सुवार्ता सादरता
दूरध्वनीद्वारे
१ आम्हाला लोकांना समक्ष सुवार्ता सादर करणे बरे वाटते. पण कधी कधी दूरध्वनीवरील संभाषणाकरवी साक्षीकार्य पर्यायी रितीने करण्याची परिस्थिती येते. जे प्रचारक काही काळासाठी वा आजार किंवा शारीरिक अपंगत्व यामुळे कायमचे घरी आहेत अशांना साक्षीकार्यासाठी दूरध्वनीचा चांगला उपयोग करता येईल. तसेच जेथे अति सुरक्षेचा बंदोबस्त असतो किंवा ज्या ठिकाणी पूर्व परवानगी काढल्याविना जाता येत नाही अशा इमारतीतील निवासितांचा संपर्क साधण्यासाठी फोनवरील बोलणे खूपच साहाय्यक ठरते. दूरध्वनीकरवीच्या साक्षीकार्यातही काही आव्हाने आहेत, पण आधीच योजना व काळजीपूर्वक विचार करण्यामुळे यावर मात करता येते.
२ इमारतीतील लॉबीत ठेवलेल्या टेलिफोन डिरेक्टरीतून किंवा टपालपेट्यावरील मजकूराकरवी काही नावे व त्यांचे फोनचे नंबर आपल्याला घेता येतील. या गोष्टी सेवा देखरेख्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जाव्यात म्हणजे टेलिफोनची क्षेत्रे तयार होतील व त्यांची नोंद राखता येईल.
तयारी कशी करावी
३ दूरध्वनीवरील प्रभावी साक्षीकार्यासाठी उबदार व गोड आवाजाची गरज आहे. दिवसाच्या आरंभाला, रात्री उशीरा आणि जेवणाची वेळ असते तेव्हा फोन करण्याचे टाळा. टेलिफोनची घंटा बऱ्याच वेळा वाजू देणे हे सोयीस्कर नसते. ज्या टेलिफोनमधून तेथे उत्तर देणारे मशीन बसविलेले आहे असे ऐकायला मिळते तेथे तुम्ही म्हणू शकालः “माझे नाव . . . आहे, मी पवित्र शास्त्राने भविष्यासाठी दिलेल्या आशेविषयी बोलू इच्छितो. मी परत फोन करीन.” अशा प्रकारातील कॉल हा घरी कोणीही नाही असा समजावा आणि पुन्हा कधी तरी फोन करावा.
४ तुम्ही सादर करीत असलेल्या वक्तव्याची चांगली तालीम केलेली असावयास हवी, म्हणजे तुम्ही आपले बोलणे वाचून दाखवीत नाही हे समजू शकेल. घरमालकाला संभाषणात गोवण्याद्वारे, तुम्हाला त्याच्याविषयी केवढी व्यक्तीगत आस्था आहे हे त्याला वाटू द्या. आपले व्यक्तीगत तसेच आडनाव सांगून प्रस्तावनेत आपली ओळख करून द्या, आणि संभाषणात घरमालकाच्या नावाचा वेळोवेळी उच्चार करा.
५ सावकाश पण हेतूपूर्वक बोला आणि मध्ये थांबू नका; प्रश्न विचारल्यानंतरच थोडा विराम द्या. कारण विरामाचा अर्थ प्रश्न या रुपातही घेतला जाऊ शकतो. तुम्हाला असे म्हणता येईलः “माझं नाव . . . आहे. मी अशासाठी फोन केला कारण मला तुमची प्रत्यक्षात भेट घेता येत नाही.” मग, न थांबता पुढे असे बोलू शकताः “माझा उद्देश हा होता की, एका मनोरंजक प्रश्नावर तुमचं मत काय आहे ते ऐकून घ्यावं आणि तो प्रश्न आहे की, तुम्हाला याचं कधी आश्चर्य वाटलं का की, . . . ?” हाच प्रश्न तुम्ही असा बदलून विचारु शकताः “तुम्हाला असं कधी सुचलं का की, . . . ?” किंवा “तुम्ही याविषयी असा कधी विचार केला आहे का की, . . . ?” याला काही चुकीची उत्तरं मिळणार नाहीत व यामुळे घरमालकाला संभाषणासाठी प्रवृत्त केले जाते. “मला वाटतं की मी तुमच्या कामात व्यत्यय आणीत नाही,” आणि “तुम्ही कामात नसाल अशी आशा मला वाटते,” यासारखे बोलणे करून नकारार्थी प्रतिसाद आणू नका. ती वेळ योग्यच आहे असे समजा नसेल तर घरमालक तुम्हाला तसे सांगील.
६ “तुम्ही कोणाचे प्रतिनिधी आहात?” असे विचारले गेल्यास न थांबता सहजपणे सांगाः “मी यहोवाचा साक्षीदार आहे आणि या मनोरंजक प्रश्नावर तुमचं मत काय आहे ते ऐकून घ्याव म्हणून मी हा फोन केला, आणि तो प्रश्न आहे की, तुम्हाला याचं कधी आश्चर्य वाटलं का की, . . . ?” घरमालकाने विचारल्यास की, “तुम्हाला माझा फोनचा नंबर कोठून मिळाला?” तेव्हा म्हणा की, “डिरेक्टरीतून. आणि मी ह्या मनोरंजक प्रश्नाविषयी आपलं मत जाणून घ्यावं यासाठी हा फोन केला, तुम्हाला असं कधी वाटलं का की, . . . ?”
७ काहींनी घरमालकाला म्हटले की, पवित्र शास्त्राच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा एक मोफत कार्यक्रम आम्हाकडे आहे व मग लिव्ह फॉरएव्हर पुस्तकातील काही अध्यायाची शीर्षके त्यांनी त्यांना सांगितली व याकरवी त्यांना यश मिळू शकले. किंवा तुम्हाला असेही म्हणता येईलः “मोठ्या गुन्हेगारीपासून तुम्हाला इमारतीत पहाऱ्यामुळे सुरक्षितता आहे तेव्हा मी या प्रश्नाविषयी तुमचं मत जाणून घेऊ इच्छितो की, आज गुन्हेगारी इतक्या मोठ्या प्रमाणात का आहे?”
८ मोठा पहारा असलेल्या एका इमारतीत टेलिफोनचे साक्षीकार्य होईपर्यंत यश मिळू शकले नाही. परिणाम हा दिसला की, १४ पवित्र शास्त्र अभ्यास तेथे सुरु झाले. अशाप्रकारे मर्यादित संपर्क राहणाऱ्या इमारतीत कार्य न झालेली क्षेत्रे असतात ज्यामुळे पुष्कळ फलप्राप्ती मिळू शकते. यहोवाची आपल्याला मदत आहे हे जाणून सरळ मनोदयाने आपल्याला दूरध्वनीकरवी केलेले साक्षीकार्य सुवार्तेच्या सादरतेचा आणखी एक प्रभावी मार्ग असल्याचे दिसून येईल.—२ तीमथ्य ४:५.