घोषणा
▪ साहित्य सादरता सप्टेंबर: “तुझे राज्य येवो,” किंवा “सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?” किंवा ज्याची पाने पिवळी पडू शकतात किंवा ज्याचा रंग बदलू शकतो, असे १९२ पानी कोणतेही पुस्तक किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तक दिले जाऊ शकते. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! दोन्हींची एक-एक प्रत सादर करा. घरमालक आस्था दाखवतो तेव्हा, अपेक्षा माहितीपत्रक सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी खास प्रयत्न करा. नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? माहितीपत्रक किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तक सादर करा. ज्या घरमालकांकडे ही प्रकाशने आधीच आहेत त्यांना एकमात्र खऱ्या देवाची उपासना करा (इंग्रजी) किंवा इतर कोणतेही जुने प्रकाशन सादर करा. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून तुम्ही, बायबल कथांच माझं पुस्तक किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तके सादर करू शकता.
▪ शाखा दप्तर प्रचारकांच्या वैयक्तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्याला मंडळीत याची घोषणा करण्याची व्यवस्था करावी; जेणेकरून ज्यांना साहित्य हवे आहे ते संबंधित बांधवाकडे त्याची ऑर्डर देऊ शकतील. कोणती प्रकाशने खास मागणीची (स्पेशल रिक्वेस्ट) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.
▪ बहिष्कृत झालेली किंवा स्वतःला अलिप्त करून घेतलेली व्यक्ती पुन्हा मंडळीत येऊ इच्छित असेल तर त्याविषयी टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९९२, पृष्ठे १६-१८ वर दिलेल्या सूचना अनुसरण्यास सर्व वडिलांना आठवण करून दिली जाते.
▪ आमची राज्य सेवेच्या या अंकातील पुरवणीत, ज्ञान पुस्तकाच्या सादरता सुचवल्या आहेत. तुमच्या साक्षकार्याच्या क्षेत्रात होता होईल तितक्या सादरतांचा उपयोग करा आणि तुम्हाला किती चांगले परिणाम मिळतात ते पाहा.
▪ बंगळूर येथील शाखा दफ्तराला, लोणावळ्याच्या पत्त्यावर पाठवलेली अनेक पत्रे मिळत आहेत. ही पत्रे खासकरून, आपली प्रकाशने वाचलेल्या आस्थेवाईक लोकांकडून येतात ज्यांना अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे परंतु ज्यांच्याकडे साक्षीदारांनी पुन्हा भेट दिलेली नाही. नियतकालिके आणि अलीकडे छापण्यात आलेली साहित्ये सोडून बाकीच्या आपल्या बहुतेक प्रकाशनांवर लोणावळ्याचाच पत्ता आहे. शिवाय, मंडळ्यांकडे आणि प्रचारकांकडे जो साहित्याचा साठा आहे त्यावरही लोणावळ्याचाच पत्ता असेल. यामुळे, हा साठा संपेपर्यंत व अधिक पुन्हा छापेपर्यंत आम्ही सर्व प्रचारकांना अशी विनंती करत आहोत की त्यांनी साहित्य देताना त्यावरील जुना पत्ता खोडून त्याऐवजी बंगळूरचा नवा पत्ता घरमालकाला द्यावा. यामुळे, पत्रे लोणावळ्याला जाण्याचे आणि अशा पत्रांना उत्तरे देण्यात होणाऱ्या विलंबाचे प्रमाण निदान काही प्रमाणात तरी कमी होऊ शकेल.
▪ २००४ स्मारकादरम्यान, एप्रिल १८, रविवार रोजी खास जाहीर भाषण दिले जाईल. भाषणाच्या विषयाची घोषणा नंतर केली जाईल. भाषणाच्या आठवड्यादरम्यान ज्या मंडळ्यांची विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल किंवा संमेलन असेल त्या मंडळ्यांमध्ये हे भाषण पुढील आठवडी दिले जाऊ शकते. कोणत्याही मंडळीत हे खास जाहीर भाषण एप्रिल १८, २००४ च्या आधी दिले जाऊ नये.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण —हिंदी
जीवनाचा उद्देश काय आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? —बंगाली, मराठी, हिंदी
देव खरोखरी आपली काळजी करतो का? —कन्नड, गुजराती, बंगाली, मराठी, हिंदी
मेल्यावर आपले काय होते? —इंग्रजी
यहोवाचे गुणगान करा (२९ गीते) —हिंदी
कुरुक्षेत्र ते हर्मगिदोनपर्यंत—आणि तुमचा बचाव —कन्नड, गुजराती, तामीळ, तेलगू, बंगाली, मल्याळम, हिंदी
मरणावर विजय—तो तुम्हाकरता शक्य आहे का? —नेपाळी
नशीबाचे आपल्या जीवनावर नियंत्रण आहे की देव आपल्याकडून जाब विचारणार आहे? (मुस्लिमांकरीता) (पत्रिका क्र. ७१) —उर्दू