वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०३ पृ. ६
  • ‘योग्य प्रवृत्ती असलेल्यांना’ मदत करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘योग्य प्रवृत्ती असलेल्यांना’ मदत करणे
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • पुनर्भेटींमुळे बायबल अभ्यास मिळतात
    आमची राज्य सेवा—२००३
  • पुनर्भेटींची जबाबदारी स्वीकारा
    आमची राज्य सेवा—१९९२
  • परिणामकारक पुनर्भेटींकरता चांगली तयारी करणे आवश्‍यक
    आमची राज्य सेवा—२००८
  • पुनर्भेट घेण्याची खात्री बाळगा
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km १२/०३ पृ. ६

‘योग्य प्रवृत्ती असलेल्यांना’ मदत करणे

१. यहोवा आज कोणाला स्वतःकडे एकत्र करत आहे?

१ प्रत्येक व्यक्‍तीची एक प्रवृत्ती असते जी तिच्या लाक्षणिक हृदयात खोलवर रुजलेली असते. (मत्त. १२:३५) बायबल “युद्धप्रिय” व्यक्‍तीबद्दल सांगते. (स्तो. ५५:२१) काही जण “क्रोधाविष्ट” असतात. (नीति. २९:२२) परंतु असेही काही लोक आहेत ज्यांची ‘सार्वकालिक जीवनासाठी योग्य प्रवृत्ती असते.’ (प्रे. कृत्ये १३:४८, NW) आपल्या दिवसांत यहोवा अशा योग्य प्रवृत्तीच्या लोकांना स्वतःकडे एकत्र करत आहे. (हाग्गै २:७) अशा लोकांना यहोवाचे उपासक होण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो?

२. शिष्य बनवण्याच्या आपल्यावर सोपवलेल्या कामगिरीत कशाकशाचा समावेश आहे?

२ न विसरता पुन्हा भेट द्या: शिष्य बनवण्याची आपल्यावर सोपवलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी पुनःभेटीबद्दल आपला उचित दृष्टिकोन असला पाहिजे. (मत्त. २८:१९, २०) लोक आस्था दाखवतात तेव्हा आपण लगेच त्यांना जाऊन भेटतो का? जे साहित्य घेतात किंवा सुवार्तेमध्ये आवड दाखवतात अशांना आपण पुन्हा भेटतो का? त्यांना आध्यात्मिकरीत्या मदत करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करतो का? लोकांचे जीवन पणाला लागलेले असल्यामुळे, लोक आवड दाखवतात तेव्हा ती वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

३. एखाद्या आस्थेवाईक व्यक्‍तीबरोबर चर्चा केल्यानंतर आपण काय केले पाहिजे?

३ एखाद्या आस्थेवाईक व्यक्‍तीबरोबर तुम्ही केलेली चर्चा तुमच्या मनात अद्याप ताजी आहे तोपर्यंत तिचे नाव आणि पत्ता लिहून ठेवा. तुम्ही कोणत्या विषयावर चर्चा केली, कोणती शास्त्रवचने वाचून दाखवली आणि कोणते साहित्य दिले तेही लिहून ठेवा. मग, होता होईल तितक्या लवकर तिला भेटण्याचा प्रयत्न करा.

४. आपण प्रभावकारी पुनःभेटी कशाप्रकारे देऊ शकतो?

४ पुनःभेट देणे: पुनःभेट द्यायला गेल्यावर घरमालकाशी प्रेमाने, मैत्रीपूर्णरीत्या बोला, तुम्हाला त्यांची काळजी आहे ते तुमच्या बोलण्यातून दाखवा. चर्चा साधी आणि शास्त्रवचनांवर आधारित असू द्या. घरमालकास आवडेल अशा एखाद्या बायबल विषयावर चर्चा करा आणि समाप्तीस एक प्रश्‍न तयार करा ज्याचे उत्तर तुम्ही पुढील भेटीच्या वेळी देऊ शकाल. घरमालकाने शास्त्रवचनांनुसार नसलेला एखादा दृष्टिकोन व्यक्‍त केल्यास त्यावर वादविवाद करण्याचे टाळणे बरे राहील. समान विषयांवर चर्चा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करा.—कलस्सै. ४:६.

५. एका पायनियर बांधवाने कोणते प्रयत्न केले आणि त्यांना याचे कोणते प्रतिफळ मिळाले?

५ पुनःभेट द्यायला जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात पण त्याचे प्रतिफळ मात्र समाधानकारक असते. जपानमधील एका पायनियर बांधवाने प्रत्येक महिन्याला होता होईल तितक्या पुनःभेटी देण्याचे ध्येय ठेवले. ते घरोघरी भेटणाऱ्‍या लोकांची नावे आणि पत्ते लिहून ठेवू लागले आणि सात दिवसांच्या आत ते अशा लोकांना पुन्हा भेटायला जायचे. तिथे गेल्यावर आपण काय बोलणार आहोत त्याची ते चांगल्याप्रकारे तयारी करू लागले आणि आपल्याजवळचा संदेश पूर्ण आत्मविश्‍वासाने सांगू लागले. त्यांच्या एका भेटीदरम्यान ते एका व्यक्‍तीबरोबर बायबल अभ्यास सुरू करू शकले जी त्यांना अशी म्हणाली होती: “मी तुम्हा लोकांचं कधीच ऐकून घेतलेलं नाही. पण ही माझी पहिलीच वेळ आहे.” या पायनियर बांधवाला त्यांनी प्रेमळपणे दाखवलेल्या चिकाटीचे प्रतिफळ मिळाले. महिन्याच्या शेवटी त्यांनी दहा बायबल अभ्यासांचा रिपोर्ट दिला.

६. आपण पुनःभेटी का देत राहिले पाहिजे?

६ लोकांच्या परिस्थितीत सतत बदल होत असतो. (१ करिंथ. ७:३१) एखादी आस्थेवाईक व्यक्‍ती अनेक भेटींनंतर पुन्हा घरी सापडते. न विसरता पुनःभेटी देण्याद्वारे आपण योग्य असलेल्यांना सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्‍या मार्गावर येण्यास मदत करू शकतो.—मत्त. ७:१३, १४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा