मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! जुलै-सप्टें.
“आपल्या सर्वांना, मलेरिया, डेंग्यू आणि पित्तज्वर टाळण्याची इच्छा आहे. कीटकांमुळे होणाऱ्या रोगांपासून आपण स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही पावले उचलू शकतो हे तुम्हाला माहीत होते का? [उत्तर ऐका.] या नियतकालिकात त्यांची चर्चा केली आहे तसेच, आजारपण राहणार नाही अशा काळाविषयी देवाने दिलेल्या अभिवचनाविषयी देखील यात सांगितले आहे.” यशया ३३:२५ हे वचन वाचून संभाषण समाप्त करा.
टेहळणी बुरूज ऑग.१५
“पुष्कळ लोकांना चांगले नाव कमावणे महत्त्वाचे वाटते. काही असाही विचार करतात की त्यांचा मृत्यू झाल्यानंतर लोक त्यांची काय म्हणून आठवण ठेवतील. याविषयी तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तर ऐका. आणि मग उपदेशक ७:१ वाचा.] या टेहळणी बुरूज नियतकालिकात, आपण मनुष्यांसमोर व देवासमोर चांगले नाव कसे कमावू शकतो ते सांगितले आहे.”
सावध राहा! जुलै-सप्टें.
“कठोर बोलण्यामुळे, विवाह कमजोर होऊ शकतो याजशी तुम्ही सहमत असाल. [उत्तर ऐका.] ‘मनाला झोंबणारे शब्द टाळा,’ या लेखात कौटुंबिक नातेसंबंध मजबूत करणारे शब्द वापरण्याविषयीचे वर्णन देण्यात आले आहे.” समाप्तीस इफिसकर ४:२९ वचन वाचून दाखवा.
टेहळणी बुरूज सप्टें.१
“आज पुष्कळ लोकांना वाटते, की मानवजातीचे विविध धर्म, एकाच ठिकाणी जाणारे विविध मार्ग आहेत. काहींचा असा विश्वास आहे, की केवळ एकच खरा धर्म आहे. याविषयी तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तर ऐका.] या नियतकालिकात, एका प्राचीन दृष्टान्ताविषयी सांगितले आहे जो या प्रश्नावर प्रकाश टाकतो.” मत्तय १३:२४-३० वाचा.