वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०१ पृ. १
  • ख्रिस्ती सहवास किती महत्त्वाचा आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती सहवास किती महत्त्वाचा आहे?
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • कौटुंबिक आराखडा—मंडळीच्या सभा
    आमची राज्य सेवा—२००५
  • उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • ख्रिस्ती सभांबद्दल कदर बाळगणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तुमची वहिवाट काय आहे?
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km ८/०१ पृ. १

ख्रिस्ती सहवास किती महत्त्वाचा आहे?

१ “कोणीही एक स्वतंत्र बेट नाही.” १७ व्या शतकातील एका कवीने काढलेले हे उद्‌गार, मानवाच्या एका मूलभूत गरजेविषयी बायबलमध्ये जे म्हटले होते त्याचे केवळ पडसाद आहेत. ही गरज म्हणजे सहवास. (नीति. १८:१) आपल्या ख्रिस्ती सहवासामुळे आपली ही गरज पूर्ण होते. या सहवासामुळे आपल्याला कोणकोणते लाभ मिळतात?

२ सेवेत: सर्वात प्रमुख लाभ म्हणजे, सेवाकार्यात बांधव आपल्याला देत असलेली बळकटी आणि आधार. येशूने “दोघे दोघे” असे करून आपल्या शिष्यांना प्रचाराला पाठवले. (मार्क ६:७; लूक १०:१) त्याने घालून दिलेल्या नमुन्याप्रमाणे आपण क्षेत्र सेवा करतो तेव्हा उपदेशक ४:९, १० मधील सत्यता आपल्यालाही पटते. सेवेत सोबत गेल्याने, आपल्या बांधवांचा विश्‍वास, आज्ञाधारकपणा आणि प्रेम पाहून आपल्यालाही धैर्य मिळते, आपला आवेश वाढतो.

३ व्यक्‍तिगत मदत: आपला बंधूसमाज आपल्याला दबावांचा सामना करण्यास व मोहपाशांचा प्रतिकार करण्यासही प्रोत्साहन देतो, मार्गदर्शन देतो. आपले ख्रिस्ती सोबती, आपल्याला आवश्‍यक असलेली वचने आपल्या लक्षात आणून देतील. आपण त्यांच्यासाठी जशी प्रार्थना करतो त्याप्रमाणे तेही आपल्यासाठी प्रार्थना करतील. (२ करिंथ. १:११) तसेच, त्यांचे उत्तम उदाहरण आपल्याला चांगली कार्ये करण्यास व विश्‍वासात मजबूत होण्यास प्रेरित करील.

४ सभेत: आपण नियमितरीत्या मंडळीच्या सभांना उपस्थित राहतो तेव्हा ख्रिस्ती सहवासाचा हा आशीर्वाद उपभोगू शकतो. (इब्री १०:२४, २५) सभांमधील कार्यक्रमात आध्यात्मिक प्रशिक्षण भरपूर असते आणि सभांमध्ये उपस्थित राहिल्याने आपण आपल्या सहउपासकांच्या सहवासाचा आनंद लुटू शकतो. अशाप्रकारे एकत्र आल्यामुळे बंधूभगिनी, स्टेजवरून असो अथवा श्रोत्यांमध्ये बसून असो, आपला विश्‍वास व्यक्‍त करतात तेव्हा त्यांचे अनुभव ऐकण्याची आपल्याला संधी मिळते. (रोम. १:१२) सभांच्या आधी व नंतर आपण एकमेकांबरोबर गप्पागोष्टी करतो तेव्हा आपल्यातील मित्रत्वाची भावना आणखी मजबूत होते. अशावेळी आपल्याला, आपला विश्‍वास वाढवणारे अनुभव सांगण्याची संधी मिळते. यहोवावर, त्याच्या वचनावर, त्याच्या कार्यावर आणि त्याच्या लोकांवर प्रेम करणाऱ्‍या लोकांबरोबर आपण सहवास ठेवतो तेव्हा आपल्या व्यक्‍तिमत्त्वावर देखील याचा चांगला प्रभाव पडतो.—फिलिप्पै. २:१, २.

५ आपल्याला ख्रिस्ती सोबत्यांची गरज आहे. त्यांच्याविना जीवनाकडे जाणाऱ्‍या अरुंद मार्गावर चालत राहणे अतिशय कठीण गेले असते. पण, या ख्रिस्ती सोबत्यांच्या प्रेमामुळे व प्रोत्साहनामुळे आपण यहोवाच्या धार्मिक नव्या जगाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करू शकतो.—मत्त. ७:१४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा