वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०४ पृ. १
  • तजेला देणारे संगीत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तजेला देणारे संगीत
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • संगीताचा आनंद त्यामागील किल्ली कोणती आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • देवाची महिमा करणारे संगीत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • राज्य गीतांचा आस्वाद घेण्याचा एक उत्तम मार्ग
    आमची राज्य सेवा—२०११
  • तुम्हाला माहीत होतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
आमची राज्य सेवा—२००४
km ५/०४ पृ. १

तजेला देणारे संगीत

१ गायन आणि संगीत, या खऱ्‍या उपासनेतील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्राचीन इस्राएलमध्ये, आसाफ आणि त्याच्या बंधुंनी असे गायिले: “परमेश्‍वराचे उपकारस्मरण करा . . . त्याला त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्‌भुत कृत्यांचे वर्णन करा.” (१ इति. १६:८, ९) आज आपण, आपल्या आठवड्याच्या मंडळीच्या सभांमध्ये मोठ्याने यहोवाचे गुणगान करतो. (इफिस. ५:१९) त्याच्या नावाची स्तुती करण्यासाठी ही किती अद्‌भुत संधी आहे!—स्तो. ६९:३०.

२ वाद्यवृदांनी तयार केलेले किंगडम मेलडीज ऐकल्याने आपले मन आध्यात्मिक विचारांनी भरू शकते. एका भगिनीने म्हटले: “गीतं सुरू होतात तेव्हा आपोआप मला त्यांचे शब्द आठवू लागतात. संगीताचा आनंद लुटत असतानाही यहोवाचा विचार करण्याचा हा मार्ग खरोखर किती उत्तम आहे!”—फिलिप्पै. ४:८.

३ कोणत्या प्रसंगी तुम्ही ते ऐकू शकता: किंगडम मेलडीज लावल्यामुळे, घरातील उबदार, आध्यात्मिक वातावरणात भर पडून घरात शांती राहते. एका कुटुंबाने लिहिले: “आम्ही आमच्या घरात, आमच्या कारमध्ये सतत ही गाणी लावतो; मनाला स्पर्श करणाऱ्‍या या गीतांचा आम्हाला कधीच कंटाळा येत नाही. पुष्कळदा, ख्रिस्ती सभांना जायच्या आधी किंवा संमेलनाला जायच्या आधी ही गाणी ऐकल्यामुळे आमची मानसिक तयारी होते.” एका बहिणीने म्हटले: “घरातलं काम करत असताना मनाला उभारी देणारी ही गाणी आहेत—नाहीतर, कपड्यांच्या घड्या घालताना कोणी आनंदी असतं का? मी जेव्हा निराश होते तेव्हा मी ही गाणी लावते. या संगीतामध्ये आनंद उत्पन्‍न करण्याची शक्‍ती आहे. . . . प्रत्येक गाण्यानं मनात आनंद उत्पन्‍न होतो.” या तजेलादायक संगीताचा तुम्हाला लाभ होऊ शकेल असे दुसरेही प्रसंग आहेत का?

४ आज जगातील बहुतेक गाण्यांतून जगाचा आत्मा दिसून येतो. पालक आपल्या मुलांमध्ये किंगडम मेलडीजचा चांगल्याप्रकारे उपयोग करण्याद्वारे संगीताबद्दल हितकारक आवड निर्माण करण्यास मदत करू शकतात. पुष्कळ बायबल विद्यार्थ्यांना व आस्था दाखवणाऱ्‍या लोकांना, यहोवाची स्तुती करणाऱ्‍या व मनाची उभारी करणाऱ्‍या या सुरेख आध्यात्मिक गीतांविषयी ऐकून आनंद वाटेल.—स्तो. ४७:१, २, ६, ७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा