वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९९ पृ. ८
  • आपली सेवा वाढवण्याचे मार्ग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपली सेवा वाढवण्याचे मार्ग
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • राज्य सेवेचा तुमचा ठेवा वाढवा
    आमची राज्य सेवा—१९९४
  • तुम्हाला आणखी भाग घ्यायची इच्छा आहे का?
    आमची राज्य सेवा—२००१
  • आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • यहोवाच्या सेवेत कार्यमग्न राहणे
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ५/९९ पृ. ८

आपली सेवा वाढवण्याचे मार्ग

१ तब्बल ४० वर्षांपूर्वी जानेवारी १५, १९५५ च्या (इंग्रजी) टेहळणी बुरूज नियतकालिकात, “तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात का?” अशा शीर्षकाचा एक लेख आला होता. आपल्या राज्य कार्यहालचालीत वाढ व्हावी म्हणून यहोवाच्या प्रत्येक सेवकाला सेवाकार्यात अधिक प्रयत्न कसा करता येईल हा मुद्दा अगदी प्रेमळपणे त्यात मांडला होता. आपण अधिकाधिक प्रयत्न करत असताना तो उत्तम सल्ला आजही लागू होतो.

२ आपण करीत असलेली सेवा, “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रीति कर” या सर्वश्रेष्ठ आज्ञेने प्रेरित होऊन केली पाहिजे. (मार्क १२:३०) यहोवाच्या राज्य कार्याची वृद्धी होण्यासाठी आज आपल्याला उपलब्ध असलेल्या सर्व संधींचा पूर्ण फायदा घेऊन आपण यहोवावरील आपले संपूर्ण प्रेम प्रदर्शित करत असतो. आपली सेवा वाढवण्यासाठी खाली सुचवलेले काही मार्ग आपण लक्षात घेऊ या.

३ जबाबदारी घ्या: जे बांधव समर्पित आहेत ते पुढे सेवा सेवक आणि मग वडील या नात्याने सेवा करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या पात्रता गाठण्याचा प्रयत्न करू शकतात. मे १, १९९१ च्या टेहळणी बुरूज मासिकातील, “तुम्ही देखरेख्याच्या पदासाठी प्रयत्न करत आहात का?” आणि “तुम्ही सेवा करण्यास पात्र आहात का?” या दोन लेखांनी अनेक बांधवांना मंडळीच्या जबाबदाऱ्‍या पत्करण्यास पुढे येण्याची प्रेरणा दिली. जबाबदाऱ्‍या हाताळण्यासाठी तसेच पात्र होण्यासाठी काय करावे यावरील विशिष्ट सल्ल्याकरता तुमच्या मंडळीतील वडिलांकडे विचारपूस करा.

४ जे वडील आणि सेवा सेवक अविवाहित आहेत ते सेवा प्रशिक्षण प्रशालेसाठी अर्ज भरण्याचा गांभीर्याने विचार करू शकतात. या प्रशालेविषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही १९८६-१९९५, १९९६ आणि १९९७ ची टेहळणी बुरूज प्रकाशन सूची (इंग्रजी) यात “सेवा प्रशिक्षण प्रशाला” या विषयाखाली दिलेले संदर्भ वाचू शकता. हे “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार” तुमच्यासाठी उघडल्याचे तुम्हाला दिसते का? (१ करिंथ. १६:९अ) ज्या अनेक बांधवांनी त्या द्वारातून प्रवेश केला त्यांनी त्यापलीकडे असलेल्या सेवेच्या अमाप विशेषाधिकारांची कल्पनासुद्धा कधी केली नसेल. पण आता, ते बेथेलमध्ये सेवा करत आहेत किंवा खास पायनियर, मिशनरी अथवा विभागीय पर्यवेक्षक या नात्याने क्षेत्रात आनंदाने सेवा करत आहेत.

५ पूर्ण-वेळेच्या सेवेसाठी झटा: कॉलेज शिक्षण पूर्ण केलेले युवक, गृहिणी आणि सेवा निवृत्त झालेल्या सर्वांनी पायनियरींग करण्याचा गांभीर्याने विचार करावा. जुलै १९९८ ची आमची राज्य सेवा यातील पुरवणीची उजळणी करा आणि मग तुमच्यासारख्याच परिस्थितींतून गेलेल्या पायनियरांशी याबद्दल बोला. कदाचित, त्यांच्याप्रमाणेच तुम्हाला देखील आपली सेवा वाढवण्याची प्रेरणा मिळेल. (१ करिंथ. ११:१) दर महिना, सेवेत ७० तास खर्च करून एक नियमित पायनियर म्हणून सेवा करणे तुम्हाला शक्य आहे का?

६ आज जगभरातील आपल्या शाखा दफ्तरांत आणि बेथेलगृहांत १७,००० हून जास्त बंधुभगिनी सेवा करत आहेत. अशा सेवेसाठी अर्ज भरायचा असल्यास काय करण्यास हवे याविषयी नोव्हेंबर १९९५ ची आमची राज्य सेवा यात सविस्तर माहिती दिलेली आहे. ती पुरवणी वाचून बेथेल सेवेच्या अनन्यसाधारण विशेषाधिकारासाठी तुम्ही पात्र होऊ शकता की नाही हे पाहण्यात काय हरकत आहे?

७ सर्वाधिक गरज असलेल्या ठिकाणी सेवा करा: जे क्षेत्र वारंवार उरकलेले आहे किंवा ज्या ठिकाणी क्षेत्राचा भार उचलण्यासाठी इतर अनेक बांधव आहेत अशा ठिकाणी तुम्ही राहत आहात का? जेथे अत्याधिक गरज आहे अशा ठिकाणी स्थलांतर करून आपली सेवा वाढवण्याचा विचार तुम्ही केला आहे का? कदाचित, अधिक सेवकांची गरज असलेल्या एखाद्या जवळपासच्या ग्रामीण भागात तुम्ही स्थलांतर करू शकता. (मत्त. ९:३७, ३८) पण, हा निर्णय तडकाफडकी घेतला जाऊ नये. त्यासाठी अगोदर प्रार्थनापूर्वक विचार करण्याची गरज आहे. (लूक १४:२८-३०) मंडळीतील वडिलांशी तसेच विभागीय पर्यवेक्षकांशी तुमच्या परिस्थितींबद्दल सविस्तर बोला. आताच स्थलांतर करणे योग्य आहे की आणखीन थोडी तयारी करून मग स्थलांतर करणे योग्य राहील याची चर्चा ते तुमच्याशी करतील. कोठे स्थलांतर करावे यावरील सल्ल्यासाठी तुम्ही संस्थेला लिहू इच्छित असल्यास तुमच्या या पत्रासोबत मंडळीच्या सेवा समितीने स्वाक्षरी केलेले पत्र देखील जोडलेले असावे.

८ तुमच्या सेवेची गुणवत्ता वाढवा: आपल्या क्षेत्र सेवेची गुणवत्ता वाढवून बहुधा आपण सगळेच जण अधिक पूर्णार्थाने सेवेत सहभाग घेऊ शकतो. घरोघरचे आणि अनौपचारिक साक्षीकार्य तसेच पुनर्भेटीचे आणि बायबल अभ्यासाचे कार्य यांसारख्या सेवेच्या सर्व पैलूंमध्ये तुम्ही सहभाग घेता का? तुम्ही एखादा बायबल अभ्यास घेत असल्यास तुमची शिकवण्याची कला तुम्ही आणखीन सुधारू शकता का? तुमच्या विद्यार्थ्याला सर्मपण करण्यास आणि बाप्तिस्मा घेण्यास तुम्ही कसे प्रवृत्त करू शकता यावरील अधिक माहितीसाठी जून १९९६ ची आमची राज्य सेवा यातील पुरवणीची उजळणी करा.

९ आपली सेवा वाढवण्याचे आणि ती सुधारण्याचे मार्ग कोणते यावरील सविस्तर चर्चा आपली सेवा पूर्ण करण्यास संघटित या पुस्तकातील ९ व्या अध्यायात केलेली आहे. खरेच, देवाच्या सेवेत शक्य तितके करण्याची आपणा प्रत्येकाची इच्छा असावी. मग आपल्या आध्यात्मिक ध्येयांचा गांभीर्याने विचार का करू नये? त्यासाठी पहिले तीमथ्य ४:१५ यात दिलेल्या सल्ल्याचा अवलंब करा: “तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव [“विचार कर,” NW]; ह्‍यात गढून जा.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा