वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९९ पृ. १
  • यहोवा आपल्याला शिकवतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आपल्याला शिकवतो
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • विविध ईश्‍वरशासित प्रशाला यहोवाच्या प्रेमाचा पुरावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • राज्य सेवा शाळा आध्यात्मिक शिक्षण देते
    आमची राज्य सेवा—१९९२
  • सेवाकार्य प्रशिक्षण प्रशाला—मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार
    आमची राज्य सेवा—२००५
  • पायनियरांसाठी कोण-कोणत्या प्रशाला आहेत?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ६/९९ पृ. १

यहोवा आपल्याला शिकवतो

१ देवाच्या मार्गदर्शनाखाली आज २३३ देशांमध्ये एक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम चालू आहे. यातून मिळणारे शिक्षण कोणत्याही जगीक ज्ञानापेक्षा सरस आहे. अनंत जीवनाकरता आपल्याला तयार करण्यासोबतच, सध्याच्या काळातही आपल्याकरता जे हितकारक आहे, त्याचे शिक्षण आपला महान शिक्षक यहोवा आपल्याला देत आहे.—यश. ३०:२०, NW; ४८:१७.

२ ईश्‍वरी शिक्षण देणाऱ्‍या प्रशाला: यहोवाच्या लोकांच्या फायद्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या प्रशालांचे उदाहरण घ्या. दर आठवडी सुमारे ८७,००० मंडळ्यांतून होणारी ईश्‍वरशासित सेवा प्रशाला लाखो राज्य प्रचारकांना सुवार्तेचा प्रचार करणारे प्रभावशाली सेवक बनण्याची तालीम देते. या प्रशालेत तुम्ही आपले नाव नोंदवले आहे काय? तसेच दोन सप्ताहांच्या पायनियर सेवा प्रशालेस उपस्थित राहिलेल्या हजारो लोकांपैकी तुम्ही देखील एक आहात का? नियमित पायनियरांच्या तासांची मागणी कमी केली असल्यामुळे कदाचित आता पूर्वीपेक्षा अधिक प्रचारकांना पायनियरींग करणे शक्य होईल आणि या प्रशालेस उपस्थित राहण्यास पात्र होता येईल. याशिवाय, आज जगभरात प्रमुख भाषांमधून चालवली जाणारी दोन महिन्यांची सेवा प्रशिक्षण प्रशाला अविवाहित वडिलांना आणि सेवा सेवकांना अधिक ईश्‍वरशासित जबाबदाऱ्‍या पेलण्यास तयार करत आहे. तसेच वेळोवेळी, सर्व वडिलांना आणि सेवा सेवकांना खास प्रकारचे प्रशिक्षण देण्याकरता राज्य सेवा प्रशालेचे आयोजन केले जाते.

३ प्रगत ईश्‍वरशासित प्रशिक्षण देण्यासाठी, पॅटरसन, न्यू यॉर्क येथील वॉचटावर शिक्षण केंद्रात तीन खास स्वरूपाच्या प्रशाला आयोजित केल्या जातात. पाच महिन्यांची गिलियड वॉचटावर बायबल प्रशाला, परदेशांत मिशनरी कार्य करण्यासाठी सेवकांना तयार करते. तर जगभरातील शाखा समितीच्या सदस्यांसाठी, शाखा समायोजनावर दोन महिन्यांचा अभ्यासक्रम असतो. याच वर्षी मे महिन्यात, प्रवासी पर्यवेक्षकांसाठी नव्यानेच सुरू केलेल्या दोन महिन्यांच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्गाला संयुक्‍त संस्थाने आणि कॅनडा येथील ४८ विद्यार्थी उपस्थित होते. सरतेशेवटी, अशा निरनिराळ्या प्रशालांच्या माध्यमातून यहोवा देत असलेल्या प्रशिक्षणाच्या उत्तम परिणामांचा प्रत्यय त्याच्या सर्व सेवकांना येत आहे.

४ शिक्षणाचा हेतू? नियमन मंडळाच्या एका सदस्याने म्हटले: “आमच्या चालू शैक्षणिक कार्यक्रमाचा हेतू, जगाच्या पाठीवर असलेल्या यहोवाच्या सर्व लोकांना नीतिसूत्रे १:१-४ मध्ये वर्णन केलेल्या उत्तम प्रौढ स्थितीत आणणे हा आहे.” यास्तव, आपल्यापैकी प्रत्येकाला यहोवा “सुशिक्षितांची जिव्हा” देत राहो.—यश. ५०:४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा