आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणे
१ “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रामाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोम. ५:८) आपल्यासाठी यहोवा देव आणि त्याच्या पुत्राने केलेल्या सर्वोच्च बलिदानाकरता आपण सर्वजण किती कृतज्ञ असले पाहिजे! ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवनाची संधी दिली जाते. कोणताही मानव आपल्याला हे देऊ शकत नाही.
२ आपण आपली गुणग्राहकता कशी व्यक्त करू शकतो? पुष्कळ लोक केवळ देवाच्या पवित्र वचनात आढळणाऱ्या खऱ्या ज्ञानासाठी तान्हेले आहेत. त्यांना सत्याचे ज्ञान मिळावे अशी यहोवाची इच्छा आहे. (१ तीम. २:४) ‘देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याद्वारे’ आपण आपली गुणग्राहकता व्यक्त करतो. (लूक ४:४३) ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, याची गुणग्राहकता आपण बाळगतो व इतरांना शिष्य बनवण्याची त्याची आज्ञा विश्वासूपणे पाळून आम्ही त्याचे अनुकरण करू इच्छितो हे या कार्यातील अंतःकरणपूर्वक सहभागाद्वारे दिसून येते.—मत्त. २८:१९, २०.
३ आपणासमोर प्राचाराचे काही मार्ग कोणते आहेत? वेळोवेळी साहाय्यक पायनियर या नात्याने नाव नोंदवण्यास आपल्याला शक्य आहे का? खर्चाचा अंदाज लावल्यावर, काहीजण नियमित पायनियरींग सुरू करू शकतील. या उत्तम संधींचा फायदा घेऊन, आपण राज्य सुवार्तेचा प्रासार करण्यासाठी खर्च करत असलेल्या वेळेचे प्रामाण वाढवू शकतो. गतकाळात, तुम्ही नाव नोंदवण्याचे ठरवले असेल, परंतु काही अडथळे आले असतील. कदाचित तुमच्या परिस्थिती आता बदलल्या असतील. असे असल्यास, नियमित पायनियर सेवा सुरू करण्यास किंवा साहाय्यक पायनियर या नात्याने कार्य करण्याबद्दल तुम्ही गंभीरतेने विचार केला आहे का?
४ आपल्या सभोवती जे घडत आहे त्याकडे लक्ष दिल्यावर आपली कृतज्ञता अधिक वाढते. जगभरात हिंसा, द्वेष आणि झगडे वाढत आहेत. पौलाने आपल्या समयाचे वर्णन, ‘संकटाचे’ आणि ‘सामना करावयास कठीण’ असे अगदी उचितपणे केले आहे. (२ तीम. ३:१) या दुःखदायक परिस्थितींमध्ये, आपल्याजवळ इतरांसोबत सहभागिता करण्याजोगी सुवार्ता विपुलतेत आहे. आपल्याजवळ टेहळणी बुरुज आणि सावध राहा! अशी दोन उत्तम नियतकालिके आहेत, या महिन्यात आपण त्यांच्या वर्गण्या किंवा किरकोळ प्राती सादर करू शकतो. आपल्याकडे अनेक विषयांवरील माहितीपत्रके देखील आहेत. ही प्राकाशने वाचकांना खरा तजेला देऊ शकतात. आपल्याजवळ जे काही आहे त्याच्या कृतज्ञतेमुळे त्याची इतरांसोबत सहभागिता करण्यासाठी आपण उदार असण्यास प्रावृत्त झाले पाहिजे.—इत्त्वी. १३:१६.
५ तुम्ही राहत असलेल्या भागात, लोक आध्यात्मिक गोष्टींमध्ये कमी आस्था दाखवत असतील. या उलट, फलदायी अशी क्षेत्रे आहेत. तुमच्या मातृभाषेशिवाय एखादी भाषा तुम्हाला येत असल्यास, याच देशात तुमची खरोखर मदत हवी असेल तेथे नियमित पायनियर या नात्याने स्वेच्छेने जाण्यास तुम्हाला शक्य आहे का? या बाबीविषयी तुमच्या विभागीय पर्यवेक्षकांकडे काही सूचना असतील.
६ आपल्याजवळ खरोखर ज्या चांगल्या गोष्टींची विपुलता आहे त्याबद्दल कृतज्ञ असण्यास अनेक कारणे आहेत. यहोवाचे नाव व त्याचा उद्देश इतरांना माहीत करून देण्याद्वारे त्याच्याबद्दल आपली कृतज्ञता सर्वोत्तम प्राकारे व्यक्त करता येऊ शकते.—यश. १२:४, ५.