पर्यवेक्षक पुढाकार घेतात—अध्यक्षीय पर्यवेक्षक
१ मंडळीमध्ये पर्यवेक्षक या नात्याने सेवा करणे ही एक गंभीर जबाबदारी आहे. (प्रे. कृत्ये २०:२८; १ तीम. ३:१) ख्रिस्ती वडिलांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांविषयी सांगणाऱ्या मालिकेचा हा पहिला लेख आहे. यामुळे वडील आपल्याकरता करत असलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची आपण सर्वजण कदर बाळगू शकतो.
२ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी अनिश्चित काळापर्यंत सेवा करावी म्हणून संस्था त्यांची नियुक्ती करते. अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी सहकार्य दाखवल्यामुळे वडिलांना त्यांच्या नियुक्त जबाबदाऱ्यांकडे योग्य ते लक्ष देण्यास मदत होते. (आपली सेवा, पृ. ४२) यामध्ये कशाचा समावेश होतो?
३ मंडळीचे टपाल अध्यक्षीय पर्यवेक्षकांना प्राप्त होते आणि ते त्वरेने ते टपाल मंडळीचा सचिवांच्या हाती पुढील कार्यासाठी सोपवून देतात. वडिलांच्या सभेची तयारी करताना अध्यक्षीय पर्यवेक्षक चर्चा करण्यात येणाऱ्या मुद्यांवर इतर वडिलांकडून असे मुद्दे मागतात ज्यांवर चर्चा करायची आहे व नंतर सभेकरता विषयपत्रिका तयार करतात. अध्यक्षीय पर्यवेक्षक वडीलवर्गाच्या सभेत अध्यक्ष म्हणून सेवा करतात. घेण्यात आलेल्या निर्णयांची योग्य ती अंमलबजावणी केली जाते किंवा नाही, याचीही ते पाहणी करतात. सेवा सभेच्या तयारीचे आणि जाहीर भाषणाच्या आराखड्याचे ते पर्यवेक्षण करतात. मंडळीमध्ये करण्यात येणाऱ्या घोषणांना ते संमती दर्शवतात, नेहमीच्या आर्थिक व्यवहाराकरता लागणारी रक्कम त्यांच्या परवानगीने दिली जाते तसेच मंडळीच्या त्रैमासिक जमाखर्चाचा हिशेब ठेवला जात असल्याचीही ते खात्री करतात.
४ अध्यक्ष, या नात्याने अध्यक्षीय पर्यवेक्षक मंडळीच्या सेवा समितीच्या कार्याचे संयोजन करतात. बाप्तिस्मा न झालेला प्रचारक होण्याकरता बायबल विद्यार्थी विचारतो किंवा बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकाला बाप्तिस्मा घ्यायचा असतो तेव्हा त्याची भेट घेण्याकरता अध्यक्षीय पर्यवेक्षक वडिलांची व्यवस्था करतात. विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीची तयारी करण्यातही अध्यक्षीय पर्यवेक्षक पुढाकार घेतात ज्यामुळे त्या खास सप्ताहातील कार्याचा मंडळीला पूर्णपणे लाभ होऊ शकतो.
५ अध्यक्षीय पर्यवेक्षकांची अनेक आणि विविध कर्तव्य कर्मे आहेत. अध्यक्षीय पर्यवेक्षक नम्रपणे त्यांच्या जबाबदाऱ्या ‘खऱ्या आस्थेने’ करत असताना आपण सर्व वडिलांना सहकार्य करून आपली भूमिका पार पाडू शकतो. (रोम. १२:८) आपल्यामध्ये पुढाकार घेणाऱ्यांच्या आपण “आज्ञेत” आणि त्यांच्या “अधीन” राहिलो तर ते त्यांचे कार्य मोठ्या आनंदाने पार पाडू शकतील.—इब्री. १३:१७.