रक्त वर्ज्य करण्यासाठी आपल्याला साहाय्य करणाऱ्या तरतूदी
ज्या प्रचारकांनी, आगाऊ वैद्यकीय सूचना/मुक्तता कार्ड किंवा ओळख पत्र भरले परंतु त्यावर तारीख लिहिली नाही किंवा त्या कार्डावर ३/९९ ही छापील तारीख नसेल तर त्यांना या वर्षी नवीन कार्ड बनवण्याची गरज नाही. सेवा सभेत, डिसेंबर २९ ने सुरू होणाऱ्या सप्ताहात मंडळीच्या सचिवांनी नव्याने बाप्तिस्मा घेतलेल्या प्रचारकांसाठी, त्यांच्या मुलांसाठी आणि ज्यांना कार्डस् नवीन बनवण्याची गरज आहे अशा प्रचारकांना पुरेल इतक्या कार्डांचा पुरेसा साठा ठेवला पाहिजे. ऑगस्टमध्ये सर्व मंडळ्यांना, फॉर्म्सच्या वार्षिक साठ्याबरोबर या कार्ड्यांचा देखील साठा पाठवण्यात आला होता. त्यांच्याकडे पुरेसे कार्डस् नसतील तर सचिव जवळपासच्या मंडळीकडे जादा कार्डस् असल्यास मागू शकतात किंवा मंडळीच्या पुढील लिटरेचर रिक्वेस्टच्या वेळी मागणी करू शकतात.
सर्वांनी हे कार्ड आपापल्या घरी भरावे परंतु त्यावर सही करू नये. मंडळीच्या पुढील पुस्तक अभ्यासानंतर, पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांच्या मदतीने कार्डांवर साक्षीदारांसमोर सही करावी व तारीख लिहावी. कार्डावर साक्षीदार म्हणून जे सही करणार आहेत त्यांनी प्रचारकाला कार्डावर सही करताना पाहिले पाहिजे.
बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक, आगाऊ वैद्यकीय सूचना/मुक्तता कार्डाच्या आणि ओळख पत्राच्या आशयाचे एक कार्ड स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी बनवू शकतात.