टेलिफोनवरून साक्षकार्य करणे परिणामकारक ठरू शकते
१. टेलिफोनवरून साक्षकार्य करण्याच्या पद्धतीला आपण आपल्या सेवेचा महत्त्वपूर्ण भाग का समजले जाऊ शकते?
१ टेलिफोनवरून साक्षकार्य करण्याच्या पद्धतीचा आपण अवलंब का करू शकतो? कारण, तारण मिळण्याकरता आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त करण्यास इतरांना मदत करण्याची ही आणखी एक पद्धत आहे. (२ पेत्र ३:९) देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची आपली प्रमुख पद्धत घरोघरचे प्रचार कार्य असले तरीसुद्धा, घरी न भेटणाऱ्या लोकांपर्यंत पोहंचण्याकरता आपण इतरही मार्गांचा अवलंब करतो.—मत्त. २४:१४; लूक १०:१-७; प्रकटी. १४:६.
२. टेलिफोनवरून केल्या जाणाऱ्या साक्षकार्याचे आयोजन कसे केले जाते?
२ कसे आयोजित केले जाते?: घरोघरच्या सेवेसाठी जसे क्षेत्र दिले जाते त्याच प्रकारे टेलिफोनवरून साक्षकार्य करण्यासाठी देखील प्रचारकांना एक क्षेत्र दिले जाते. हे साक्षकार्य एकट्याने किंवा मग कदाचित दोन किंवा तीन जणांनी मिळून करता येईल. टेलिफोनवरून साक्षकार्य करण्यासाठी तुम्ही जे ठिकाण निवडाल ते शांत असले पाहिजे, तेथे गोंगाट असू नये. अनेक प्रचारकांना असे आढळून आले आहे, की टेलिफोनवरून साक्षकार्य करण्यासाठी त्यांच्यापुढे एक टेबल असला पाहिजे आणि घरोघरच्या कार्यात त्यांना सहसा ज्या वस्तू लागतात त्या त्यांच्या समोर असल्या पाहिजेत.
३. टेलिफोनवरून साक्षकार्य करताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे?
३ टेलिफोनवरून साक्ष कशी द्यायची?: टेलिफोनवरून साक्ष देताना आपण, एरवी जसे बोलतो तसेच बोलले पाहिजे. नव्यानेच सुरूवात करणारे, आपण नेहमी जसे बोलतो त्याच शैलीत घरमालकाला सादरता थेट वाचून दाखवू शकतात. पवित्र शास्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिका, आमची राज्य सेवा आणि जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? यांसारखी प्रकाशने आपल्याला मदत करू शकतात. तुम्ही जर स्वतःच एक सादरीकरण तयार करणार असाल, तर आधी एक विषय निवडा, एक प्रश्न तयार करा आणि मग त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी शास्त्रवचने शोधून ठेवा. घरमालकाची प्रतिक्रिया नीट लक्ष देऊन ऐका. यामुळे, तुम्हाला त्याच्याशी संभाषण पुढे चालू ठेवायचे की नाही हे ठरवता येईल. घरोघरच्या सेवेत तुम्ही जी प्रकाशने घरमालकाला द्याल तीच प्रकाशने तुम्ही येथेही देऊ शकता. साक्षकार्य करताना पुढे काही गोष्टी सुचवल्या आहेत. जसे की, बोलताना आरामात बोला, घाईघाईत बोलू नका. समोरची व्यक्ती आपल्याला पाहू शकत नसली तरी आपल्या आवाजावरून ती बरेच काही ओळखू शकते. तेव्हा आदराने, सहनशीलतेने व मैत्रीपूर्ण पद्धतीने बोला. घरमालक आपले विचार व्यक्त करताना लक्ष देऊन ऐका, त्याला सहमती दाखवा आणि मग त्याने व्यक्त केलेल्या विचारांबद्दल त्याचे आभार माना. टेलिफोनवरून साक्षकार्य करताना देणगीचा उल्लेख करू नका. नाहीतर, टेलिफोनवरून वर्गणी गोळा केली जाते, असा घरमालकाचा गैरसमज होऊ शकतो. आपण जे काही सांगत आहोत ते घरमालकाला आवडत नाही, असे तुम्हाला जाणवल्यास, संभाषण अगदी आदरपूर्वक पद्धतीने थांबवा.
४. टेलिफोनवरून साक्षकार्य केल्याने आपल्याला नेमलेल्या क्षेत्रातील कोणकोणत्या लोकांना आपण भेटू शकतो?
४ टेलिफोनवरून तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर बोलत आहात ती कदाचित अधू किंवा आजारी असेल. किंवा, मग अशी व्यक्ती असेल जिच्या कामाच्या वेळांमुळे तुम्हाला घरोघरच्या कार्यात भेटणे मुश्किल असेल; त्यामुळे तुम्ही फोन केलेल्या वेळी ती कदाचित घरातच असेल. शिवाय, असेही काही लोक आहेत जे कडक सुरक्षा असलेल्या बिल्डिंगमध्ये किंवा सोसायटीत राहतात. तेव्हा, आपली सेवा अधिक पूर्णपणे करता यावी म्हणून, टेलिफोनवरून साक्षकार्य करण्याची प्रभावकारी पद्धत वापरून पाहायला काय हरकत आहे?