वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०२ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km २/०२ पृ. ८

मासिके कशी सादर कराल

सावध राहा! जाने.-मार्च

“भारतातील उत्तम कौटुंबिक संस्कारांविषयी आपल्याला अभिमान वाटतो, पण ही समस्या आपल्याकडेही आहे असे तुम्हाला वाटते का? [सावध राहाचे! मुखपृष्ठ दाखवा आणि उत्तरासाठी थांबा.] विशेष म्हणजे, दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललेल्या या समस्येविषयी शास्त्रवचनांत आधीच भाकीत करण्यात आले होते. [२ तीमथ्य ३:१, ३ वाचा.] या समस्येशी झुंजणाऱ्‍यांना आपण कोणता व्यवराहोपयोगी सल्ला देऊ शकतो आणि या समस्येवर कायमचा उपाय कोणता आहे हे या अंकात सांगितले आहे.”

टेहळणी बुरूज फेब्रु. १५

“जीवनाला योग्य दिशा कशी द्यावी आणि महत्त्वाचे निर्णय कसे घ्यावेत याविषयी आपण कधी विचार केला आहे का? [उत्तरासाठी थांबा.] बायबलमध्ये अतिशय उत्तम मार्गदर्शन सापडते, याचे एक उदाहरण म्हणजे सुवर्ण नियम. [मत्तय ७:१२ वाचा.] आपल्याला व्यवहारात उपयोगी पडणारे आणखी कोणती तत्त्वे आहेत? या नियतकालिकात तुम्हाला या प्रश्‍नाचे उत्तर सापडेल.”

सावध राहा! जाने.-मार्च

“सप्टेंबर ११ रोजी झालेल्या भयंकर दुर्घटनेनंतर सबंध जगातले लोक विचार करत आहेत की शेवटी देव अशा घटना का घडू देतो? तुम्हाला काय वाटते? [उत्तरासाठी थांबा.] देव काही कारणास्तव आज दुष्टाई खपवून घेत आहे, पण त्याच्या सहनशक्‍तीची मर्यादा लवकरच संपुष्टात येईल. [प्रकटीकरण २१:४, ५ वाचा.] पृष्ठ १६ वरील या लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे लवकरच एक परिवर्तन घडून येणार आहे.”

टेहळणी बुरूज मार्च १

“जगातल्या घडामोडी पाहून बहुतेक लोक विचार करतात की भविष्य कसे असेल. आपण भविष्याकडे आत्मविश्‍वासाने का पाहू शकतो याविषयी येशू ख्रिस्ताने त्याच्या सुप्रसिद्ध प्रार्थनेत स्पष्ट केले. [मत्तय ६:९, १० वाचा.] मानवजात पुरातन काळात केलेल्या चुका पुन्हा पुन्हा करत आहे. पण त्या दिवसांतही ज्यांनी देवाची सेवा केली त्यांचे भविष्य उज्ज्वल होते. आपल्यालाही एक उज्ज्वल भविष्य कशाप्रकारे लाभू शकते हे या नियतकालिकात सांगितले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा