वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०३ पृ. ७
  • देवाची उपासना पुस्तकाचा अभ्यास

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाची उपासना पुस्तकाचा अभ्यास
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या जवळ या पुस्तकाच्या अभ्यासातून फायदा प्राप्त करा
    आमची राज्य सेवा—२००४
  • बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकाच्या अभ्यासाचा आस्वाद घ्या
    आमची राज्य सेवा—२००६
  • मंडळीचा पुस्तक अभ्यास —आपल्याला त्याची गरज का आहे
    आमची राज्य सेवा—२००४
  • आपण कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत
    आमची राज्य सेवा—१९९७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ९/०३ पृ. ७

देवाची उपासना पुस्तकाचा अभ्यास

एकमेव खऱ्‍या देवाची उपासना करा पुस्तक, नवीन लोकांसोबत ज्ञान पुस्तकाचा अभ्यास संपल्यावर अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. मंडळीच्या पुस्तक अभ्यासात या प्रकाशनाचा अभ्यास केल्याने सेवाकार्यात याचा उपयोग करण्यासाठी आणि यहोवा व त्याच्या संघटनेबद्दल आपली प्रीती आणि कदर वाढवण्यासाठी आपण सज्ज असू. देवाची उपासना पुस्तकाच्या अभ्यासाचा पूर्ण फायदा आपल्याला कसा होऊ शकेल?

अभ्यास संचालित करणे: प्रत्येक आठवडी आपण एका संपूर्ण अध्यायाचा अभ्यास करणार असल्यामुळे पुस्तक अभ्यास संचालकांनी वेळेचा योग्य वापर करावा. सुरवातीच्या परिच्छेदांवर जास्त वेळ न दवडता त्यांनी महत्त्वपूर्ण साहित्यासाठी—जे सहसा अध्यायाच्या शेवटच्या परिच्छेदांमध्ये असते त्यासाठी वेळ द्यावा. प्रत्येक अभ्यासाच्या शेवटी असलेल्या उजळणी पेटीची संक्षिप्त चर्चा केल्याने उपस्थितांना मुख्य मुद्दे लक्षात ठेवायला मदत होईल.

मनन आणि चर्चेकरता वेगळे दिलेले प्रश्‍न, देवाची उपासना पुस्तकातील जवळजवळ निम्म्या अध्यायांत सापडतील. याचे एक उदाहरण पृष्ठे ४८-९ वर सापडेल. हे प्रश्‍न परिच्छेदासोबत वाचण्याची गरज नाही. गटासोबत याची चर्चा करतेवेळी उल्लेखित शास्त्रवचने वाचून वेळेनुसार त्यावर टिपणी मांडायला पर्यवेक्षकांनी विचारावे.

आगाऊ तयारी: अभ्यासाची चांगली तयारी म्हणजे फक्‍त उत्तरे अधोरेखीत करणे इतकेच नव्हे. उल्लेखित शास्त्रवचनांवर प्रार्थनापूर्वक मनन केल्याने केवळ टिपणी तयार करण्यास नव्हे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले हृदय तयार करण्यास आपल्याला मदत मिळेल. (एज्रा ७:१०) माफक प्रमाणात उत्तरे देऊन सर्वजण एकमेकांना प्रोत्साहन देण्यात हातभार लावू शकतात.—रोम. १:११, १२.

देवाची उपासना पुस्तकाच्या आपल्या अभ्यासाने यहोवाच्या निकट जाण्यास आणि प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना आपल्यासोबत मिळून त्याची उपासना करण्यास मदत मिळेल. (स्तो. ९५:६; याको. ४:८) आपल्या सर्वांना या उत्तम आध्यात्मिक तरतुदीचा पूर्ण फायदा मिळो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा