आपण कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत
तुम्हाला हे जाणण्यास आनंद वाटेल की, ऑक्टोबर ६, १९९७ च्या आठवड्यापासून मंडळीच्या पुस्तक अभ्यासात कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक अभ्यासिले जाणार आहे. आनंदी कौटुंबिक जीवनावरील व्यावहारिक शास्त्रवचनीय मार्गदर्शकाचा एकत्रित अभ्यास कोणालाही चुकवावासा वाटणार नाही. अभ्यासाचा आराखडा पुस्तकातील प्रत्येक परिच्छेदाचे आणि बायबल वचनाचे कसून परीक्षण करण्यास वाव देईल.
अभ्यासाच्या पहिल्या आठवड्यात, संपूर्ण पहिल्या अध्यायाचा अभ्यास केला जाईल कारण त्यामध्ये काही उद्धृत न केलेली शास्त्रवचने आहेत. अध्याय १५ देखील यामुळेच एकाच सत्रात अभ्यासला जाईल. परंतु, बाकीच्या अध्यायांचे दोन विभाग करून प्रत्येक आठवडी जवळजवळ अर्धा अध्याय अभ्यासला जाईल. अशाप्रकारे, सर्व उल्लेखित शास्त्रवचने काढून वाचायला आणि त्यांच्यावर चर्चा करायला त्याचप्रमाणे प्रत्येक परिच्छेदातील सर्व उद्धृत शास्त्रवचनांच्या अवलंबाचे काळजीपूर्वक परीक्षण करण्यास पुरेसा वेळ असेल.
प्रत्येक अध्यायाच्या शेवटी दिलेल्या शिक्षण पेटीमधील मजकूराची चर्चा हे अभ्यासातले एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असेल. म्हणून, पेटीमध्ये दिलेल्या प्रश्नांवर आणि उल्लेखित वचनांवर विचार करायला भरपूर वेळ दिला जावा.
मंडळीच्या पुस्तक अभ्यास चालकांना आपल्या अभ्यासाच्या तयारीकडे खास लक्ष देण्याकरता त्याचप्रमाणे त्यांच्या गटातील सर्वांना आणि नवीन जणांनाही चांगली तयारी करायला, नियमितपणे उपस्थित राहायला आणि सहभाग घ्यायला उत्तेजन देण्याकरता आर्जविले जाते.—omMR ७४-६.