वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०३ पृ. १
  • यहोवाच्या दयेबद्दल कृतज्ञता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या दयेबद्दल कृतज्ञता
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • “तुमचा पिता दयाळू आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • आपला देव यहोवा “खूप दयाळू” आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • यहोवाच्या अगाध कृपेची सुवार्ता घोषित करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवाची अगाध कृपा मिळालेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ७/०३ पृ. १

यहोवाच्या दयेबद्दल कृतज्ञता

१ ख्रिस्ती होण्याआधी, प्रेषित पौलाने ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला कडाडून विरोध केला. त्याने हे कृत्य अजाणतेने केल्यामुळे त्याला दया दाखवण्यात आली. यहोवाने अपात्र कृपा दाखवली आणि पौलाला प्रचार करण्याची नेमणूक देण्यात आली. पौलाने या नेमणुकीला मौल्यवान लेखले. (प्रे. कृत्ये २६:९-१८; १ तीम. १:१२-१४ ) यहोवाच्या दयेबद्दल कृतज्ञ असल्यामुळे, आपली सेवा निःस्वार्थपणे पूर्ण करण्यास पौल प्रेरित झाला.—२ करिंथ. १२:१५.

२ देवाच्या दयेमुळे आपल्यावर देखील एक सेवा सोपवण्यात आली आहे. (२ करिंथ. ४:१) इतरांना आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करण्याद्वारे, पौलाप्रमाणे आपणही, आपल्याला दाखवलेल्या दयेबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करू शकतो. इतरांना मदत करण्याचा एक मार्ग म्हणजे, त्यांच्याबरोबर बायबल अभ्यास सुरू करणे व सातत्याने तो चालवणे.

३ बायबल अभ्यास सुरू करणे: बायबल अभ्यास सुरू करण्याचा एक मार्ग म्हणजे मॅगझीन रूट. ज्यांच्याबरोबर आपण मॅगझीन रूट सुरू केला आहे अशांना नियमाने भेटी दिल्यामुळे, त्यांना कोणकोणत्या गोष्टींची चिंता लागलेली आहे, हे आपल्याला समजते. आपल्या नियतकालिकांतील एखादा विषय, अपेक्षा माहितीपत्रकातून बायबलचा अभ्यास सुरू करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. नंतरच्या भेटींमध्ये आपण नियतकालिके द्यायला जातो तेव्हा त्यांच्याबरोबर अपेक्षा माहितीपत्रकातून चर्चा पुढे चालू ठेवणे शक्य होऊ शकते.

४ प्रार्थना आणि प्रयत्न: प्रार्थना आणि मनःपूर्वक प्रयत्न यांमुळे आपले प्रचार कार्य सुधारते. एक बायबल अभ्यास असलेल्या एका पायनियर भगिनीने, आणखी बायबल अभ्यास मिळावेत म्हणून यहोवाला प्रार्थना केली. तिने आपल्या प्रार्थनांच्या अनुषंगाने कार्य देखील केले. तिने आपल्या सेवेचा गंभीरपणे विचार केला आणि तिला दिसून आले की ती पुन्हा भेट द्यायला जायची तेव्हा ती घरमालकाला बायबल अभ्यासाविषयी सांगत नव्हती. तिने यात सुधारणा केली आणि काही काळातच तिला आणखी दोन अभ्यास मिळाले.

५ “देवाच्या [अपात्र] कृपेची सुवार्ता” सांगण्याचा सुहक्क आपल्याला मिळाला आहे! (प्रे. कृत्ये २०:२४) देवाने दाखवलेल्या दयेबद्दलची कृतज्ञता आपल्याला, यहोवाच्या अपात्री कृपेचा फायदा मिळवण्यासाठी इतरांना मनापासून मदत करण्यास प्रवृत्त करो!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा