वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०८ पृ. १
  • “माझे जू आपणावर घ्या”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “माझे जू आपणावर घ्या”
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • “माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • येशूने तजेला दिला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • “कष्ट करणाऱ्‍या . . . लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • आध्यात्मिक गोष्टींमधून आनंद मिळवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km ५/०८ पृ. १

“माझे जू आपणावर घ्या”

१ आपण ताणतणाव आणि चिंतांनी भरलेल्या जगात राहत आहोत. पण, येशूचे जू आपल्यावर घेण्याच्या त्याच्या प्रेमळ निमंत्रणाला प्रतिसाद दिल्यामुळे आपल्याला खऱ्‍या अर्थाने विसावा मिळाला आहे. (मत्त. ११:२९, ३०) येशूचे जू स्वीकारून त्याचे शिष्य बनल्यामुळे आपण अशा एका कार्यात सामील होतो, जे आव्हानात्मक तर आहेच, पण त्यामुळे मनास विसावा मिळतो. या कार्यात, देवाच्या राज्याच्या संदेशाचा प्रचार करणे व इतरांनाही येशूचे सुलभ जू स्वीकारून विसावा मिळवण्यास मदत करणे समाविष्ट आहे.—मत्त. २४:१४; २८:१९, २०.

२ सेवाकार्याद्वारे विसावा मिळवणे: येशू आपल्या शिष्यांना आपले जू स्वीकारून, ते आधीच वाहत असलेल्या ओझ्यात भर घालण्यास सांगत नव्हता. उलट, त्यांच्या भारी ओझ्याऐवजी आपले हलके ओझे त्यांनी घ्यावे असे येशू सुचवत होता. येशूचे जू स्वीकारल्यावर या जगातील चिंता आणि निराशा यांच्या ओझ्याखाली आपण दबून जात नाही. तसेच, आज आहे पण उद्या नाही अशा अनिश्‍चित धनासाठी आपण वायफळ परिश्रम करत नाही. (लूक २१:३४; १ तीम. ६:१७) जरी आपण व्यग्र असलो आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मेहनत करणे भाग असले, तरी देवाच्या उपासनेला आपण सर्वात जास्त महत्त्व देतो. (मत्त. ६:३३) जीवनात कोणत्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत हे जर आपण ध्यानात ठेवले तर आपल्याला आपले सेवाकार्य ओझ्यासारखे वाटणार नाही. उलट आपल्याला त्यातून नेहमी आनंद व तजेला मिळेल.—फिलिप्पै. १:१०.

३ सहसा, आपल्याला प्रिय वाटणाऱ्‍या गोष्टींबद्दल बोलण्यास आपल्याला आनंद होतो. (लूक ६:४५) यहोवा आणि त्याने वचन दिलेल्या राज्याद्वारे मिळणारे आशीर्वाद हे सर्वच ख्रिश्‍चनांचे आस्थेचे विषय आहेत. यामुळे, सेवाकार्य करत असताना रोजच्या चिंता विसरून या ‘चांगल्या गोष्टींच्या सुवार्तेविषयी’ बोलल्याने आपल्याला आनंद होतो. (रोम. १०:१५) अर्थात, एखादे काम आपण जितके जास्त करतो तितकेच आपण त्यात निपुण बनतो आणि साहजिकच यामुळे आपल्याला या कामातून तितकाच जास्त आनंद मिळतो. म्हणूनच, आपल्याला शक्य असल्यास, सेवाकार्यात जास्त वेळ घालवल्याने नक्कीच आपल्याला आणखी तजेला मिळेल. लोक जेव्हा आपल्या प्रचार कार्याला प्रतिसाद देतात तेव्हा आपला उत्साह द्विगुणित होतो. (प्रे. कृत्ये १५:३) पण, लोकांनी आपल्या संदेशात अरुची दाखवली किंवा आपला विरोध केला तरीसुद्धा आपल्या प्रयत्नांमुळे यहोवा आनंदित होतो आणि जे काही चांगले परिणाम मिळतील ते त्याच्याच आशीर्वादाने मिळतील हे जर आपण आठवणीत ठेवले, तर आपले सेवाकार्य आनंददायक ठरेल.—प्रे. कृत्ये ५:४१; १ करिंथ. ३:९.

४ येशूचे निमंत्रण स्वीकारल्यामुळे आपल्याला त्याच्यासोबत मिळून यहोवाचे साक्षीदार या नात्याने सेवा करण्याचा बहुमान मिळतो. (यश. ४३:१०; प्रकटी. १:५) यापेक्षा जास्त आनंद आणि विसावा आपल्याला आणखी कशातूनच मिळू शकत नाही!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा