पुनर्भेटींची जबाबदारी स्वीकारा
१ पुनर्भेटीच्या कार्यात शक्य आहे तितक्या अधिक प्रमाणात सहभागी होण्याची बरीच उत्तेजक कारणे आहेत. आपल्याला जे काम सोपून दिले आहे ते पौलाप्रमाणे कसून पूर्ण करण्याची आमची इच्छा आहे. (प्रे. कृत्ये २०:२१, २४) सर्व आस्थेवाईक व्यक्तींची भेट घेण्यात आपण सातत्य राखले तर आपले सेवकपण पूर्ण रितीने उरकताना आपल्याला चांगला विवेकभाव राखता येईल.—२ तीम. ४:५.
२ ज्ञान आम्हाला जबाबदार ठरवतेः वास्तविकपणे, जीवन पणाला लागले आहे ही वस्तुस्थितीच आपल्याला पुनर्भेटीचे कार्य करण्यात प्रेरणादायक ठरली पाहिजे. (योहान १७:३) आम्हाला यहोवाच्या न्यायदंडाबद्दल आणि आर्मगिदोनच्या समीपतेबद्दल असणारे ज्ञान, दुष्टांना केवळ इशारा देण्यातच नव्हे, तर जे ‘पृथ्वीवर घडत असलेल्या गोष्टीमुळे दुःख करीत व उसासे टाकीत आहेत’ अशांना देखील मदत करण्याचे उत्तेजन देणारे ठरले पाहिजे. (यहे. ९:४) अशांना यहोवाच्या दृश्य संस्थेच्या सान्निध्यात आणले पाहिजे.
३ लोकांना अचूकपणे सत्य समजून देण्याची मदत करण्याची गरज आहे. (प्रे. कृत्ये ८:३०, ३१; १८:२६) यास्तव, आम्ही पेरलेल्या सत्याच्या बीजास “पाणी घालण्यासाठी” परत जाण्यासाठी आमची जबाबदारी पूर्ण करायचे हे आणखी एक कारण आहे. आम्हाला यहोवा व त्याच्या अद्भूत उद्देशांचे अचूक ज्ञान संपादण्यात जर कोणी आमच्याकडे वारंवार परत येऊन मदत दिली नसती तर आतापर्यंत आपण केवढी आध्यात्मिक प्रगती साध्य केली असती?—मत्तय ७:१२.
४ प्रीती व उत्साह दाखवा: आम्हाला लोकाबद्दल प्रेम आहे हे पुनर्भेटी घेण्याद्वारे उत्तम प्रकाराने दाखवता येते. नियमित पायनियर या नात्याने सेवा करणारा एक अंध बांधव म्हणतोः “माझा बाप्तिस्मा झाल्यावर, मी पवित्र शास्त्रातून काय शिकलो ते लोकांना सांगण्याची माझी तळमळीची इच्छा राहिली आहे. माझे अपंगत्व याबाबतीत मला आड आले नाही याचा मला आनंद वाटतो. . . . मी प्रत्येक घर व रस्त्याची मानसिक नोंद कशी ठेवावी हे शिकून घेतले आहे व यामुळेच पवित्र शास्त्राच्या अभ्यासाबाबत रस दाखविणाऱ्या आस्थेवाईक लोकांची मी परत भेट घेऊ शकतो.” हा बंधू आपल्या अंतःचक्षूंद्वारे खरेपणाने बघू शकतो आणि इतरांबद्दल आपले ख्रिस्ती प्रेम व्यक्त करण्यापासून व त्यांची पुनर्भेट घेण्यापासून स्वतःला मागे ठेवत नाही.
५ पुनर्भेटी घेताना आपल्याला पवित्र शास्त्राचा चांगला वापर करुन आम्हामध्ये असणाऱ्या आशेचे चांगले कारण देता येते. (१ पेत्र ३:१५) हे केवळ घरमालकासच मदत देत नसून ते आम्हास सत्याबद्दल वाटणारा उत्साह व कदर यांनाही प्रज्वलित करते. पुनर्भेटीचे कार्य करण्यामुळे असा आनंद मिळतो की जो इतर कोणा मार्गाने मिळू शकणार नाही. त्या आनंदाची उत्तमता कधी कमी होण्याची जरुरी नाही. ती आवेशाने पुनर्भेटी घेत राहून सातत्याने नवी बनवता येते.—नीती. १०:२२.
६ आम्ही पुनर्भेटी घेण्याची आमची जबाबदारी गंभीरपणे घेतली पाहिजे. यहोवाचे लोक इतरांना चांगल्या गोष्टी प्राप्त होण्यापासून दूर ठेवीत नाहीत व हे आमच्या १९९१ च्या सेवावर्षातील जगव्याप्त कार्याद्वारे स्पष्ट दिसून येऊ शकते. (नीती ३:२७) आम्ही ३४,४९,२६,९५२ पुनर्भेटी केल्या व ३९,४७,२६१ पवित्र शास्त्र अभ्यास चालविले. याचा परिणाम ३,००,९४५ नव्या शिष्यांनी यहोवा देवाला स्वतःचे समर्पण करुन बाप्तिस्मा घेतला. एवढी ही अद्भूत वाढ, आम्ही पुनर्भेटी घेण्याची आमची जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली नसती तर कधीच साध्य करता आली नसती.—१ थेस्स. २:८.