यहोवाच्या जवळ या पुस्तकाच्या अभ्यासातून फायदा प्राप्त करा
१ “राज्याचे आवेशी प्रचारक” या प्रांतीय अधिवेशनात यहोवाच्या जवळ या, (इंग्रजी) हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले तेव्हा आपल्याला किती आनंद झाला होता. पुष्कळांनी लगेच ते वाचून काढले. यात काही शंका नाही की आणखी इतरांनाही, “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल” या २००३ सालाच्या वार्षिक वचनामुळे प्रेरणा मिळाली.—याको. ४:८.
२ मार्च महिन्यापासून आपण आपल्या मंडळीच्या पुस्तक अभ्यासात, यहोवाच्या जवळ या पुस्तकाचा अभ्यास सुरू करणार आहोत. या अभ्यासातून पुरेपूर फायदा आपण कसा प्राप्त करू शकतो? यासाठी तयारीची आवश्यकता आहे. एक अध्याय दोन आठवडे अभ्यासला जाईल; प्रत्येक आठवड्याच्या अभ्यासासाठी कमी परिच्छेदांची चर्चा केली जाईल. यामुळे पुस्तकातील साहित्याचा तुम्ही केलेला अभ्यास आणि मनन याच्या आधारावर तुम्हाला मनापासून उत्तरे देण्यास पुरेसा वेळ मिळेल. शिवाय, एका अध्यायाच्या समारोपाची उजळणी ज्या आठवड्यांत होईल त्या आठवडी आणखी कमी परिच्छेदांची चर्चा करण्यात येईल; यामुळे या पुस्तकाच्या एका खास वैशिष्ट्याचा उपयोग करण्यास पुरेसा वेळ मिळेल.
३ अध्याय २ पासून, “मनन करण्यासाठी प्रश्न” नावाची एक पेटी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी तुम्हाला दिसेल. अध्यायाच्या शेवटल्या परिच्छेदाची चर्चा झाल्यानंतर, पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक गटाबरोबर या पेटीची चर्चा करतील. ते गटातील सदस्यांना आपले विचार व्यक्त करण्यास, शास्त्रवचनांवर मनन केल्यामुळे त्यांना कोणते प्रतिफळ मिळाले ते सांगण्यास उत्तेजन देतील. (नीति. २०:५) पेटीतील प्रश्नांव्यतिरिक्त, ते कदाचित पुढील प्रश्न देखील विचारू शकतील; जसे की: “या माहितीवरून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळाले? याचा तुमच्या जीवनावर प्रभाव कसा पडतो? इतरांना मदत करण्याकरता तुम्ही या माहितीचा उपयोग कसा करू शकता?” त्यांचे हे ध्येय असेल, की बंधूभगिनींनी आपल्या शब्दांत उत्तरे द्यावीत, बारीकसारीक तपशीलांबाबत ते गटाची तोंडी परीक्षा घेतल्याप्रमाणे प्रश्न विचारणार नाहीत.
४ यहोवाच्या जवळ या हे पुस्तक इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे. ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी’ येणारी सर्व प्रकाशने तसे यहोवाचे गौरव करतात परंतु, या संपूर्ण पुस्तकात यहोवाच्या गुणांची चर्चा करण्यात आली आहे. (मत्त. २४:४५-४७) तेव्हा, आपल्यासमोर किती सुरेख संधी आहे! यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाच्या सखोल अभ्यासामुळे आपल्याला खूप फायदा होणार आहे. या अभ्यासामुळे आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या आणखी जवळ येऊ या आणि इतरांना असे करण्यास मदत करण्यात आणखी तरबेज होऊ या.