मन आणि अंतःकरण आकर्षिण्यासाठी माहितीपत्रकांचा उपयोग करा
१ मन आणि अंतःकरण दोन्ही आकर्षित होतील अशाप्रकारे बायबल सत्य सादर केले जावे. आपल्या श्रोत्यांना सत्याचे स्पष्टीकरण देताना येशूने त्यांच्या जिव्हाळ्याचे व त्यांना प्रोत्साहित करणारे विषय निवडले. (लूक २४:१७, २७, ३२, ४५) आपल्या श्रोत्यांच्या आध्यात्मिक गरजा ओळखण्यास आपण करीत असलेल्या प्रयत्नांवर आपल्या सेवेचे यश मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.
२ सेवेत भेटणाऱ्या लोकांच्या मनाप्रत व अंतःकरणाप्रत पोहंचण्यासाठी माहितीपत्रके प्रभावशाली साधन असू शकतात. ऑगस्ट महिन्यात सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक माहितीपत्रकातील संदेशास कोण प्रतिसाद देण्याची शक्यता आहे याचा आगाऊ विचार करा:
—देव खरोखरी आपली काळजी करतो का? आर्थिक टंचाई असलेल्या किंवा दुर्घटनेचा सामना केलेल्या लोकांना दुःखविरहीत भविष्याचा हा सांत्वनदायक संदेश अपीलकारक ठरेल.
—जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? भविष्याचा गंभीरपणे विचार करणारे युवक या माहितीपत्रकातील बायबल आधारित उत्तरांपासून लाभ मिळवतील.
—भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! यातील बहुसंख्य चित्रे व उल्लेखित वचने लहान मुलांना तसेच फारसे वाचता येत नसलेल्यांना देवाचा उद्देश समजण्यास मदत करतील.
—नंदनवन आणविणारे सरकार. देवाचे राज्य मानवजातीच्या बिकट समस्या कशा सोडवील या संदेशास सरकारशी कोणत्याही प्रकारचा संबंध राखणारी व्यक्ती प्रतिसाद देऊ शकते.
—तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा. (इंग्रजी) स्मशानभूमीची पाहणी करणाऱ्या अनेकांना मृत व्यक्तीच्या कुटुंबांना देण्याकरता या माहितीपत्रकाच्या प्रती आपल्याजवळ ठेवण्यास आवडते. दफनभूमीत साक्षकार्य करणारे प्रचारक, शोकित लोकांचे सांत्वन करण्यासाठी या माहितीपत्रकाचा उपयोग करतात. दोन बहिणी, दफनभूमीत प्रार्थना करत असलेल्या सात कौटुंबिक सदस्यांशी जाऊन बोलल्या. माहितीपत्रकातील सांत्वनदायक संदेश त्यांना सांगितल्यामुळे दुसऱ्याच दिवशी, त्यांच्यातील आईने बायबल अभ्यास करण्यास सुरवात केली!
—तुम्ही त्रैक्यावर विश्वास ठेवावा का? ज्या वास्तविकपणे या माहितीपत्रकात ख्रिस्ती धर्मजगताचे मूलभूत सिद्धान्त उघड केले आहेत त्यामुळे अतिशय धार्मिक वृत्तीची एखादी व्यक्ती कदाचित सत्याला प्रतिसाद देईल.
३ प्रत्येक माहितीपत्रकाशी परिचित व्हा आणि तुमच्या क्षेत्रात त्याचा सर्वोत्तम उपयोग कसा करता येईल याचा विचार करा. सुचवलेल्या प्रस्तुतींसाठी जुलै १९९८ ची आमची राज्य सेवा यातील शेवटले पृष्ठ पाहा. लोकांच्या मनाप्रत व अंतःकरणाप्रत पोहंचण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयास यहोवा आशीर्वीदित करो.—मार्क ६:३४.