वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०३ पृ. ८
  • पायनियर सेवेची प्रतिफळे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पायनियर सेवेची प्रतिफळे
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • पायनियर सेवेचे वरदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • पायनियरांना आधार देणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • पायनियरिंगमुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • आमच्या पायनियरांविषयी रसिकता दाखविणे
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ८/०३ पृ. ८

पायनियर सेवेची प्रतिफळे

१, २. कोणते आशीर्वाद पायनियर सेवेशी जवळून संबंधित आहेत व का?

१ एका पायनियर बांधवाने म्हटले, की “इतरांना सत्य सांगितल्यामुळे मला जे समाधान मिळाले ते इतर कोणत्याही कार्यामुळे मिळाले नसते, हे मला माहीत आहे.” दुसऱ्‍या एका पायनियर भगिनीने म्हटले: “प्रत्येक दिवसाच्या शेवटी मला रात्रीची गोड झोप लागते आणि माझं मन प्रफुल्लित असतं.” हे पायनियर, पायनियर सेवेतील आशीर्वादांचा अनुभव घेतलेल्या बंधूभगिनींचे मनोगत व्यक्‍त करतात.—नीति. १०:२२.

२ देवाच्या वचनातील जीवनरक्षक ज्ञान प्राप्त करण्यास इतरांना मदत केल्याने खरे समाधान मिळते. (प्रे. कृत्ये २०:३५; १ थेस्सलनी. २:१९, २०) अनेक वर्षांपासून पायनियरींग करणाऱ्‍या एका बांधवाने लिहिले: “लोकांना आपल्या जीवनात बदल करण्याची प्रेरणा देणारी जबरदस्त शक्‍ती देवाच्या वचनात आहे, हे पाहणे खरोखर किती मनोरंजक व विश्‍वास मजबूत करणारे आहे.” होय, लोकांना मदत करण्याची तयारी दर्शवण्याद्वारे व त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास करण्याद्वारे हे पायनियर अशाप्रकारचा आशीर्वाद मिळवतात.

३, ४. पायनियरींगमुळे एखादी व्यक्‍ती यहोवावर विसंबून राहण्यास कशी शिकते आणि यामुळे तिला आध्यात्मिकरीत्या प्रगती करण्यास मदत कशी मिळते?

३ यहोवावर विसंबून राहणे: दररोज सेवा करत असताना देवाच्या पवित्र आत्म्यावर विसंबून राहिल्याने पायनियरांना “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” विकसित करण्यास मदत मिळते आणि त्यांचे संरक्षणही होते. (गलती. ५:१६, २२, २३) याशिवाय, पायनियर सतत देवाचे वचन हाताळत असल्यामुळे, सत्याचे समर्थन करण्यासाठी व इतरांना मजबूत करण्यासाठी शास्त्रवचनांचा उपयोग करण्यात ते तरबेज होतात. (२ तीम. २:१५) अनेक दशकांपासून पायनियरींग करणाऱ्‍या एका बांधवाने म्हटले: “पायनियरींगमुळे मी बायबलचे सखोल ज्ञान घेऊ शकलो; आणि या ज्ञानाचा उपयोग मी अनेक लोकांना यहोवा आणि त्याचे उद्देश यांच्याविषयी जाणण्यास मदत करण्याकरता करू शकलो आहे.” किती संतुष्टी देणारे हे कार्य आहे!

४ सामान्य पायनियरींग करणाऱ्‍या बंधूभगिनींनी देखील इतर अनेक मार्गांद्वारे यहोवावर विसंबून राहिले पाहिजे. आपल्या भौतिक गरजा भागवण्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवा कसा आशीर्वाद देतो हे पाहून त्यांचा विश्‍वास आणखी मजबूत होतो. ५५ वर्ष सामान्य पायनियरींग केलेल्या एका ७२ वर्षीय बांधवाने म्हटले: “यहोवानं मला कधीच निराश केलं नाही.” शिवाय, आपली राहणीमान साधी ठेवून पायनियर स्वतःला जीवनाच्या चिंतांपासून सुरक्षित ठेवतात. हे तुम्हाला अपीलकारक वाटत नाही का?—मत्त. ६:२२; इब्री १३:५, ६.

५. पायनियरींगमुळे एखादी व्यक्‍ती यहोवाच्या समीप कशी येऊ शकते?

५ यहोवाच्या समीप येणे: यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध सर्वात अमूल्य ठेवा आहे. (स्तो. ६३:३) यहोवावरील प्रेमापोटी आपण क्षेत्र सेवेत पूर्ण मनाने भाग घेतो तेव्हा हा नातेसंबंध आणखी बळकट होतो. (याको. ४:८) १८ वर्षांपेक्षा अधिक वर्षे पायनियरींग करणाऱ्‍या एका पायनियर बांधवाने म्हटले: “पायनियर सेवेमुळे आपण ‘यहोवा किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेऊन’ पाहू शकतो; आपल्या निर्माणकर्त्यासोबत आपण दररोज आपल्या नात्याचा एक एक धागा घट्ट विणू शकतो.”—स्तो. ३४:८.

६. पायनियरांजवळ कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत आणि पायनियरांव्यतिरिक्‍त आणखी कोणाला फायदा होतो?

६ आवश्‍यक ती परिस्थिती असण्याव्यतिरिक्‍त पायनियरांकडे भक्कम विश्‍वास, देव आणि शेजाऱ्‍यांबद्दल खरे प्रेम आणि त्याग करण्याची स्वेच्छा या गोष्टी असल्या पाहिजेत. (मत्त. १६:२४; १७:२०; २२:३७-३९) परंतु पायनियरांचा उजळता चेहरा पाहून आपण सांगू शकतो की पायनियर सेवेमुळे मिळणारे आशीर्वाद किती सरस असतात. (मला. ३:१०) हे आशीर्वाद फक्‍त पायनियरांपुरतेच मर्यादित नसतात तर पायनियरांच्या उत्तम मनोवृत्तीमुळे त्यांच्या कुटुंबांना आणि मंडळीला देखील बराच लाभ होतो.—फिलिप्पै. ४:२३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा