वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १०/१ पृ. १८-२३
  • “तुम्ही कृतज्ञ असा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुम्ही कृतज्ञ असा”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कृतज्ञता प्रदर्शित करण्याची मुबलक कारणे
  • कृतज्ञता कशी प्रदर्शित करावी
  • हृदयाची दानशूरता
  • आधुनिक काळची समांतरता
  • कृतज्ञता प्रदर्शित करण्याचे मार्ग
  • गरजू विधवेचे उत्तम उदाहरण
  • कृतज्ञतेविषयीचे स्मरण देणे फायद्याचे आहे
  • “कृतज्ञ असा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • कृतज्ञ राहण्याची अधिक कारणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • कृतज्ञ का असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • आपले आभार व्यक्‍त करा!
    आमची राज्य सेवा—२००४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १०/१ पृ. १८-२३

“तुम्ही कृतज्ञ असा”

“ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो . . . आणि तुम्ही कृतज्ञ असा.”—कलस्सैकर ३:१५.

१. या कृतघ्न जगात ख्रिस्तीजनांनी कशाविरुद्ध सावध असावे?

याअशांत विसाव्या शतकाने आपली अशी पातळी गाठली आहे जेथे अनेकांना कृतज्ञ कसे असावे याचा विसर पडलेला आहे. “कृपया,” आणि “आभारी आहोत” यासारखे गुणग्राहकता दाखविणारे शब्द काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. कृतघ्नता त्या “हवे”चा, या जगाच्या लोकांवर स्वामित्व गाजविणाऱ्‍या आपमतलबी आत्म्याचा, समभाग बनलेली आहे. (इफिसकर २:१, २) ख्रिस्तीजन जरी या “जगाचे नाहीत” तरी जोवर हे सध्याचे युग अस्तित्वात राहील तोवर त्यांना त्यात राहणे भाग आहे. (योहान १७:११, १६) या कारणास्तव त्यांनी ही दक्षता बाळगून असण्यास हवी की ह्‍या कृतघ्न आत्म्याचा त्यांच्यावर कसलाही परिणाम होऊ नये व त्यांच्या कृतज्ञतेच्या सवयीस नाहीसे करावे.

२. (अ) यहोवाच्या सेवकांनी त्याला कृतज्ञता व्यक्‍त करावी असे काही मार्ग कोणते आहेत? (ब) तोंडी धन्यवाद मानण्यापलिकडे अधिक असे काय त्यात आहे?

२ देवाच्या चांगुलपणाच्या धन्योद्‌गारांचा उल्लेख समविश्‍वासूंबरोबरील संभाषणात वेळोवेळी होत असावा. समर्पित ख्रिस्तीजनांपैकी बहुतेक सर्व, त्यांचा स्वर्गीय पिता, यहोवा, याचा दिवसभरात अनेक वेळा, त्याने जे सर्व त्यांच्या हिताचे केले आहे त्याबद्दल प्रार्थनेद्वारा आभार मानीत असतात. तसेच कृतज्ञता ही मंडळीत, सभांच्या सरुवातीस, मध्यांतर व शेवटास गीत व प्रार्थनेद्वारा व्यक्‍त केली जाते. अर्थात, शब्दाद्वारे कृतज्ञता उल्लेखणे सोपे असते. तथापि, प्रेषित पौलाने कलस्सैमधील त्याच्या बांधवांना, केवळ प्रार्थनेतच कृतज्ञता उल्लेखवी एवढ्यावरच राहू नये तर आपली कृतज्ञता दाखविण्याची किंवा कृतीत, त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रदर्शित करण्याची हाक दिली. त्याने लिहिलेः “ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो; तिजकरता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ”ता प्रदर्शित करा.—कलस्सैकर ३:१५.

कृतज्ञता प्रदर्शित करण्याची मुबलक कारणे

३. आम्ही सर्व देवास कृतज्ञ का असावे?

३ जिवंत असलेल्या प्रत्येकापाशी कृतज्ञ असण्यासाठी पुष्कळशी कारणे आहेत. सर्वात प्रमुख कारण आहे ते म्हणजे जीवनाचा आनंद लुटणे, कारण आम्हापाशी जरी जगातले सर्वकाही असले किंवा त्यांच्यासाठी योजना केलेल्या असल्या तरी आम्ही जर जीवन गमाविले तर ते सर्व कवडीमोल ठरते. स्तोत्रकर्ता दाविदाने सर्व लोकांना हेच आर्जविले कीः “जीवनाचा झरा तुजजवळ [यहोवा] आहे.” (स्तोत्रसंहिता ३६:९) शिवाय, प्रेषित पौलाने अथैनेमधील पुरुषांना अरियोपेगेसवर भाषण देताना याच अमर सत्याची आठवण करुन दिली. (प्रे. कृत्ये १७:२८) होय, जिवंत असणे हेच मुळात कृतज्ञता व्यक्‍त करण्यास केवढे समृद्ध कारण आहे. आणि देवाने आम्हास जी सर्व ज्ञानेंद्रिये दिली आहेत, जसे चव, स्पर्श, वास, दृष्टी आणि ऐकणे या नैसर्गिक शारीरिक शक्‍ती पुरविल्या यांची आठवण होताच आमच्याठायीच्या आवडी अधिक खोलवर रुजतात की, ज्यांच्यायोगे आम्ही जीवन अधिक आनंदाने व आम्हासभोवतालच्या विलोभनीय वातावरणात सौख्यतेत उपभोगू.

४. जीवनाच्या आशीर्वादांना सर्वसाधारण गोष्टी मानण्यापासून काय सुरक्षित ठेऊ शकेल?

४ तरीही, अनेक असे आहेत जे या सर्व चांगल्या गोष्टींचा स्वाद घेत असताही त्यांना सर्वसाधारण गोष्टी मानतात. जेव्हा यापैकी एखाद्या अंगाचे अपंगत्व येते, जसे अंधत्व किंवा बहिरेपण येते तेव्हा अनेकांना, आपण सुदृढ आरोग्य अनुभवीत होतो ते केवढ्या आशीर्वादाचे होते याची जाणीव होते. समर्पित ख्रिस्तीजनांनी सतत ही दक्षता बाळगून असण्यास हवी की, त्यांनी स्वतःस अशा निरस प्रवृत्तीप्रत ढासळू देऊ नये. त्यांनी स्वतःस स्तोत्रकर्त्यासमान त्याच कृतज्ञता दर्शविणाऱ्‍या प्रवृत्ती टिकवून ठेवण्यासाठी सदोदित परिश्रमपूर्वक प्रयत्नशील असावे, ज्याने म्हटले होतेः “हे यहोवा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्‌भूत कृत्ये व प्रगट केलेले आपले विचार बहुत आहेत; तुझ्यासारखा कोणी नाही. त्यांचे वर्णन करु लागलो तर ते माझ्या गणनेपलिकडे आहेत.”—स्तोत्रसंहिता ४०:५.

५. इस्राएलांवर देवाकडून समृद्ध आशीर्वाद येत असताही त्यांनी कोणता लज्जास्पद मार्ग अनुसरला?

५ स्तोत्र १०६ यहोवाने, त्याचे लोक, इस्राएलांकरिता जी महत्कृत्ये केली त्यांचे काव्यात्मक वर्णन करते. देव त्यांच्याबरोबर जे संबंध राखून होता ते, सर्वसाधारण मानवजातीवर चांगुलतेचा आणि नियमित आशीर्वादांचा वर्षाव करीत असे त्यांच्या व्यतिरिक्‍ततेतील होते. तथापि, ह्‍या फायद्यांचा ओघ चालू असताही स्तोत्रकर्ता हे स्पष्ट करतो की, इस्राएल लोकांनी त्यांना लाभलेल्या एकमेव आशीर्वादांची आवड प्रदर्शित करण्याचे चालू ठेविले नाही. वचन १३ म्हणतेः “तरी ते त्याची कृत्ये लवकरच विसरले; त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरला नाही.” हे काही, काळाच्या ओघात त्यांची कृतज्ञता हळूवारपणे विरली आणि मग काही दशकानंतर, देवाने त्यांच्याविषयी जे केले त्यांचे स्मरण त्यांना राहिले नाही असा काही प्रकार नव्हता. उलट, अल्पकाळात, यहोवाने तांबड्या समुद्री जो अप्रतिम चमत्कार घडवून आणला होता त्यानंतर काही आठवड्यातच ते विसरले. (निर्गम १६:१-३) यानंतर कृतघ्नता ही त्यांच्या जीवनाची नित्याची बाब बनली गेली हे जे घडलेल्या घटनांवरुन दिसते ते खूप दुःखद आहे.

कृतज्ञता कशी प्रदर्शित करावी

६. दशमांश देण्यात कोणतेही अधिक कष्ट पडणार नव्हते ते कसे?

६ इस्राएलांच्या बाबतीत देवाने जो चांगुलपणा दाखविला होता त्यासंबंधाने त्यांनी तीन प्रकाराने कृतज्ञता व्यक्‍त करावी असे यहोवाने त्यांना सविस्तरपणे सांगितले. पहिला प्रकार दशमांश देणे, ज्यात आपल्या सर्व उत्पन्‍नाचा व गुरेढोरे यातून दहावा हिस्सा यहोवाला द्यावयाचा होता. (लेवीय २७:३०-३२) यामुळे कोणाही प्रकारची कमतरता उद्‌भवणार नव्हती, कारण सूर्य, सुपीक जमीन व पाऊस व त्याच्या चमत्काराने उगवणारे पीक हे सर्व पुरविण्यास देव जबाबदार होता. यास्तव, यहोवाच्या मंदिरातील याजकांना दहावा हिस्सा देणे यात स्वतः यहोवाची प्रत्यक्ष कृतीत कृतज्ञता व्यक्‍त करण्यासमान होते.

७. (अ) दशमांश देणे व यहोवास दान देणे यात कोणता मोठा फरक होता? (ब) हे सर्व इस्राएलांना त्यांच्याबद्दल काय प्रकट करण्याची मुभा पुरवीत होते?

७ दुसरी गरज ही होती की, देवास दान देणे, यात जे काही देणार त्याचा आकडा निश्‍चित करणे हे प्रत्येक इस्राएलाच्या अंतःकरणातील ठरावावर अवलंबून होते. निश्‍चित आकडा जरी सांगितलेला नव्हता तरी ते दान धान्य, द्राक्षे आणि लोकर यांच्या प्रथमफळाचेही होते. (गणना १५:१७-२१; अनुवाद १८:४) याशिवाय यहोवाने ताकीद दिली होती की, त्याच्या लोकांनी ‘अर्पण देण्यात अनिश्‍चित असू नये,’ तर “प्रथम उत्पन्‍नातील पहिला [उत्तम] भाग” द्यावा. (निर्गम २२:२९; २३:१९) यामुळे इस्राएलांकरिता जी संधी उपलब्ध होई ती त्यांना यहोवाबद्दलची कृतज्ञता निश्‍चितमार्गी व्यक्‍त करण्याची संधि पुरवी. जे दान ते अर्पण करीत त्याच्याद्वारा त्यांच्याजवळ असलेली सखोल कृतज्ञता ते प्रकट करीत. ते केवळ द्राक्षाचा एकच गुच्छ अर्पण करतील? का त्यांचे उदार अंतःकरण त्यांना पाटीभर देण्यास उत्सुक करील? अशाप्रकारे प्रत्येक व्यक्‍ती तसेच कुटुंब जबरदस्तीशिवाय आपापली कृतज्ञता प्रदर्शित करु शकत होते.

८. (अ) सरवा वेचण्याच्या योजनेत कोणते दोन फायदे पुरविले होते? (ब) सरवा वेचण्याच्या योजनेत सहभाग घेणाऱ्‍या सर्वांनी उदारपणा व कृतज्ञता ही कशी प्रदर्शित करणे होते?

८ कृतज्ञता प्रदर्शित करण्याचा तिसरा खास मार्ग, देवाने सरवा वेचण्याच्या कामात जी सूट दिली होती तिच्याशी संबंधित होता. पीक कापणीच्या वेळी काही भागांची कापणी न करता गरजवंतांसाठी तसाच सोडावा. यामुळे गरीबांसाठी अनुकंप आणि सहानुभूतिचे धडे मिळत असे केवळ नव्हते, तर बिनामेहनतीच्या भिकेच्या जीवनावर उदरनिर्वाह करीत राहण्यापासून दूर ठेवी. (लेवीय १९:९, १०) गरजवंतांकरिता केवढे सोडावयाचे हे नेमून दिलेले नव्हते. पण जर इस्राएली शेतकऱ्‍यांनी आपापल्या शेताच्या कानाकोपऱ्‍यातले बरेचसे सोडून उदार आत्मा प्रदर्शित केला व गोरगरीबांवर कृपादृष्टी व्यक्‍त केली तर त्याद्वारा ते देवाचे गौरव करीत. (नीतीसूत्रे १४:३१) मग केवळ मर्यादित भाग किंवा एखादा मोठा तुकडा कापणी करण्याचे सोडणे हे त्यांच्या मर्जीवर अवलंबून असे. पण दानशूर असण्याबद्दलच्या सूचना अगदी कडक शब्दात देण्यात आल्या होत्या की बांधून ठेवलेली पेंढी शेतातून आणावयाची राहिली किंवा फळ झाडावर राहिले किंवा द्राक्षे राहिली तर ती सरवा वेचणाऱ्‍यांकरिता सोडावी. (अनुवाद २४:१९-२२) यातच स्वतः सरवा वेचणारा यहोवा देवास आपली कृतज्ञता या सोईद्वारा, सरव्यात जे काही प्राप्त होई त्यातील दहावा भाग भक्‍तीस्थानी अर्पण म्हणून अर्पित करु शकत होता.

हृदयाची दानशूरता

९. जे कोणी यात स्वार्थी वृत्ती प्रदर्शित करीत ती प्रत्यक्षात त्यांच्याच नुकसानीची होती ते कसे?

९ जर इस्राएल लोकांनी उदार मनाने अर्पणे वाहिली तर यहोवाचे समृद्ध आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर येत. (पडताळा यहेज्केल ४४:३०; मलाखी ३:१०.) तथापि, जरी भरपूर पीक येई तरी ते वेळोवेळी अर्पणे वाहण्यात हयगय करीत. मग देव, त्यांच्या कृतज्ञतेची त्यांना आठवण व्हावी म्हणून त्यांचे राजे किंवा संदेष्टे यांच्याद्वारे स्मरण देत असे. ज्या अर्पणांचा त्यांच्या भक्‍तीशी व गोरगरीबांसाठी सोयीसोबत संबंध होता ती अर्पिण्यात जे स्वतःला रोखून धरीत अशा स्वार्थी इस्राएलांना यहोवा आशीर्वाद देत नव्हता.

१०. (अ) राजा हिज्कियाने कृतज्ञतेबद्दल जी स्मरणिका दिली तिचा आनंदी परिणाम कोणता दिसला? (ब) ही परिस्थिती टिकली का?

१० एके प्रसंगी राजा हिज्कियाद्वारे दिलेल्या स्मरणिकेचा परिणाम यरुशलेमात १४ दिवस आनंदोत्सव पाळण्यात अनुभवास आला. लोकांची आध्यात्मिक पुनरावृत्ती झाली. प्रथम त्यांनी मूर्तिपूजेशी संबंधित अशा सर्व वस्तुंचा नाश केला, आणि मग “पवित्र वस्तुंचा दशमांश आणून त्यांच्या राशी केल्या. . . . हिज्किया व सरदार यांनी येऊन त्या राशी पाहिल्या तेव्हा ते यहोवाचा व त्याचे लोक इस्राएल यांचा धन्यवाद करु लागले.” (२ इतिहास ३०:१, २१-२३; ३१:१, ६-८) तथापि, दुःखाने म्हणावे लागेल की, कालांतराने हे जे पुनर्जीवन झाले होते तेच लोक परत कृतघ्नतेत पडले. सरतेशेवटी देवाच्या धीराचा अंत झाला, व त्याने त्यांच्यावर बाबेलची गुलामगिरी येऊ दिली. त्यांचे शहर व त्यातील विलोभनीय मंदिराचा नाश करण्यात आला. (२ इतिहास ३६:१७-२१) कालांतराने, पुनर्वसाहतीनंतर, परिस्थिती परत एवढी गंभीर झाली की यहोवाने यहुद्यांच्या अनुदारतेस, त्यांची लूट, त्यांची चोरी करण्यासमाने मानले.—मलाखी ३:८.

११. इस्राएलांच्या इतिहासावरुन अशी कोणती जीवनतत्त्वे आम्ही शिकू शकतो जी आजही ख्रिस्ती जीवनात फायदेकारक ठरतील?

११ इस्राएलांच्या या अनिश्‍चित वागणूकीच्या इतिहासावरुन आम्ही कोणती जीवनतत्वे शिकू शकतो? हीचः जोवर आम्ही आमच्या अंतःकरणात कृतज्ञता बाळगून राहतो तोवर हे सर्व आनंदाने जणू “राशींच्या राशी”समान यहोवास देऊन याचे प्रदर्शन करतो. पण तेच जेव्हा कृतज्ञतेचा विसर पडतो किंवा ती खालच्या पातळीवर ढासळू लागते, तेव्हा आनंदाने खऱ्‍या वस्तु देणे बंद होते. अशी ही दुष्ट वृत्ती आजच्या समर्पित ख्रिस्तीजनाने दाखवावी का? हे खरे की, मानवी अपूर्णता आजही आमच्यासोबत आहे. याकरिताच, आम्ही केवढे संतोषी असावे की देवाने, आम्ही जे या युगाच्या अंतसमयात जगत आहोत, त्या आमच्या शिकण्याकरता व धडे घेण्यास, तो इस्राएलांसोबत कशाप्रकारेच दळणवळण राखून होता याची नोंद पुरविली आहे.—रोमकर १५:४; १ करिंथकर १०:११.

१२. (अ) यहोवाचे लोक आजही इस्राएलासारख्याच भूमिकेत आहेत ते कसे? (ब) मग आम्ही स्वतःस कोणते प्रश्‍न विचारण्याची गरज आहे?

१२ इस्राएल लोकांप्रमाणेच, आज जे यहोवाचे लोक आहेत त्यांच्याजवळही कृतज्ञ राहण्यासाठी पुष्कळशी कारणे आहेत. आमच्या सोबतीतील मानव जगापेक्षा कितीतरी अधिक आशीर्वादांचा आनंद आम्हास अनुभविण्यास मिळतो. प्रत्यक्षात, इस्राएल लोकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आज आम्हास यहोवाच्या संकल्पाची माहिती आहे. आम्ही शिकलो की कशाप्रकारे देवाने स्वईच्छेने आपल्या पुत्राचे अर्पण दिले व ज्यांना ईश्‍वरी मंजूरी प्राप्त होईल अशांना याकरवी कोणकोणत्या आशीर्वादांचा लाभ होईल हे आम्ही जाणतो. शिवाय आज आम्हास आध्यात्मिक नंदनवनातील वास्तव्य हक्क प्राप्त आहे, कारण १९१९ पासून यहोवाने आपल्या लोकांकरिता भव्य आध्यात्मिक जहागिरीची निर्मिती केली आहे. होय, यहोवाच्या साक्षीदारांनी कृतज्ञ राहण्याजोगी अनेक कारणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. यास्तव आम्ही स्वतःस विचारण्याची गरज आहे कीः देवाशी कृतज्ञ राहण्याचे आमच्या हृदयात केवढे खालवर रुजलेले आहे? मग, या २०व्या शतकात आम्ही स्वतः कृतज्ञ असल्याचे कसे प्रदर्शित करु शकतो?

आधुनिक काळची समांतरता

१३, १४. ख्रिस्तीजन आज जरी मोशेच्या नियमशास्त्राधीन नाहीत तरी दशमांश देण्याच्या नियमात त्यांच्यासाठी काही समांतरता आहे को?

१३ देवास कृतज्ञता कशी प्रदर्शित करावी याची माहिती पुरविणाऱ्‍या मोशेमार्फतच्या नियमशास्त्राधीन ख्रिस्तीजन नाहीत. (गलतीकर ३:२४, २५) आपण यहोवास जे सर्व उपकारस्मरणरुपी “यज्ञ” वाहतो ते आमच्या “ओठांचे फळ” आहे, जे जाहीरपणे त्याच्या नामाची ग्वाही देते. (इब्रीयांस १३:१५) मग, कोणाही समर्पित ख्रिस्तीजनाकरता देवाबद्दलची कृतज्ञता प्रदर्शित करण्यातील हा एक प्रमुख मार्ग आहे. तरीही, दशमांश, दान आणि सरवा देण्यासाठी जे नियम दिले होते त्याकडून लक्षवेधक तुलना वा समांतरता काढता येऊ शकते.

१४ दशमांश देणे म्हणजेच कोणा ठराविक रकमेचा दहावा हिस्सा देणे व त्यात सूट नव्हती. त्याचप्रमाणे आजही यहोवाच्या सर्व सेवकावर विशिष्ट आज्ञा आहेत व त्याला दुसरा पर्याय नाही. आम्हा सर्वांना सभांना नियमितपणे एकत्र जमावे लागते. शिवाय आम्ही जाहीरपणे यहोवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली पाहिजे व इतरांचे ख्रिस्ताचे शिष्य बनण्यात सहाय्य केले पाहिजे.—इब्रीकर १०:२४, २५; मत्तय २४:१४; २८:१९, २०.

१५. आधुनिक समयातील दानशूर अंतःकरणाच्या लोकांच्या देणग्यात गतकाळातील दाने देण्याच्या व सरवा वेचण्याच्या योजनेची समांतरता कशी दृष्टीस पडते?

१५ याखेरीज दाने आणि सरवा वेचण्याची व्यवस्था देखील लक्षात आणा. पण निश्‍चित रकमा ठरविलेल्या नव्हत्या. तसेच यहोवाच्या प्रत्येक साक्षीदाराने पवित्र सेवेत नक्की केवढा वेळ खर्च करावा याचे कोणतेही मोजमाप पवित्र शास्त्र वचनात दिलेले नाही. तर देववचनांचे अभ्यासात आणि इतरांकडे जाऊन प्रचारकार्य करण्यात केवढा वेळ खर्च करणार हे उदार, निःस्वार्थी अंतःकरणास जी प्रेरणा प्राप्त असेल तिच्यावर अवलंबून असेल. तसेच राज्यहिताच्या प्रगतीस हातभार लागावा म्हणून केवढा धनभाग देणार हे त्या व्यक्‍तीगतास त्यात केवढा रस आहे म्हणून ह्रदयापासून जे ठरवणार त्यावर आहे. कृतज्ञतेची हृदयातील खोली हे निश्‍चित करील की, आजचा देवाचा सेवक खरोखरी “राशींच्या राशी” आनंदाने देत आहे की, भाग पडते म्हणून नाममात्र दान देत आहे. (२ इतिहास ३१:६) तरी, जसे इस्राएल लोकांच्या बाबतीत घडले की बहुसंख्यांकानी कृतज्ञता संपन्‍नतेत दर्शविली व त्यामुळेच त्यांच्यावर देवाकडिल समृद्ध आशीर्वादांचा वर्षाव झाला.

कृतज्ञता प्रदर्शित करण्याचे मार्ग

१६-१८. समर्पित ख्रिस्तीजन कोणकोणत्या खास मार्गी आपली कृतज्ञता व्यक्‍त करु शकतात?

१६ यहोवास कृतज्ञता प्रदर्शित करण्याचा एक सर्वात सरळ मार्ग म्हणजे पूर्ण वेळची सेवा करणे. मग, आपणाठायीची कृतज्ञता एवढी प्रबळ आहे का की, आपल्या हृदयास ते कार्य करण्यासाठी ती प्रवृत्त करील? हे अगदी बारकाईने न्याहाळणी केल्यावर दिसून आले की, पायनियरिंग मध्ये यशस्वी होणे आहे तर प्रथम त्यांच्याठायी सेवा करण्याची इष्टता असण्यास हवी व शिवाय योग्य परिस्थिती असावी. जेव्हा कृतज्ञता अधिक शक्‍तीशाली असते तेव्हा देवाची सेवा करण्याची उत्कट इच्छा रसिक अंतःकरणातून उफाळून बाहेर पडते. आपली सद्य वस्तुस्थिती जरी पूर्ण वेळेची सेवा करण्याची मुभा पुरवत नसली तरी त्यामुळे आम्हाठायींच्या पायनियर आत्म्यास थंड होऊ देण्याची गरज नाही. आपण आपल्यापरिने होईल तेवढा पाठिंबा व उत्तेजन, जे सर्व पायनियर सेवा करीत आहेत अशांना देऊ शकता.

१७ आज जरी आपणास पायनियर सेवा करता येणे शक्य नाही तरी अधूनमधून सहाय्यक पायनियरिंग करु शकता का? प्रतिवर्षी काही विशिष्ट सुट्टीचा काळ असतो, त्यात ख्रिस्ती मंडळ्या प्रचारकार्यात नेहमीपेक्षा अधिक प्रयत्न खर्ची घालण्याचे उत्तेजन देऊ शकतात. उदाहरणार्थ, उन्हाळ्याचे महिने, अनेकांसाठी सुलभ असतात. तसेच ऑक्टोबर मधील सुट्टयात मासिक कार्याच्या अधिक हालचालीत, वर्गणी मोहीम यशस्वी व्हावी म्हणून त्यात अधिक हालचाल करण्यात, सामील व्हावे. पवित्र सेवेत अधिक वेळ देता यावा हे उद्दिष्ट साधण्यात कृतज्ञता ही उदार देणग्यांची उपज करते या तत्त्वाचे पालन खरे ठरेल.

१८ कृतज्ञता प्रदर्शित करण्याचा दुसरा निश्‍चित मार्ग आहे, तो म्हणजे सबंध जगभरात ईश्‍वरशासित रुपाने ज्या इमारती उभारण्याची कामे, नवीन राज्यसभागृहे उभारण्याची, तसेच सध्या असलेली जुनी सभागृहे, उपस्थितांची संख्या वाढत असल्यामुळे, व्याप वाढविण्याची कामे चालू आहेत त्यांना सढळ हाताने हातभार लावणे. नवीन संमेलन सभागृहे बांधली जात आहेत, शिवाय बेथेलगृहे आणि छपाई कारखाने वाढविले जात आहेत. मग, यहोवास कृतज्ञता प्रदर्शित करण्याचे व्यावहारिक मार्ग कोणते असतील? या इमारत बांधणीच्या योजनांना आपल्या परिश्रमाने किंवा आर्थिक हातभार लावून.

गरजू विधवेचे उत्तम उदाहरण

१९. मंदिरातील त्या गरीब विधवेच्या कृतीत कोणत्या गोष्टींनी तुम्ही प्रभावीत झाला आहात?

१९ कृतज्ञता प्रदर्शित करण्यातील पवित्र शास्त्रात एक प्रसिद्ध उदाहरण आहे, ज्यात येशूने एका अशा विधवेचे उदाहरण दिले, ज्यात तिने उदार मनाने सर्वस्व दिले. (लूक २१:१-४) तिला ही जाणीव असेल की मंदिराचे ऐश्‍वर्य आणि याजकांची सुस्थिती यात तिच्या दोन टोल्यांनी कोणताच फरक पडणार नाही. पण तिने मंदिराकडे किंवा तेथे सेवा करणाऱ्‍या याजक वर्गाकडे पाहिले नाही किंवा असा विचार केला नाही कीः ‘ते मजपेक्षा अधिक सुस्थितीत आहेत.’ हे खरे होते की, ते मंदिर अतिसंपन्‍न आणि सुशोभित होते. “मंदिर उत्तम पाषाणांनी व अर्पणांनी . . . सुशोभित केलेले” होते. (लूक २१:५) पण, या सर्व गोष्टींनी दान देण्यात विधवेपुढे अडथळे उभे राहिले नाही. ती, मंदिर सेवकांपुढे नव्हे तर यहोवा देवापुढे स्वतःस कृतज्ञ असल्याचे प्रदर्शित करु इच्छित होती.

२०. त्या गरीब विधवेने प्रदर्शित केलेल्या प्रशंसनीय चित्तवृतीचे आम्ही कसे अनुकरण करु शकतो?

२० या उदाहरणाने आज यहोवाचे लोक पुष्कळसे शिकू शकतात. त्या गरीब विधवेसमान ते हे ओळखून आहेत की त्यांचे दान, मग ते मोठे असो की छोटे, ते देवास वाहिलेले आहे. याशिवाय त्यांच्याठायी हा आत्मविश्‍वास रुजलेला आहे की यहोवाच्या भूतल संस्थेची उभारणीच अशी केलेली आहे की, कोणीही त्यात वैयक्‍तीक आर्थिक फायदे कधीही मिळवू शकणार नाहीत. संस्थेच्या सुविधांची उभारणी व कामाची आखणी अशी आयोजित आहे की, जे परिश्रमिक कामगार आहेत त्यांना त्यांच्या श्रमांचे फळ, पवित्र शास्त्र तसेच पवित्र शास्त्रावर आधारित प्रकाशनांच्या सर्वोत्तम उत्पादनात व राज्यहिताच्या सेवेत प्राप्त होत आहेत. हे त्याच्या अगदी विरुद्धतेतील आहे ज्यात अगदी अलिकडेच दूरदर्शनवरील सुवार्तिकांच्या कामात दानार्थ प्राप्त पैशांचा दुर्वर्तनी गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.

कृतज्ञतेविषयीचे स्मरण देणे फायद्याचे आहे

२१, २२. आम्हाला कृतज्ञता प्रदर्शित करण्याची जी प्रेमळ स्मरणिका दिली जाते तिने आमच्या रसिकपूर्ण अंतःकरणात कोणती हालचाल घडवून आणावी?

२१ इस्राएलांनी यहोवासाठी कोणकोणती कर्तव्ये पार पाडणे आहे याची त्यांना वेळोवेळी आठवण द्यावी लागे, खासकरुन कृतज्ञतेचा आत्मा प्रदर्शित करण्याचे तर खास स्मरण द्यावे लागे. सर्वसाधारणपणे, जेव्हा या गोष्टींची त्यांना आठवण दिली जाई तेव्हा कृतज्ञतेची भावना त्यांच्या ह्रदयात परत जागृत होत असे व त्याचे परिणाम, त्यांच्या आवडीद्वारा शब्दांपेक्षा कृतीत दिसून येई. मग ते उत्पादनातून “राशींच्या राशी” यहोवास देण्यास उत्सुक असत, ज्यांचा त्याच्या भक्‍तीस्थानात उपयोग केला जाई.

२२ यास्तव, जे सर्व आजच्या काळात “देवाचे इस्राएल” आणि त्याच्या सोबत्यांचा मिळून बनलेल्या “मोठा लोकसमुदाय”मधून आहेत त्यांनाही नेहमी असेच वाटते. (गलतीकर ६:१६; प्रकटीकरण ७:९) त्यांचे कृतज्ञ अंतःकरण “राशींच्या राशी”समान देण्यात उत्सुक होवो. मगच ते म्हणून शकतीलः “आम्ही आमचा उदार व प्रेमळ देव यहोवा याला कृतज्ञता दाखवीत आहोत.”

आपणास आठवते का?

◻ ख्रिस्तीजनांनी त्यांच्या कृतज्ञतेच्या मर्यादेवर सतत लक्ष ठेऊन असण्याची आवश्‍यकता का आहे?

◻ यहोवाच्या लोकांना कृतज्ञ असण्याची अधिक कारणे नेहमीच का आहेत?

◻ इस्राएल लोक कोणकोणत्या विशिष्ट मार्गी त्यांची कृतज्ञता यहोवास व्यक्‍त करु शकत होते?

◻ इस्राएलांप्रमाणे आम्ही आमची कृतज्ञता व्यक्‍त करण्यात कोणकोणत्या विशिष्ट गोष्टी करु शकतो?

◻ मंदिरातील गरजवंत विधवेच्या कृतीवरुन आम्ही काय शिकू शकतो?

[१८ पानांवरील चित्रं]

इस्राएलांनी, दशमांश देऊन, प्रथमफळांचे दान वाहून तसेच गोरगरीबांना शेतातील सरवा वेचण्याची मुभा उपलब्ध करुन आपली कृतज्ञता प्रदर्शित केली

[१९ पानांवरील चित्रं]

स्तोत्रकर्त्याने यहोवाचे, त्याच्या लोकांसाठी केलेल्या विस्मयकारक कृत्यांबद्दल व विचारांबद्दल आभार मानले

[२१ पानांवरील चित्रं]

यहोवाचे साक्षीदार आज आपली कृतज्ञता, क्षेत्रसेवेत व ईश्‍वरशासित इमारती बांधण्याच्या योजनेत प्रत्यक्ष सहभागी होऊन तसेच धन व जडवादीय वस्तुंचे दान देऊन प्रदर्शित करतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा