वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९८ पृ. ६
  • भारतीय भाषांमध्ये सोल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भारतीय भाषांमध्ये सोल
  • आमची राज्य सेवा—१९९८
आमची राज्य सेवा—१९९८
km ११/९८ पृ. ६

भारतीय भाषांमध्ये सोल

जेव्हा भारतीय लेखक किंवा वक्‍ते अमरत्वाच्या शिकवणुकीचा उल्लेख करतात तेव्हा ते नेहमी आत्मा हा शब्द वापरतात आणि त्यांच्या मते आत्मा म्हणजे माणसाच्या आत असणारे काहीतरी जे कधीच मरत नाही. पण, ख्रिस्ती धर्मजगताच्या बायबल अनुवादांमध्ये ग्रीक भाषेतल्या न्यूमा (इंग्रजी: स्पिरिट) या शब्दासाठी आत्मा हा शब्द वापरला आहे. काही ठिकाणी त्यांनी हिब्रू भाषेतल्या नेफेश (इंग्रजी: सोल) या शब्दाचे प्राणी किंवा प्राण म्हणजे श्‍वासोच्छ्‌वास करणारा असे योग्य भाषांतर केले आहे. माणूस स्वतः एक प्राणी (हिब्रू: नेफेश) “आहे” हे कोणी मान्य केले तरीसुद्धा आत्मा किंवा असे काहीतरी “त्याच्यात आहे” असेच ते गृहित धरतील.

मृत्यूच्या नंतर जिवंत राहणारे अमर असे काहीही माणसाच्या आत नसते हे बायबल सत्य सुस्पष्ट करण्यासाठी आपल्या काही प्रकाशनांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे; खासकरून जेथे मरणोत्तर जीवनाच्या संदर्भात चर्चा केलेली आहे तिथे. याचेच एक उदाहरण जुलै १, १९९८ च्या टेहळणी बुरूज मासिकातील अभ्यास लेखांत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा