वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०३ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • टेलिफोनवरून साक्षकार्य करणे परिणामकारक ठरू शकते
    आमची राज्य सेवा—२००९
  • यशस्वी टेलिफोन साक्षकार्य
    आमची राज्य सेवा—२००१
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ‘दोन छोट्या नाण्यांची’ किंमत
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ५/०३ पृ. ३

प्रश्‍न पेटी

▪ टेलिफोनवरून साक्ष कार्य करताना, दान देण्याच्या व्यवस्थेबद्दल आपण सांगावे का?

आपण एखाद्या व्यक्‍तीला प्रत्यक्ष साक्ष देतो तेव्हा तिला समजावून सांगू शकतो, की यहोवाच्या साक्षीदारांचे संपूर्ण जगभरात चाललेले बायबल शिक्षणाचे कार्य पूर्णपणे दानांवरच चालत असल्यामुळे आपण लोकांकडून दान स्वीकारतो. परंतु, टेलिफोनवरून साक्ष कार्य करताना, दानांबद्दलचा किंवा दान देण्याच्या व्यवस्थेचा उल्लेख करू नये; नाहीतर, हा टेलिफोन व्यापाराचा प्रकार आहे असा गैरसमज होऊ शकतो. यहोवाच्या साक्षीदारांची सेवा ही कोणत्याही प्रकारे व्यापारी स्वरूपाची नाही.—२ करिंथ. २:१७.

▪ टेलिफोनवरून साक्ष कार्य करत असताना, समजा एखाद्या व्यक्‍तीने यहोवाच्या साक्षीदारांनी आपल्याला पुन्हा फोन करू नये अशी विनंती केली तर मग अशा वेळी आपण काय करावे?

त्या व्यक्‍तीच्या इच्छेचा आपण आदर करावा. क्षेत्राच्या पाकीटात, तारीख व त्या व्यक्‍तीचे नाव लिहिलेला एक छोटासा चिटोरा ठेवावा जेणेकरून भविष्यात प्रचारक त्या व्यक्‍तीला पुन्हा फोन करणार नाहीत. आपल्याला फोन करू नये अशी विनंती करणाऱ्‍या लोकांची यादी वर्षातून एकदा तपासून पाहावी. सेवा पर्यवेक्षकांचे मार्गदर्शन घेऊन, अनुभवी व व्यवहार चातुर्याचा उपयोग करणाऱ्‍या प्रचारकांना, अशा लोकांचा अजूनही तोच विचार आहे का, याची विचारपूस करण्यास नेमले जावे.—आमची राज्य सेवा मे १९९८, प्रश्‍न पेटी पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा