वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०३ पृ. ८
  • देवाचे नाव प्रकट करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचे नाव प्रकट करणे
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या थोर नावाचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • देवाचं नाव
    सावध राहा!—२०१७
  • देवाचं नाव काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • यहोवाचं नाव आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ६/०३ पृ. ८

देवाचे नाव प्रकट करणे

१. देवाचे नाव माहीत झाल्यावर लोकांवर कोणता प्रभाव पडू शकतो?

१ देवाचे नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकले तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? अनेकांची प्रतिक्रिया या स्त्रीप्रमाणेच होती, जिने म्हटले: “देवाचे नाव पहिल्यांदा बायबलमध्ये पाहिले तेव्हा मी रडले. मी देवाचे नाव माहीत करू शकते आणि ते घेऊ शकते या जाणीवेने मला भरून आले.” तिच्या बाबतीत, देवाचे नाव माहीत होणे हे यहोवाला एक व्यक्‍ती म्हणून ओळखण्याचे आणि त्याच्याबरोबर एक नातेसंबंध जोडण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल होते.

२. इतरांना यहोवाविषयी शिकवणे तातडीचे का आहे?

२ ते का सांगितले पाहिजे? देवाचे नाव, त्याचे गुण, त्याचा उद्देश आणि त्याची कार्ये यांजशी निगडीत आहे. तारणाशी देखील त्याचा संबंध आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “जो कोणी प्रभुचे [“यहोवाचे,” NW] नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.” पण, लोकांना जोपर्यंत यहोवाचे नाव माहीत होत नाही व ते त्याच्यावर विश्‍वास ठेवत नाहीत तोपर्यंत “त्याचा धावा ते कसा करितील?” यास्तव, ख्रिश्‍चनांनी इतरांना देवाचे नाव आणि ते नाव कोणकोणत्या गोष्टींना सूचित करते त्याविषयी तातडीने सांगितले पाहिजे. (रोम. १०:१३, १४) परंतु, देवाचे नाव सांगण्यामागे आणखी एक महत्त्वपूर्ण कारण आहे.

३. प्रचार करण्यामागचे प्रमुख कारण काय आहे?

३ एकोणीसशे वीसच्या दशकात, देवाच्या लोकांना शास्त्रवचनांमधून, देवाच्या सार्वभौमत्वाच्या समर्थनाचा आणि त्याच्या नावाच्या पवित्रीकरणाचा सार्वत्रिक वादविषय समजून आला. आपल्या नावावर आलेला कलंक दूर करण्यासाठी यहोवा दुष्ट लोकांचा नाश करेल पण त्याआधी त्याच्याविषयीचे सत्य “सर्व पृथ्वीवर विदित” करण्याची गरज आहे. (यश. १२:४, ५; यहे. ३८:२३) यास्तव, यहोवाची जाहीररीत्या स्तुती करणे आणि सर्व मानवजातीसमोर त्याचे नाव पवित्र करणे, हे आपल्या प्रचार कार्यामागचे प्रमुख कारण आहे. (इब्री १३:१५) देव आणि शेजारी यांच्याबद्दल आपल्याला असलेली प्रीती, देवाने दिलेल्या या कार्यात पूर्ण सहभाग घेण्यास आपल्याला प्रवृत्त करेल.

४. यहोवाच्या साक्षीदारांना देवाच्या नावावरून कसे ओळखले जाऊ लागले?

४ “आपल्या नावाकरिता काही लोक”: १९३१ साली आपण यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारले. (यश. ४३:१०) तेव्हापासून, देवाच्या लोकांनी त्याचे नाव इतक्या मोठ्या प्रमाणावर विदीत केले आहे की, उद्‌घोषक (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ १२४ वर असे म्हटले आहे: “संपूर्ण जगभरात यहोवाचे नाव मुक्‍तपणे घेणाऱ्‍या व्यक्‍तीला यहोवाचा साक्षीदार म्हणून पटकन ओळखले जाते.” तुम्हाला असेच ओळखले जाते का? यहोवाच्या चांगुलपणाबद्दलच्या गुणग्राहकतेमुळे आपण त्याच्या “नावाचा धन्यवाद” करण्यास, प्रत्येक उचित प्रसंगी त्याच्याविषयी बोलण्यास प्रवृत्त झाले पाहिजे.—स्तो. २०:७; १४५:१, २, ७.

५. देवाचे नाव धारण करण्यात आपले वर्तन कसे समाविष्ट आहे?

५ ‘त्याच्या नावाकरिता असलेल्या लोकांप्रमाणे’ आपण त्याच्या दर्जांना उंचावून धरले पाहिजे. (प्रे. कृत्ये १५:१४; २ तीम. २:१९) पुष्कळदा लोक पहिल्यांदा, यहोवाच्या साक्षीदारांचे उत्तम आचरण पाहतात. (१ पेत्र २:१२) देवाच्या तत्त्वांचे उल्लंघन करून किंवा आपल्या जीवनात त्याच्या उपासनेला दुय्यम स्थान देऊन आपण त्याच्या नावावर कधीही कलंक आणू इच्छिणार नाही. (लेवी. २२:३१, ३२; मला. १:६-८, १२-१४) त्याऐवजी, आपण आपल्या जीवनशैलीवरून दाखवून देऊ या की आपल्याला त्याचे नाव धारण करण्याचा जो सुहक्क मिळाला आहे तो आपण मौल्यवान समजतो.

६. आता आणि सदासर्वकाळपर्यंत आपण कोणत्या सुहक्काचा आनंद अनुभवू शकतो?

६ आज यहोवाची ही घोषणा पूर्ण होताना आपण पाहतो: “सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाम थोर आहे.” (मला. १:११) तेव्हा, आपण यहोवाविषयीचे सत्य लोकांना सांगू या आणि “त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानयुग” करू या.—स्तो. १४५:२१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा