वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०३ पृ. १
  • तजेला देणारे काम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तजेला देणारे काम
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • “माझे जू आपणावर घ्या”
    आमची राज्य सेवा—२००८
  • “कष्ट करणाऱ्‍या . . . लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • “माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • येशूने तजेला दिला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ८/०३ पृ. १

तजेला देणारे काम

१ बायबलचा संदेश स्वीकारून तो आपल्या जीवनात लागू करणाऱ्‍या सर्वांना तजेला मिळतो. (स्तो. १९:७, ८) त्यांना खोट्या शिकवणुकी आणि हानीकारक प्रथांपासून मुक्‍त होण्यास मदत मिळते आणि भवितव्यासाठी विश्‍वसनीय आशा मिळते. परंतु सुवार्तेचा स्वीकार करणाऱ्‍यांनाच केवळ लाभ होतो असे नाही. बायबल सत्य इतरांना जे सांगतात त्यांना देखील तजेला मिळतो.—नीति. ११:२५.

२ सेवेमुळे स्फूर्ती मिळते: प्रचार व शिष्य बनवण्याच्या कार्याचा समावेश असलेल्या ख्रिस्ती शिष्यत्वाचे जू स्वीकारणाऱ्‍यांच्या “जिवांस विसावा मिळेल” असे येशूने म्हटले होते. (मत्त. ११:२९) इतरांना साक्ष दिल्याने स्फूर्ती मिळते, हे त्याने स्वतः अनुभवले होते. हे कार्य त्याच्यासाठी अन्‍नासारखे होते. (योहा. ४:३४) त्याने ७० शिष्यांना प्रचारासाठी पाठवले तेव्हा, आपल्या प्रयत्नांवर यहोवाचे आशीर्वाद आहेत हे पाहून त्यांना आनंद वाटला.—लूक १०:१७.

३ अशाचप्रकारे, आज अनेक ख्रिस्ती बंधूभगिनींना प्रचार कार्यात भाग घेतल्याने स्फूर्ती मिळते. एका बहिणीने म्हटले: “ख्रिस्ती सेवा तजेला देणारी आहे कारण यामुळे माझ्या जीवनाला दिशा मिळते, उद्देश प्राप्त होतो. मी सेवेत भाग घेते तेव्हा माझ्या व्यक्‍तिगत समस्या आणि दररोजचे ताणतणाव कमी होतात.” आणखी एका आवेशी बहिणीने म्हटले: “सेवेमुळे मला दररोज याची आठवण होते, की यहोवा वास्तविक आहे; मला शांती मिळते आणि आतून एकप्रकारचा आनंद मिळतो जो इतर कोणत्याही गोष्टीतून मिळू शकत नाही.” “देवाचे सहकारी” होण्याचा केवढा मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे!—१ करिंथ. ३:९.

४ ख्रिस्ताचे जू दयाळू आहे: ख्रिश्‍चनांना “नेटाने यत्न” करण्यास आर्जवण्यात आलेले असले तरी, आपण जेवढे देऊ शकतो त्याच्यापेक्षा अधिक देण्याची मागणी येशू करत नाही. (लूक १३:२४) तो आपल्याला ‘त्याच्याबरोबर त्याचे जू घेण्याचे’ प्रेमळपणे आमंत्रण देतो. (मत्त. ११:२९, NW तळटीप) कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्‍यांनी ही खात्री बाळगावी की त्यांची पूर्ण मनाची सेवा मग ती मर्यादित असली तरी देवाला संतोषविणारी आहे.—मार्क १४:६-८; कल. ३:२३.

५ आपण अशा एका देवाची सेवा करत आहोत ज्याला, त्याच्या नावासाठी आपण जे काही करतो त्याची कदर आहे; किती तजेला देणारा हा विचार आहे! (इब्री ६:१०) तेव्हा, आपण सर्वात उत्तम सेवा त्याला देण्याचा सदोदित यत्न करू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा