वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०२ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००२
आमची राज्य सेवा—२००२
km १/०२ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता जानेवारी: मंडळीच्या साठ्यामध्ये असलेले कोणतेही १९२ पानी पुस्तक. कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाचा साठा असलेल्या मंडळ्या हे पुस्तक सादर करू शकतात. फेब्रुवारी: वन अस्तित्वात कसे आले—उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी), प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे!, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा मंडळीच्या साठ्यामध्ये असलेले कोणतेही १९२ पानी पुस्तक. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करण्यात येईल. एप्रिल: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिके. घरमालकास आस्था आहे असे आढळल्यास मॅग्झीन रूट सुरू करण्यासाठी पुनर्भेटी द्या. मॅग्झीन रूट व्यावहारिक नसेल अशाच ठिकाणी केवळ वर्गणी सादर केली जाऊ शकते. बायबल अभ्यास सुरू करण्याच्या दृष्टीने अपेक्षा माहितीपत्रक सादर करा.

◼ जानेवारी १४ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहाच्या सेवा सभेला उपस्थित असलेल्या सर्व बाप्तिस्माप्राप्त प्रचारकांना आगाऊ वैद्यकीय सूचना/जबाबदारीतून मुक्‍तता कार्ड आणि त्यांच्या मुलांकरता आयडेंटिटी कार्ड मिळू शकते.

◼ फेब्रुवारीत सुरू होऊन मार्च ३ च्या आधी देण्यात येणाऱ्‍या विभागीय पर्यवेक्षकांच्या नवीन जाहीर भाषणाचा विषय असेल “धोक्याच्या जगात सुरक्षा मिळवणे.”

◼ या वर्षी, गुरूवार, मार्च २८ रोजी सूर्यास्तानंतर स्मारक विधी पाळण्यासाठी मंडळ्यांनी सोयीस्कर व्यवस्था करावी. भाषण लवकर सुरू करण्यात आले तरीही, बोधचिन्हे सूर्यास्ताच्या आधी फिरवली जाऊ नयेत. तुमच्या भागात सूर्यास्त कधी होतो याविषयी स्थानिक सूत्रांकडून माहिती मिळवा. प्रत्येक मंडळीला आपापला स्मारक विधी पाळणे इष्ट असले तरी हे नेहमीच शक्य नसेल. जेथे अनेक मंडळ्या सहसा एकच राज्य सभागृह वापरतात तेथे एक किंवा अनेक मंडळ्या त्या संध्याकाळपुरते दुसरे एखादे ठिकाण पाहू शकतात. शक्य असेल तेथे, दोन कार्यक्रमांदरम्यान कमीत कमी ४० मिनिटांचे अंतर ठेवावे असे आम्ही सुचवतो; यामुळे सर्वांना त्या प्रसंगाचा पुरेपूर लाभ घेता येईल आणि नवीन लोकांना व नव्याने आस्था घेणाऱ्‍यांशी भेटण्याबोलण्याकरता पुरेसा वेळ असेल. स्थानिकरित्या कोणत्या व्यवस्था उत्तम असतील हे वडील वर्गाने ठरवावे.

◼ अध्यक्षीय पर्यवेक्षकांना प्रत्येक महिन्याला शिपिंगच्या पावत्या मिळतात तेव्हा संस्थेच्या राज्य सभागृह निधीसाठी व जागतिक कार्यासाठी मिळणाऱ्‍या देणग्यांच्या सर्व पावत्या मंडळीला पुढील जमाखर्च अहवालासोबत वाचून दाखवल्या जातील याकडे लक्ष द्यावे.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरता प्रकाश २ —इंग्रजी, कन्‍नड, तामीळ, मल्याळम

जीवन अस्तित्वात कसे आले—उत्क्रांतीने की निर्मितीने? (लहान आकाराचे) —तामीळ

समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? —इंग्रजी, तामीळ, मराठी, मल्याळम, हिंदी

बायबलवर तुम्ही भरवसा का करू शकता (पत्रिका क्र. १३) —निकोबारी

यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे? (पत्रिका क्र. १४) —निकोबारी

शांतिदायक नवीन जगातील जीवन (पत्रिका क्र. १५) —निकोबारी

तुमच्यामध्ये अमर आत्मा आहे का? (पत्रिका क्र. २५) —इंग्रजी, तामीळ, मिझो

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

जीवन अस्तित्वात कसे आले—उत्क्रांतीने की निर्मितीने? (लहान आकाराचे) —मल्याळम

यहोवाचे गुणगान करा (२९ गीते) —हिंदी

भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! —नेपाळी, तामीळ, तेलगू

बायबलवर तुम्ही भरवसा का करू शकता (पत्रिका क्र. १३) —बंगाली

यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे? (पत्रिका क्र. १४) —बंगाली

शांतिदायक नवीन जगातील जीवन (पत्रिका क्र. १५) —आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्‍नड, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, तामीळ, तेलगू

कौटुंबिक जीवनाचा आनंद लूटा (पत्रिका क्र. २१) —बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्‍नड, मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, तामीळ, तेलगू

जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो? (पत्रिका क्र. २२) —बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्‍नड, मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, तामीळ, तेलगू

◼ वरील साहित्यासाठी लिटरेचर रिक्वेस्ट (S-14) पाठवण्याआधी कृपया लक्षात ठेवावे की, तुमची बाकी मागणी भरून मंडळीला पाठवण्यात येईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा