मला एक बायबल अभ्यास हवा आहे!
१ अनेकजण असे म्हणतात आणि असे वाटणे साहाजिक आहे. बायबल अभ्यासांमार्फतच नवीन शिष्य बनवण्याचे आपले ध्येय आपण गाठत असतो. (मत्त. २८:१९, २०) पण असे असताना देखील आपल्यापैकी अनेकजण असे आहेत ज्यांना कित्येक महिने किंवा कित्येक वर्षे एखाद्याला सत्यात आणल्यामुळे मिळणारा खास आनंद अजूनही अनुभवायला मिळालेला नाही. तर मग नोव्हेंबर महिन्यात यासाठी आपण काही करू शकतो का? या महिन्यात आपण क्षेत्रामध्ये ज्ञान पुस्तक सादर करणार आहोत; त्यामुळे या पुस्तकाचा उपयोग करून नवीन बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू शकतो.
२ एखाददोन शनिवार-रविवार राखून ठेवा: आम्ही सर्वांना असे उत्तेजन देत आहोत, की या महिन्यात खास नवीन बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी त्यांनी काही वेळ राखून ठेवावा. बुक स्टडी चालवणाऱ्या बांधवांनी खास या कारणासाठी एखादा किंवा त्यापेक्षा अधिक शनिवार-रविवार निवडावेत आणि मग पुनर्भेटी करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करता यावा म्हणून आपापल्या गटांमध्ये तशा योजना आखाव्यात.
३ क्षेत्र सेवेच्या सभांना येताना पुनर्भेटींसाठी घेतलेल्या नोंदी सोबत घेऊन या. मग ज्यांनी आस्था दाखवली आहे, काही मासिक, पुस्तक घेतले आहे किंवा जे मंडळीच्या सभांना उपस्थित राहिले आहेत अशा लोकांना पुन्हा भेटी द्या. बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशानेच प्रत्येक पुनर्भेट करा.
४ बायबल अभ्यास कसा केला जातो ते दाखवा: क्षेत्र सेवेच्या काही निवडक सभांमध्ये चांगल्या प्रकारे तयार केलेले एक प्रात्यक्षिक दाखवा आणि त्यात पुनर्भेटी करताना अभ्यास कसा सुरू केला जातो हे दाखवा. तुम्ही असे म्हणू शकता: “आज पुष्कळ लोकांकडे बायबल आहे; पण आपल्या सर्वांपुढे असलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं बायबलमध्येच आहेत हे मात्र त्यांना माहीत नसतं. [ज्ञान पुस्तकातले निरनिराळे विषय दाखवा आणि अध्याय क्र. ३, ५, ६, ८ आणि ९ ची शीर्षके दाखवा.] खास अभ्यासासाठी तयार केलेल्या या पुस्तकातून प्रत्येक आठवडी फक्त एक तास जरी अभ्यास केला तरी काही महिन्यांतच तुम्ही बायबलच्या मूलभूत गोष्टी शिकू शकाल. या विषयांपैकी तुम्ही एखादा विषय निवडला तर बायबल अभ्यास कसा केला जातो हे मला तुम्हाला दाखवता येईल.” पण एखाद्याला अभ्यासासाठी इतका वेळ देणे शक्य नसेल तर आपण कमी वेळेचा अभ्यास देखील चालवतो हे त्याला सांगा. अपेक्षा माहितीपत्रक दाखवा आणि दर आठवडी तुम्ही केवळ १५ ते ३० मिनिटे त्यांच्यासोबत अभ्यास कराल असे सांगा.
५ अशाप्रकारे बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले आणि आपले हे प्रयत्न यहोवाने आशीर्वादित करावेत अशी आपण प्रार्थना केली तर आपल्याला नक्कीच नवीन अभ्यास मिळतील! (१ योहा. ५:१४, १५) तुम्हालाही एक बायबल अभ्यास हवा असल्यास ही संधी खास तुमच्यासाठीच आहे.