मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! एप्रिल-जून
“सावध राहा! चा हा अंक, आपल्या काळातील एका दुःखद वास्तविकतेचा अहवाल देतो—बाल वेश्याव्यवसाय. मुलांचे शोषण करण्याच्या या हिणकस प्रकाराला लवकरच आळा घालण्यात येईल असे अभिवचन बायबलमध्ये दिले आहे. [नीतिसूत्रे २:२१, २२ वाचा.] मुलांच्या शोषणामागे काय आहे आणि त्याला लवकरच कसे थांबवले जाईल हे या नियतकालिकात सांगितले आहे.”
टेहळणी बुरूज जून१५
“काही लोकांना वाटते, की येशू हा इतिहासातील सर्वात महान मनुष्य होता. पण इतरजण त्याच्या अस्तित्वावर शंका घेतात. त्याच्याविषयी आपण जो काही विश्वास करतो, ते महत्त्वाचे आहे, असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकल्यावर, प्रेषितांची कृत्ये ४:१२ वाचा.] येशू पृथ्वीवर होऊन गेला याकरता काय पुरावा आहे? या प्रश्नाचे उत्तर या मासिकात दिले आहे.”
सावध राहा! एप्रिल-जून
“शाळेला जाणाऱ्या मुलांना शिकवले जाते, की प्रामाणिकपणा हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. पण तरीसुद्धा पुष्कळ मुले परीक्षांमध्ये कॉपी का करतात? कॉपी केल्याने त्यांना खरोखरच काही फायदा होतो का? [उत्तर ऐका आणि इब्री लोकांस १३:१८ वाचा.] सावध राहा! याच्या या अंकात [पृष्ठ १७ उघडा], कॉपी करण्यात काय हरकत आहे?” या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले आहे.
टेहळणी बुरूज जुलै१
“मानव या नात्याने आपल्या सर्वात मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे, प्रेम करणे आणि प्रेम मिळवणे. [पृष्ठ ४ वरील मथळा वाचा.] तरीदेखील, आधुनिक समाजाचा, इतर गोष्टींना प्राधान्य देण्याकडे कल आहे हे तुम्ही पाहिले आहे का? [उत्तर ऐका.] खरे प्रेम काय आहे आणि ते कसे विकसित करता येते, ते या मासिकात सांगितले आहे.” १ करिंथकर १३:२ वाचा.