी ज्ञान पुस्तक व अपेक्षा माहितीपत्रकाचा अभ्यास केला आहे त्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्याचा असावा.

▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने मार्च १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. दुरुस्ती किंवा बांधकाम यासाठी एक वेगळा जमाखर्च असेल तर या अहवालाची हिशेब तपासणीची व्यवस्था करण्यात यावी. हिशेब तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.

▪ मंडळीच्या सचिवांनी व सेवा पर्यवेक्षकांनी, सर्व सामान्य पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. कोणा पायनियर बंधूभगिनीला तास भरण्यात काही अडचण असेल तर वडिलांनी त्यांना मदत देण्याची व्यवस्था करावी. आणखी सूचना हव्या असतील तर S-201 या वार्षिक पत्रांची उजळणी करावी.

▪ सन २००५ स्मारकविधी काळात दिल्या जाणाऱ्‍या खास जाहीर भाषणाचा विषय असेल, “येशू यातना सोसून मरण पावला ते कशासाठी?” समान घोषणा आमची राज्य सेवा याच्या सप्टेंबर २००४ च्या अंकात पाहा.

▪ रविवार मार्च २० रोजी होणाऱ्‍या सार्वजनिक सभेला सर्वांनी उपस्थित राहिले पाहिजे; कारण त्या वेळी प्रचारकांसाठी केल्या जाणाऱ्‍या एका व्यवस्थेविषयी एक खास घोषणा केली जाईल.

▪ शाखा दप्तर प्रचारकांच्या वैयक्‍तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्याला मंडळीत याची घोषणा करण्याची व्यवस्था करावी; जेणेकरून ज्यांना साहित्य हवे आहे ते संबंधित बांधवाकडे त्याची ऑर्डर देऊ शकतील. कोणती प्रकाशने खास मागणीची (स्पेशल रिक्वेस्ट) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.

▪ मे २३, २००५ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहापासून आपण मंडळीच्या पुस्तक अभ्यासात जागृत राहा! या माहितीपत्रकाचा अभ्यास करणार आहोत. आणि जून २७, २००५ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहापासून आपण दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! (इंग्रजी) या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत.

▪ टेहळणी बुरूज मार्च १, २००५ या अंकापासून मराठी नियतकालिक दर पंधरावड्याला निघण्याऐवजी दर महिन्याला निघेल.

▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

देवासाठी मानवजात करीत असलेला शोध —तमिळ

जागृत राहा! —आसामी, इंग्रजी, उर्दू, कन्‍नड, गुजराती, तमिळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळम, मिझो, हिंदी

सर्व राष्ट्रांच्या लोकांसाठी सुवार्ता —इंग्रजी, कन्‍नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी

▪ पुन्हा उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

चर्चेसाठी बायबल विषय —मराठी (सुधारित)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा