पुढाकार घेणारे ओव्हरसियर —थियोक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल ओव्हरसियर
१ थियोक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल ओव्हरसियर हा आध्यात्मिकदृष्ट्या प्रौढ असून उपदेश करण्यासाठी आणि मंडळीला शिकवण्यासाठी अथक परिश्रम करतो; त्यामुळे आपण त्याचा सन्मान केला पाहिजे तसेच त्याला सहकार्यही केले पाहिजे. (१ तीम. ५:१७) त्याच्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात?
२ किंग्डम हॉलमध्ये असलेली लायब्ररी त्याच्याच देखरेखीखाली येते. जो कोणी स्कूलमध्ये नाव नोंदवण्यास योग्य असेल, अशा प्रत्येकाला उत्तेजन देण्यासाठी त्याचा खास प्रयत्न असतो. तसेच स्कूलच्या असाईन्मेंट्सचाही तो चोख रेकॉर्ड ठेवतो कारण कमीतकमी तीन आठवड्यांआधी अगदी सुव्यवस्थितपणे ज्याला त्याला असाईन्मेंट्स देणे ही त्याची जबाबदारी असते. मंडळीतील प्रत्येकाशी त्याची चांगली ओळख असली पाहिजे; प्रत्येक विद्यार्थी आणि त्याच्या क्षमता स्कूल ओव्हरसियरने लक्षात घेतल्या पाहिजेत. स्कूलचा आराखडा तयार करण्यात तो दुसऱ्या एखाद्याची मदत घेऊ शकतो; पण कोणत्या व्यक्तीला कोणता भाग नेमून द्यायचा हे स्कूल ओव्हरसियरच विचारपूर्वक ठरवतो.
३ स्कूलच्या दरम्यान उत्तमरित्या सर्वांना शिकायचे असेल तर स्कूल ओव्हरसियरने प्रत्येक आठवड्याचा नेमलेला भाग अगदी पूर्णपणे तयार केला पाहिजे. नेमलेल्या भागाचा त्याने सखोल अभ्यास करण्यासाठी त्याला मेहनत करावी लागेल. पण त्याने अशारितीने तयारी केली तर स्कूलच्या प्रत्येक भागाविषयी श्रोत्यांची उत्सुकता जागृत करण्यासाठी, नेमून दिलेल्या भागातले महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्याने आपल्या भाषणात आणले आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी तसेच पुढे रिटन रिव्ह्यूमध्ये येणाऱ्या मुख्य मुद्द्यांवर जोर देण्यासाठी त्याला मदत होते.
४ प्रत्येक विद्यार्थी भाषणानंतर, स्कूल ओव्हरसियर विद्यार्थ्याची प्रशंसा करतो आणि भाषणाचा विशिष्ट गुण चांगला का होता किंवा त्यावर आणखीन सुधारणा करण्याची गरज का आहे याचे स्पष्टीकरण देतो. स्कूलमध्ये मिळणाऱ्या असाईन्मेंट्स तयार करण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला अधिक मदत हवी आहे असे दिसून आल्यास स्कूल ओव्हरसियर स्वतः किंवा त्याने नेमून दिलेली एखादी व्यक्ती विद्यार्थ्याला व्यक्तिगतपणे मदत करू शकते.
५ खरेच, स्कूल ओव्हरसियर तसेच त्याच्या हाताखाली काम करणारे बांधव खूप मेहनत करतात. पण याचा पूर्ण फायदा घेण्यासाठी आपण नियमितपणे या स्कूलमध्ये उपस्थित राहिले पाहिजे. नेमून दिलेल्या असाईन्मेंट्स आपण पूर्ण केल्या पाहिजेत, तसेच इतर विद्यार्थ्यांना दिलेला सल्ला आपणही लागू केला पाहिजे. असे केल्यास चार लोकांत आणि घरोघरी देवाच्या राज्याचा संदेश कुशलतेने सांगण्यात आपली प्रगती होत राहील.—प्रे. कृत्ये २०:२०; १ तीम. ४:१३, १५.