आपले आभार व्यक्त करा!
१ आपण ‘शेवटल्या काळच्या कठीण दिवसांत’ जगत आहोत तरीसुद्धा यहोवाचे आभार मानण्याकरता आपल्याकडे अनेक कारणे आहेत. (२ तीम. ३:१) यांपैकी सर्वात प्रमुख कारण, त्याने आपल्यासाठी दिलेल्या त्याच्या पुत्राची अमूल्य देणगी आहे. (योहा. ३:१६) तसेच, खोट्या धर्मातील लोक आध्यात्मिकरीत्या उपाशी आहेत परंतु आपण आध्यात्मिक अन्न खाऊन तृप्त आहोत. (यश. ६५:१३) आपण एका विश्वव्यापी बंधुसमाजाचे भाग आहोत आणि आपल्याला खऱ्या उपासनेच्या अत्यंत आनंददायक वृद्धीत भाग घेण्याचा सुहक्क लाभला आहे. (यश. २:३, ४; ६०:४-१०, २२) यहोवाने आपल्याला दिलेल्या आशीर्वादांबद्दल आपण आभार कशाप्रकारे व्यक्त करू शकतो?—कलस्सै. ३:१५, १७.
२ आनंदी, पूर्ण अंतःकरणाने केलेली सेवा: भौतिक वस्तू देण्याविषयी चर्चा करताना प्रेषित पौलाने लिहिले: “संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथ. ९:७) हे तत्त्व आपण करत असलेल्या देवाच्या सेवेला देखील लागू होते. आभारी वृत्ती सत्याबद्दल आपल्याला असलेल्या उत्साहावरून, ख्रिस्ती सभांमध्ये आपण दाखवत असलेल्या आनंदावरून, क्षेत्र सेवेत आपण दाखवत असलेल्या आवेशावरून आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण दाखवत असलेल्या स्वेच्छेवरून दिसून येते.—स्तो. १०७:२१, २२; ११९:१४; १२२:१; रोम. १२:८, ११.
३ प्राचीन इस्राएलमध्ये, विशिष्ट बलिदानांसाठी ठराविक मात्रा दिली पाहिजे असे नियमशास्त्रात सांगण्यात आले नव्हते. प्रत्येक उपासक, “देव परमेश्वर ह्याने आशीर्वाद दिला असेल” त्या मानाने आपल्या ऐपतीप्रमाणे देऊन आपले आभार व्यक्त करू शकत होता. (अनु. १६:१६, १७) तसेच आजही, कृतज्ञतेने भरलेले आपले अंतःकरण आपल्याला, राज्य प्रचार कार्यात आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात आपली परिस्थिती अनुमती देते तितके करण्यास प्रवृत्त करते. उन्हाळ्यात आपल्याला आपली कृतज्ञता दाखवण्याच्या जादा संधी मिळतात. काही जण, कामातून किंवा शाळेतून मिळणाऱ्या सुटीचा उपयोग, क्षेत्र सेवेत अधिक वेळ खर्च करण्यासाठी आणि सहायक पायनियरींग करण्यासाठी देखील करतात. या उन्हाळ्यात तुम्ही देखील तुमची सेवा वाढवू शकाल का?
४ भरभरून आभार माना: एका महत्त्वपूर्ण मार्गाद्वारे यहोवाला आपले आभार व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे प्रार्थना. (१ थेस्सलनी. ५:१७, १८) देवाचे वचन आपल्याला आर्जवते: “तुमचे जीवन . . . कृतज्ञतेने ओसंडून जाऊ द्या.” (कलस्सै. २:७, सुबोध भाषांतर) आपण खूप कामात असलो किंवा दबावाखाली असलो तरी, आपल्या दररोजच्या प्रार्थनांत देवाचे आभार मानायला विसरू नये. (फिलिप्पै. ४:६) होय, आपल्या सेवेद्वारे आणि आपल्या प्रार्थनांद्वारे, आपण ‘देवाच्या उपकारस्तुतीने ओसंडून जाऊ या.’—२ करिंथ. ९:१२, सुबोध भाषांतर.