सभांना उपस्थित राहण्यास इतरांना मदत करा
१ “या परिसरात राहणाऱ्या ज्या कुणाला . . . सभांना येण्याची इच्छा असेल त्यांचे हार्दिक स्वागत आहे.” झायन्स वॉच टावर नियतकालिकाच्या नोव्हेंबर १८८० च्या अंकात अशी घोषणा करण्यात आली तेव्हापासून यहोवाच्या साक्षीदारांनी बायबलचे शिक्षण घेण्याकरता एकत्र येण्याचे मोठ्या आनंदाने लोकांना आमंत्रण दिले आहे. (प्रकटी. २२:१७) किंबहुना, हा सत्य उपासनेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
२ उपस्थित राहणे महत्त्वाचे: मंडळीतील संभांना आपण एकत्र येतो तेव्हा आपण अनेक आशीर्वाद अनुभवतो. उदाहरणार्थ, आपल्या अद्भुत परमेश्वर यहोवाला आपण अधिक चांगल्याप्रकारे ओळखू लागतो. तसेच, मंडळीतील सभांना आपण एकत्र येतो तेव्हा खुद्द “परमेश्वरापासून शिक्षण” घेण्याचा बहुमान आपल्याला मिळतो. (यश. ५४:१३) यहोवाची संघटना बायबल शिक्षणाचा असा एक अखंड कार्यक्रम तयार करते ज्यामुळे आपण यहोवाच्या अधिक जवळ जातो आणि ‘देवाच्या संपूर्ण इच्छेचे’ पालन करण्यास आपल्याला व्यावहारिक मदत मिळते. (प्रे. कृत्ये २०:२७, ईजी टू रीड व्हर्शन; लूक १२:४२) याशिवाय, देवाचे वचन इतरांना शिकवण्यात प्रवीण होण्यास आपल्याला वैयक्तिक प्रशिक्षणही सभांमधून मिळते. शास्त्रवचनांतून वारंवार मिळणाऱ्या सल्ल्यामुळे इतरांसोबत आणि विशेषकरून यहोवासोबत चांगला नातेसंबंध जोडण्यास आपल्याला मदत होते. आणि देवावर मनस्वी प्रेम करणाऱ्या लोकांच्या निकट सहवासामुळे देवावरील आपला विश्वास आणखीन मजबूत होतो.—रोम. १:११, १२.
३ थेट आमंत्रण द्या: पहिल्या अभ्यासापासूनच प्रत्येक बायबल विद्यार्थ्याला सभांना येण्याचे आमंत्रण द्या. त्याला हस्तपत्रिका (हँडबिल) द्या. मागच्या सभेतला असा एखादा मुद्दा त्याला सांगा ज्यामुळे तुम्हाला स्वतःला उत्तेजन मिळाले. आणि पुढच्या सभेतील ज्या विषयावर चर्चा केली जाईल त्यातील एखाददोन मुद्देही विद्यार्थ्याला सांगा. त्यामुळे सभांना उपस्थित राहण्याची त्याची उत्सुकता वाढेल. राज्य सभागृह कसे असते याविषयी त्याला सांगा आणि त्याठिकाणी कसे पोचायचे याविषयी योग्य सूचना त्याला द्या.
४ विद्यार्थ्याने लगेच सभांना यायला सुरवात केली नसेल तरी त्याला सतत आमंत्रण देत राहा. आपली संघटना कशाप्रकारे कार्य करते त्याची दर अभ्यासाच्या वेळी थोडक्यात माहिती द्या. यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत या माहितीपत्रकाचा आणि जेहोवाज विटनेसस—द ऑर्गनायझेशन बिहाईन्ड द नेम या व्हिडिओचा उपयोग करून यहोवाच्या साक्षीदारांशी आणि त्यांच्या सभांशी त्याचा परिचय करून द्या. इतर प्रचारकांशीही त्याची ओळख व्हावी म्हणून अधूनमधून अभ्यासाला वेगवेगळ्या प्रचारकांना सोबत घेऊन जा. प्रार्थना करताना संघटनेबद्दल यहोवाला आभार व्यक्त करा, विद्यार्थ्याने या संघटनेशी संगती करण्याची आवश्यकता आहे याचाही प्रार्थनेत उल्लेख करा.
५ आस्था दाखवणाऱ्या नवोदितांना सभांना येण्याकरता मदत करण्यास कचरू नका. यहोवा देवाविषयी त्यांच्या मनात कृतज्ञता आणि कदर वाढत जाते तसतसे शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्याची आणि देवाच्या संयुक्त संघटनेचा भाग बनण्याची त्यांना प्रेरणा मिळेल.—१ करिंथ. १४:२५.