वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०१ पृ. १
  • तुम्ही जणू “तमाशा” असे झाला आहात!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही जणू “तमाशा” असे झाला आहात!
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • देवदूत—“परिचारक आत्मे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • विश्‍वासू स्वर्गदूतांसारखं वागा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • दिव्यदूत तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • देवदूत तुम्हाला कशी मदत करू शकतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km ८/०१ पृ. १

तुम्ही जणू “तमाशा” असे झाला आहात!

१ “आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो आहो” असे प्रेषित पौलाने लिहिले. (१ करिंथ. ४:९) याचा काय अर्थ होतो? आपल्या सेवेवर याचा आज कसा परिणाम झाला पाहिजे?

२ “तमाशा” म्हटले, की एखाद्या करिंथकराला रोमन द्वंद खेळांचा शेवटचा टप्पा आठवला असेल ज्यात, मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या लोकांची निर्घृण हत्या करण्याआधी हजारो प्रेक्षकांसमोर मिरवणूक काढली जायची. तसेच, राज्याची साक्ष दिल्याबद्दल पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचे झालेले हाल एका मोठ्या प्रेक्षकगणाने अर्थात मानवांनी व देवदूतांनी पाहिले. (इब्री १०:३२, ३३) या ख्रिश्‍चनांची सचोटी पाहून पुष्कळ प्रेक्षकांवर प्रभाव पडला; आज आपली सहनशीलता पाहूनही आधुनिक दिवसांतील प्रेक्षक प्रभावीत होतात. पण आपले प्रेक्षक कोण आहेत?

३ जग आणि लोक: कधीकधी प्रसारमाध्यमांतून यहोवाच्या लोकांच्या कार्यांविषयी बातम्या प्रसिद्ध होतात. आपल्या कार्यांबद्दलच्या वास्तविक व प्रामाणिक असलेल्या चांगल्या बातम्यांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्‍त करतो; परंतु कधीकधी आपला विरोध करणारे आपल्याबद्दल वाईट बातम्या पसरवतील याची देखील आपण अपेक्षा करतो. लोक आपल्याविषयी ‘वाईट व चांगल्या बातम्या’ पसरवत असले तरी आपण देवाचे सेवक या नात्याने सेवा करीत राहिले पाहिजे. (२ करिंथ. ६:४, ८) याद्वारे आपण येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य आहोत हे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना स्पष्टपणे दिसून येईल.

४ देवदूत: आत्मिक प्राणी देखील आपल्याला पाहत असतात. दियाबल आणि त्याचे पिशाच्च “अतिशय संतप्त होऊन” आपल्याला पाहत आहेत. ‘येशूविषयी साक्ष देणाऱ्‍यांचे’ काम बंद पाडण्याचा त्यांचा हेतू आहे. (प्रकटी. १२:९, १२, १७) देवाच्या विश्‍वासू देवदूतांचे देखील आपल्याकडे लक्ष आहे; पाप करणारी एक जरी व्यक्‍ती मागे फिरली तरी त्यांना आनंद होतो. (लूक १५:१०) आपली सेवा ही आज सर्वात निकडीची सेवा व पृथ्वीवर होणारे लाभदायक कार्य आहे असे देवदूत समजतात, ही गोष्ट जाणल्याने आपल्याला बळकटी मिळू शकते.—प्रकटी. १४:६, ७.

५ तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो किंवा तुमच्या सेवेत समाधानकारक फळ मिळत नाही असे तुम्हाला वाटते तेव्हा, विश्‍वातील सर्वच तुमच्याकडे पाहात आहेत याची आठवण ठेवा. तुमची सहनशीलता तुमच्या सचोटीची मूक ग्वाही देते. तुमच्या ‘सुयुद्धामुळे’ तुम्हाला ‘युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धरण्यास’ मदत मिळेल.—१ तीम. ६:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा