वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०१ पृ. १
  • “देवाला तर सर्व शक्य आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “देवाला तर सर्व शक्य आहे”
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • “अशक्य!” याचा काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • ‘राज्याची ही सुवार्ता गाजवली जाईल!’
    आमची राज्य सेवा—२०१०
  • धैर्याने देवाचे वचन बोलत राहा
    उपासनेतील ऐक्य
  • येशूकडून आवेशाने प्रचार करायला शिका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km ४/०१ पृ. १

“देवाला तर सर्व शक्य आहे”

१ संपूर्ण जगभरात राज्य संदेशाचा प्रचार करणे, हे ख्रिस्ती मंडळीचे प्रमुख कार्य आहे. (मत्त. २४:१४) हे काही साधेसुधे काम नव्हे. पुष्कळांना वाटते, की हे कार्य साध्य करण्यासाठी आपल्याजवळ जितका पैसाअडका आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पैशाची आवश्‍यकता आहे. काहींना वाटते, की आपल्याला लोकांच्या थट्टामस्करीचा, विरोधाचा आणि छळाचा सामना करावा लागत असल्यामुळे हे कार्य केव्हाही पूर्ण होणे शक्य नाही. (मत्त. २४:९; २ तीम. ३:१२) प्रचार कार्यावर टीका करणाऱ्‍यांना खात्रीने वाटते, की हे कार्य साध्य करणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. परंतु येशूने म्हटले: “देवाला तर सर्व शक्य आहे.”—मत्त. १९:२६.

२ अनुकरणाकरता सकारात्मक उदाहरणे: येशूने त्याची सेवा सुरू केली तेव्हा जणू संपूर्ण जगाविरुद्ध त्याचा एकाकी संघर्ष होता. त्याला नाकाम करण्यासाठी विरोधकांनी त्याच्यावर नाही नाही ती संकटे आणली, त्यांनी त्याचा अपमान केला आणि शेवटी यातना देऊन त्याला ठार मारले. तरीसुद्धा, शेवटी येशू अगदी खात्रीने असे म्हणू शकला: “मी जगाला जिंकले आहे.” (योहा. १६:३३) खरोखरच ती एक विलक्षण साध्यता होती!

३ येशूच्या शिष्यांनीही ख्रिस्ती सेवेत तेच धैर्य व तोच आवेश दाखवला. अनेकांना फटके मारण्यात आले, तुरुंगात डांबण्यात आले, ठार मारण्यात आले. तरीसुद्धा त्यांनी, “त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद” केला. (प्रे.कृत्ये ५:४१) सर्व जग त्यांच्या विरुद्ध झाले असतानाही त्यांनी, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” सुवार्तेचा प्रचार करण्याची अशक्य वाटणारी कामगिरी पूर्ण केली.—प्रे.कृत्ये १:८; कलस्सै. १:२३.

४ आपल्या दिवसांत आपण यशस्वी होऊ शकतो: आपणही राज्य प्रचाराचे कार्य हाती घेतले आहे. आपल्यासमोर देखील अनेक अडचणी आल्या आहेत, तरीसुद्धा आपण आवेशाने प्रचार करत राहिलो. आपल्याला थांबवण्याकरता आपल्यावर बंदी घालण्यात आली, आपल्याला छळण्यात आले, आपल्या अनेक बंधूभगिनींना तुरूंगात डांबण्यात आले, नाना तऱ्‍हेचे हिंसक प्रयत्न करण्यात आले. तरीपण आपण यशस्वी होत चाललो आहोत. हे कसे शक्य झाले आहे बरे? “‘बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धि होईल,’ असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.” (जख. ४:६) यहोवा आपल्या पाठीशी असताना कोणीही आणि काहीही आपले प्रचाराचे हे कार्य थांबवू शकत नाही!—रोम. ८:३१.

५ आपण प्रचार करतो तेव्हा आपल्याला घाबरण्याचे, भयभीत होण्याचे किंवा कमकुवत वाटण्याचे काही एक कारण नाही. (२ करिंथ. २:१६, १७) राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत पुढे जाण्यासाठी आपल्याजवळ एकापेक्षा एक सरस कारणे आहेत. यहोवाच्या साहाय्याने आपण जे “अशक्य” आहे ते शक्य करून दाखवू!—लूक १८:२७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा