वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०२ पृ. ३-६
  • क्षेत्र सेवेकरता सुचवलेल्या सादरता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षेत्र सेवेकरता सुचवलेल्या सादरता
  • आमची राज्य सेवा—२००२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संभाषण सुरू करण्यासाठी
  • अपेक्षा माहितीपत्रक सादर करण्यासाठी सूचना
  • ज्ञान पुस्तकासाठी सुचवलेल्या सादरता
  • इतर प्रकाशने
  • थेट पद्धत
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
  • वाढ होण्यासाठी यहोवावर विसंबून राहा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • इतरांची खरी काळजी घेऊन यहोवाचे अनुकरण करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • माहितीपत्रकांद्वारे सुवार्तेची घोषणा करा
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km १/०२ पृ. ३-६

जपून ठेवा

क्षेत्र सेवेकरता सुचवलेल्या सादरता

या पुरवणीचा उपयोग कसा करणार

यातल्या बहुतेक सादरता, आमची राज्य सेवा याच्या मागील अंकांमधल्या आहेत. तुमच्या साक्षकार्यात तुम्हाला वाटेल तितक्या सादरतांचा उपयोग करा आणि त्या कितपत परिणामकारक आहेत ते पाहा. ही पुरवणी जपून ठेवा आणि सेवाकार्यासाठी तयारी करताना ती पडताळून पाहा.

लवकरात लवकर मुद्द्‌याचे बोलल्याने देवाच्या वचनाबद्दल तुम्ही व्यक्‍तीची आस्था वाढवू शकता. एखादा प्रश्‍न विचारा आणि त्याचे संक्षिप्त शास्त्रवचनीय उत्तर वाचून दाखवा. पुढे सुचवलेले सल्ले उपयोगात आणून पाहा:

“भविष्याकडे पाहताना तुम्हाला आशादायक वाटते की शंका वाटते? [प्रत्त्युतरासाठी थांबा.] आजच्या अस्वस्थ करणाऱ्‍या घटनांविषयी बायबलने आधीच भाकीत केले होते आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसून येत आहे.”—२ तीम. ३:१, २, ५; नीति. २:२१, २२.

“आरोग्य सुदृढ राखण्याविषयी बऱ्‍याच लोकांना चिंता लागलेली असते. पण देवाने सर्व आरोग्य समस्या कायमच्या मिटवून टाकण्याचे अभिवचन दिले आहे हे तुम्हाला ठाऊक होते का?”—यश. ३३:२४; प्रकटी. २१:३, ४.

“शेवटी, संपूर्ण जगावर राज्य करणारे एकच सरकार असेल अशी भविष्यवाणी बायबलमध्ये केली आहे हे तुम्हाला माहीत होते का?”—दानी. २:४४; मत्त. ६:९, १०.

“येशू ख्रिस्त या पृथ्वीवर राज्य करू लागला तर परिस्थिती कशी असेल असे तुम्हाला वाटते?”—स्तो. ७२:७, ८.

हिंदू व्यक्‍तीला: “तुम्हाला तुमच्या धर्मावर निश्‍चितच खूप प्रेम असेल. पण मला वाटते की आपल्या दोघांचे मात्र एका गोष्टीवर, म्हणजे शांतीने राहण्याच्या गोष्टीवर एकमत असेल. या पृथ्वीवर तुम्हाला एक शांतीमय वातावरण दिसते का? [प्रत्युत्तरासाठी थांबा.] दुष्टाईला काढून टाकल्यावर शांतीच असेल. या पवित्र पुस्तकात काय वचन दिले आहे ते कृपया पाहा.—स्तो. ४६:९; ७२:७, ८.

“अनेक लोक समस्यांविषयी ऐकून थकलेत. त्यांना उपाय हवे आहेत. पण आपल्या समस्यांवर खरे उपाय कोठे मिळू शकतील?”—२ तीम. ३:१६, १७.

मुस्लिम व्यक्‍तीला: “आपण वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीचे असलो तरी आजच्या जगात आपल्याला सारख्याच अडीअडचणींना तोंड द्यावे लागते हे तुम्हीसुद्धा मान्य कराल. आजच्या पिढीच्या समोर असलेल्या मोठ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय खरोखर असेल असे तुम्हाला वाटते का? अब्राहामाच्या संतानाद्वारे समस्यांवरील उपाय मिळेल.”—उत्प. २२:१८.

“पुष्कळ लोकांना लिंग, धर्म किंवा जात या कारणांमुळे भेदभाव सहन करावा लागतो. अशा कलुषितपणाबद्दल देवाला काय वाटत असावे?”—प्रे. कृत्ये १०:३४, ३५.

संभाषण सुरू करण्यासाठी

युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकातील विषयांतून गोळा केलेल्या खालील प्रश्‍नांच्या यादीत प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर कोठे आहे त्याचा पृष्ठ क्रमांक दिला आहे:

आपण म्हातारे होतो व मरतो ते का? (९८)

मृतांची काय स्थिती आहे? (१००)

देवावर विश्‍वास ठेवायला काही ठोस कारणे आहेत का? (१४५)

मनुष्याच्या जीवनातील घडामोडींविषयी देवाला खरोखर चिंता आहे का? (१४७)

देव एक खरी व्यक्‍ती आहे का? (१४७)

सर्व चांगले लोक स्वर्गात जातात का? (१६२)

खरोखर आनंदी भविष्य मिळवण्यासाठी एखाद्याने स्वर्गातच गेले पाहिजे का? (१६३)

देवाचे व्यक्‍तिगत नाव जाणणे व उपयोगात आणणे का महत्त्वाचे आहे? (१९६)

येशू ख्रिस्त देव आहे का? (२१२)

देवाचे राज्य काय साध्य करील? (२२७)

मानवी जीवनाचा उद्देश काय? (२४३)

वैवाहिक जीवन कसे सुधारले जाऊ शकते? (२५३)

सर्व धर्म देवाला स्वीकृत आहेत का? (३२२)

कोणता धर्म योग्य आहे हे एखाद्या व्यक्‍तीने कसे ठरवावे? (३२८)

आजच्या जगात सैतान किती प्रभावशाली आहे? (३६४)

देव दुःखाला परवानगी का देतो? (३९३)

इतकी दुष्टाई का आहे? (४२७)

या जगावर कोण राज्य करत आहे—देव की सैतान? (४३६)

अपेक्षा माहितीपत्रक सादर करण्यासाठी सूचना

तुम्ही निश्‍चितच हे मान्य कराल की, अनेक लोक देवावर विश्‍वास करतात. त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांचे याविषयी एकमत आहे की, देव आपल्याकडून काहीतरी अपेक्षा करतो. परंतु काय अपेक्षा करतो याबाबतीत मात्र लोकांचे एकमत नाही.” मग अपेक्षा माहितीपत्रक दाखवा, पाठ १ काढून त्याची चर्चा करा.

“कौटुंबिक जीवनात आज अनेक समस्या आहेत. त्यामुळे, कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य काय असावे असा प्रश्‍न तुम्हाला कधी पडला आहे का?” प्रत्युत्तर मिळाल्यावर, बायबलमध्ये देव कौटुंबिक सौख्यानंदाचे खरे रहस्य प्रकट करतो हे समजावून सांगा. यशया ४८:१७ वाचा. त्यानंतर अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ८ काढा आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याकरता विश्‍वसनीय मार्गदर्शन पुरवणारी बायबलमधली तेथे दिलेली वचने दाखवा. प्रत्येक पाठाच्या सुरवातीला दिलेले प्रश्‍न वाचा. याची उत्तरे वाचायला आवडतील का असे त्या व्यक्‍तीला विचारा.

“या माहितीपत्रकात बायबलमधील मूलभूत शिकवणींची चर्चा करणारा बहुसमावेशक अभ्यासक्रम दिला आहे. प्रत्येक पानावर तुम्हाला दिसून येईल की, शतकानुशतके लोकांना पीडिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत. उदाहरणार्थ, पृथ्वीकरता देवाचा काय उद्देश आहे?” पाठ ५ काढा आणि सुरवातीला दिलेले प्रश्‍न वाचा. घरमालकाला कोणता प्रश्‍न सर्वात जास्त आवडला ते विचारा आणि त्याच्याशी संबंधित एक अथवा अनेक परिच्छेद वाचा व योग्य शास्त्रवचने काढून पाहा. अशाप्रकारे इतरही प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे सहजपणे मिळू शकतात हे सांगा. दुसऱ्‍या एखाद्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी तुम्हाला पुन्हा यायला आवडेल हे सांगा.

“तुमच्या मते, शाळा-कॉलेजांमध्ये घडणाऱ्‍या हिंसाचाराला कारण काय? पालकांकडून शिक्षण मिळत नसल्यामुळे हे घडत आहे का? की याला दुसरे कारण आहे, जसे की, सैतानाचा प्रभाव?” प्रत्त्युतरासाठी थांबा. हे सैतानाच्या प्रभावामुळे घडते असे व्यक्‍तीने म्हटल्यास प्रकटीकरण १२:९, १२ वाचा. जगामधील अव्यवस्थेला सैतान कारणीभूत आहे हे दाखवा. त्यानंतर, अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ४ काढा आणि सैतानाची उत्पत्ती कशी झाली असावी हा विचार त्या व्यक्‍तीने कधी केला का हे विचारा. त्यानंतर पहिले दोन परिच्छेद वाचा आणि त्यावर चर्चा करा. पण जर त्या व्यक्‍तीने, “पालकांकडून शिक्षण मिळत नसल्यामुळे” शाळेमध्ये हिंसाचार घडत आहे असे म्हटले तर २ तीमथ्य ३:१-३ वाचा आणि कोणत्या प्रवृत्तींमुळे या समस्येत भर पडत आहे हे दाखवा. मग अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ८ काढा, परिच्छेद ५ वाचा आणि पुढे चर्चा करा.

“यशस्वी कौटुंबिक जीवनाकरता आवश्‍यक असलेले ज्ञान निर्माणकर्ता आपल्याला देईल अशी अपेक्षा करणे योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?” प्रत्युत्तर मिळाल्यावर, अपेक्षा माहितीपत्रक दाखवा. पाठ ८ काढा आणि कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासाठी बायबलमधली तत्त्वे यात दिली आहेत असे सांगा. सर्वाधिक लाभ मिळण्याकरता माहितीपत्रकासोबत बायबलचा कसा उपयोग करावा याचे प्रात्यक्षिक दाखवा.

“आधुनिक जीवनातील सर्व समस्यांचा विचार करता, प्रार्थना केल्याने आपल्याला खरोखरच मदत मिळू शकते असे तुम्हाला वाटते का? [प्रत्त्युतरासाठी थांबा.] पुष्कळांचे म्हणणे आहे की, प्रार्थनेमुळे त्यांना आंतरिक शक्‍ती मिळते. [वाचा फिलिप्पैकर ४:६, ७.] परंतु आपल्या प्रार्थनांना उत्तर मिळत नाही असेही त्या व्यक्‍तीला वाटू शकते. [अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ७ काढा.] प्रार्थनेचा आपल्याला सर्वाधिक लाभ कसा होऊ शकतो हे समजावून सांगा.”

“आज जगामध्ये इतके विविध धर्म का आहेत याविषयी आम्ही सर्वांशी बोलत आहोत. परंतु, देव एकच आहे. मग तुमच्या मते, धर्माधर्मामध्ये एवढा गोंधळ का आहे? [प्रत्त्युतरासाठी थांबा. अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ १३ काढा आणि सुरवातीचे प्रश्‍न वाचा.] हा पाठ वाचल्यावर तुम्हाला त्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे मिळतील.”

टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिके समोरच्या व्यक्‍तीला दिल्यावर, एका माहितीपत्रकातून तिला एक छोटा परिच्छेद वाचून दाखवला तर चालेल का असे विचारा. तिची काही हरकत नसल्यास, अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ५ काढा. पाठाच्या सुरवातीला दिलेले प्रश्‍न पाहा आणि तुम्ही सुरवातीचा परिच्छेद वाचत असताना पहिल्या प्रश्‍नाचे उत्तर ऐकायला सांगा. परिच्छेद वाचून झाल्यावर, प्रश्‍न विचारा आणि त्याचे उत्तर मिळवा. माहितीपत्रक दाखवा आणि ते स्वीकारले गेल्यास, प्रश्‍नांच्या यादीतील पुढील दोन प्रश्‍नांबद्दल त्या व्यक्‍तीचे काय मत आहे हे ऐकण्यासाठी पुन्हा येण्याची व्यवस्था करा.

ज्ञान पुस्तकासाठी सुचवलेल्या सादरता

बायबल हातात घेऊन अशी सुरवात करा: “आज तुमच्या भागातल्या सर्वांना आम्ही एक शास्त्रवचन दाखवत आहोत. त्यात म्हटले आहे . . . ” योहान १७:३ वाचा आणि मग विचारा: “आपल्याला योग्य व्यक्‍तींची ओळख झाल्यावर काय मिळण्याचे वचन दिले आहे याकडे तुम्ही लक्ष दिले का? [उत्तरासाठी थांबा.] ही ओळख आपण कशी करून घेऊ शकतो?” त्यांनी आपले मत व्यक्‍त केल्यावर ज्ञान पुस्तक दाखवा आणि म्हणा: “सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान कोणते आहे ते या पुस्तकात सांगितले आहे. बायबलविषयी लोकांना असलेल्या सर्वसामान्य प्रश्‍नांची उत्तरे देऊन ते या ज्ञानाची ओळख करून देते.” विषयसूची दाखवा आणि यातील कोणत्याही एका विषयावर त्या व्यक्‍तीने कधी विचार केला का ते विचारा.

“आपण पाहत किंवा अनुभवत असलेल्या अन्यायाविषयी आणि दुःखाविषयी देवाला खरीच चिंता आहे, असा विचार तुमच्या मनात कधी आला का? [उत्तरासाठी थांबा.] बायबल आपल्याला हमी देते की, देव आपल्यावर प्रेम करतो आणि संकटकाळी तो आपली मदत करील.” स्तोत्र ७२:१२-१७ मधील काही भाग वाचा. ज्ञान पुस्तकातील अध्याय ८ काढा आणि देव दुःखाला अनुमती का देतो या लाखो लोकांनी विचारलेल्या प्रश्‍नाला यात दिलासा देणारे उत्तर दिले आहे ते दाखवा. शक्य असल्यास, परिच्छेद ३ ते ५ मधील काही शास्त्रवचनीय विचारांची तेव्हाच किंवा पुनर्भेटीच्या वेळी चर्चा करा.

“आपल्यापैकी बहुतेकांनी प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूचे दुःख अनुभवले आहे. पण त्यांना आपण पुन्हा पाहू शकतो का असा विचार तुम्ही कधी केला का? [उत्तरासाठी थांबा.] आपल्या प्रिय जनांना मृत्यूपासून वाचवले जाऊ शकते हे येशूने सिद्ध केले. [योहान ११:११, २५, ४४ वाचा.] हे अनेक शतकांआधी घडले असले तरीही देवाने आपल्यासाठी काय करण्याचे वचन दिले आहे हे त्यावरून दिसून येते.” ज्ञान पुस्तकातील पृष्ठ ८५ वरील चित्र काढा आणि मथळा वाचा. त्यानंतर पृष्ठ ८६ वरील चित्र दाखवा आणि त्यावर टिप्पणी करा. “मानव वृद्ध होऊन का मरतात याचे कारण तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहे का?” असे विचारून पुढच्या भेटीची पूर्वतयारी करा. अध्याय ६ ची चर्चा करायला पुन्हा भेट द्या.

“आपण दीर्घायुषी असावे असे मानवाला का वाटते याचा तुम्ही कधी विचार केलात का?” त्यांचे उत्तर ऐकून घेतल्यावर, ज्ञान पुस्तकातील अध्याय ६ काढा आणि परिच्छेद ३ वाचा. दिलेल्या शास्त्रवचनांवर कारणमीमांसा करा. परिच्छेदाच्या शेवटी दिलेल्या दोन प्रश्‍नांविषयी सांगताना त्या व्यक्‍तीला याची उत्तरे स्वतःहून पाहायला आवडतील का असे विचारा. होकार मिळाल्यास, पुढील दोन-तीन परिच्छेदांची चर्चा करा.

“. . . यावर तुमचा विश्‍वास आहे का असे आम्ही लोकांना विचारत आहोत. उत्पत्ति १:१ वाचा आणि मग पुन्हा विचारा: “याच्याशी तुम्ही सहमत आहात का?” त्या व्यक्‍तीने होकार दिल्यास, म्हणा: “मीही आहे. परंतु, देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या असल्यास दुष्टाईला देखील तोच जबाबदार आहे असे तुम्हाला वाटते का?” त्या व्यक्‍तीचे प्रत्युत्तर ऐकून घेतल्यावर उपदेशक ७:२९ वाचा. ज्ञान पुस्तकातील अध्याय ८ काढा आणि परिच्छेद २ वाचा. उत्पत्ती १:१ या वचनाशी ती व्यक्‍ती सहमत नसल्यास, निर्माणकर्ता अस्तित्वात आहे याचा पुरावा पडताळून पाहण्यास तिला उत्तेजन द्या.—पाहा युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तक, पृष्ठे ८४-६.

“आजची नैतिक मूल्ये दिवसागणिक बदलत असल्यामुळे आपल्याला जीवनात विश्‍वसनीय मार्गदर्शनाची गरज आहे असे तुम्हालाही वाटते का? [उत्तरासाठी थांबा.] बायबल हे सर्वात जुने पुस्तक असले तरीही आधुनिक जीवन आणि आनंदी कौटुंबिक जीवन याविषयी त्यात व्यावहारिक सल्ला दिला आहे.” ज्ञान पुस्तकात अध्याय २ काढा आणि संपूर्ण परिच्छेद १० व परिच्छेद ११ चे पहिले वाक्य तसेच २ तीमथ्य ३:१६, १७ वाचा.

“आपले आणि या पृथ्वीचे भविष्य काय आहे हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? [उत्तरासाठी थांबा.] बायबल एकाच शब्दात भविष्याचे वर्णन करते—परादीस! देवाने पहिल्या मानवी दांपत्याला निर्माण केले तेव्हा त्यांना यातच ठेवले होते. ते कशाप्रकारचे असावे याचे हे वर्णन पाहा.” ज्ञान पुस्तकातील पृष्ठ ८ काढा आणि “परादीसमधील जीवन” या उपशिर्षकाखालील परिच्छेद ९ वाचा. त्यानंतर परिच्छेद १० मधील मुद्द्‌यांची चर्चा करा आणि यशया ५५:१०, ११ हे शास्त्रवचन वाचा. पूर्ववत केलेल्या परादीसमधील जीवन कशाप्रकारचे असेल यावरील चर्चा पुढे चालू ठेवून परिच्छेद ११-१६ पूर्ण करा.

टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिके दिलेल्या व्यक्‍तींना पुनर्भेटी देताना तुम्ही असे म्हणू शकता:

“मागच्या वेळी मी आलो तेव्हा तुम्हाला एक टेहळणी बुरूज मासिक देऊन गेलो होतो. कदचित तुम्ही पाहिले असेल की, त्या मासिकाचे संपूर्ण नाव टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक असे आहे. आज मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की ते राज्य काय आहे आणि तुमच्याकरता व तुमच्या कुटुंबाकरता त्याचा काय अर्थ होऊ शकतो.” त्यानंतर अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ६ काढा आणि वाचा व त्या व्यक्‍तीजवळ असलेल्या वेळेत चर्चा करा.

“मी अलीकडेच तुम्हाला भेटलो होतो आणि टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिकांच्या काही प्रती तुम्हाला दिल्या होत्या. ही मासिके बायबलबद्दल आणि त्याच्या नैतिक मार्गदर्शनाबद्दल लोकांमध्ये आदरभाव जागृत करतात. देवाचे वचन सर्वांनी समजून घेतले पाहिजे असे मला वाटते म्हणून मी तुम्हाला काहीतरी फायद्याचे दाखवण्यासाठी तुमच्याकडे पुन्हा आलोय.” अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तक दाखवा आणि बायबल अभ्यास सादर करा.

कोणतीही १९२ पानांची जुनी पुस्तके सादर करताना तुम्ही ही सादरता उपयोगात आणू शकता:

“उत्तम शिक्षण घेण्यावर फार जोर दिला जातो. तुमच्या मते, जीवनात आनंदी आणि यशस्वी होण्याकरता कोणत्या प्रकारचे शिक्षण घेण्याची गरज आहे? [उत्तरासाठी थांबा. मग नीतिसूत्रे ९:१०, ११ वाचा.] हे पुस्तक [तुम्ही दाखवत असलेल्या पुस्तकाचे नाव सांगा] बायबलवर आधारलेले आहे. ते सार्वकालिक जीवन देणाऱ्‍या एकमेव उगमाची ओळख करून देते.” पुस्तकातील एखादे विशिष्ट उदाहरण दाखवा आणि त्या व्यक्‍तीला ते वाचायला उत्तेजन द्या.

इतर प्रकाशने

अतिरिक्‍त पुस्तकांसाठी व माहितीपत्रकांसाठी टेहळणी बुरूज प्रकाशनांची सूची (इंग्रजी) यामध्ये सुचवलेल्या सादरता दिल्या आहेत:

सादरता

प्रकाशनानुसार यादी

थेट पद्धत

बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी यातील एखादी थेट पद्धत वापरण्याचा प्रयत्न करा:

“दोन-तीन मिनिटांमध्ये तुम्हाला बायबलमधील एखाद्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नाचे उत्तर मिळवता येते हे तुम्हाला माहीत होते का? उदाहरणार्थ, . . . ” मग, अपेक्षा माहितीपत्रकातील पाठाच्या सुरवातीला दिलेल्या प्रश्‍नांपैकी त्या व्यक्‍तीला आवडेल असा एक प्रश्‍न विचारा.

“आमचा मोफत बायबल अभ्यासाचा कार्यक्रम कसा चालतो हे दाखवण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. मला तुम्हाला दाखवायला फक्‍त पाच मिनिटे लागतील. द्याल का तुम्ही फक्‍त पाच मिनिटे?” होकार मिळाल्यास, अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी अपेक्षा माहितीपत्रकातील पहिला पाठ निवडा आणि केवळ एक-दोन निवडक शास्त्रवचने वाचून दाखवा. त्यानंतर विचारा: “पुढील पाठासाठी १५ मिनिटे तुम्हाला कधी देता येतील?”

“पुष्कळांजवळ बायबल आहे, पण भविष्याविषयी आपल्या सर्वांना असलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरे त्यात दिली आहेत हे त्यांना ठाऊक नाही. या साधनाचा [अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तक] उपयोग करून दर आठवडी एक तास दिल्यास केवळ काही महिन्यांमध्ये तुम्हाला बायबलची मूलभूत समज प्राप्त होऊ शकते. हा कार्यक्रम कसा चालतो हे दाखवायला मला आवडेल.”

“मी मोफत गृह बायबल अभ्यास सादर करण्यासाठी भेटी देत आहे. तुमची हरकत नसल्यास, फक्‍त दोन-तीन मिनिटांमध्ये मी प्रत्यक्षात हे दाखवू शकतो की, सुमारे २०० देशांमध्ये कुटुंबातले सगळेजण एकत्र मिळून घरच्या घरी बायबलची चर्चा कशी करतात. यातील कोणत्याही एका विषयावर आपण चर्चा करू शकतो. [ज्ञान पुस्तकातील विषय सूची दाखवा.] तुम्हाला कोणता विषय आवडला?” त्या व्यक्‍तीला निवड करू द्या. मग निवडलेला अध्याय काढा आणि पहिल्या परिच्छेदातून अभ्यासाला सुरवात करा.

“मी बायबलमधून लोकांना मोफत शिकवतो आणि आणखी विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडे वेळ आहे. आम्ही या बायबल साधनाचा उपयोग करतो. [ज्ञान पुस्तक दाखवा.] हा अभ्यास फक्‍त काही महिन्यासाठी चालेल आणि त्यामध्ये, देव दुःखाला परवानगी का देतो? आपण म्हातारे होतो व मरतो ते का? आपल्या मृत प्रिय जनांचे काय होते? आणि आपण देवाच्या समीप कसे जाऊ शकतो? अशा प्रश्‍नांची उत्तरे दिली जातील. हे कसे शिकवले जाते ते मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवू का?”

तुमच्याजवळ एखादी प्रभावशाली सादरता असेल आणि त्यामुळे लोकांमध्ये आस्था निर्माण होत असेल तर ती जरूर वापरत राहा! आणि चालू महिन्याच्या साहित्य सादरतेशी ती जुळवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा