वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९८ पृ. ७
  • खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • नवीन खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—२०००
  • खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९७
  • “यथाकाळी” मिळणारे आध्यात्मिक अन्‍न
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ८/९८ पृ. ७

खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम

सन १९८७ पासून खास संमेलन दिवसांच्या तरतुदीची सुरवात झाली. यहोवाच्या सेवकांसाठी आणि उपस्थित राहणाऱ्‍या सर्व आस्थेवाईकांसाठी हे एक दिवसीय मेळावे नेहमीच उभारणीकारक ठरले आहेत. जानेवारी १९९९ पासून खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम सादर केला जाईल. त्यातील नऊ भाषणे आणि अनेक मुलाखती व अनुभव तुम्हाला आध्यात्मिकरित्या लाभदायक वाटतील.

या नवीन कार्यक्रमाचा विषय, “यहोवाच्या मेजाविषयी कदर बाळगा,” असा आहे. (यश. ६५:१; १ करिंथ. १०:२१) या कार्यक्रमाद्वारे, आपल्या जीवनात यहोवाची उपासना प्रथमस्थानी आली पाहिजे हा आपला संकल्प आणखीनच दृढ केला जाईल. (स्तोत्र २७:४) “आपल्या अंतःकरणाचा कल परीक्षणे” असा विभागीय पर्यवेक्षकांच्या भाषणाचा विषय असेल; सभांना उपस्थित राहण्याविषयी आपली मनोवृत्ती कशी असावी हे वरील भाषणात हाताळले जाईल. “यहोवाच्या मेजावरील अन्‍नग्रहण करून आध्यात्मिकता टिकवून ठेवणे” कसे शक्य आहे हे पाहुणे वक्‍त्‌याच्या भाषणातून स्पष्ट होईल. यहोवाच्या संघटनेतील युवकांना, देवाची सेवा करण्यात दृढनिश्‍चयी राहण्याचे व्यावहारिक प्रोत्साहन देखील दिले जाईल. पाहुण्या वक्‍त्‌याच्या मुख्य भाषणाचा विषय, “निर्भीड साक्ष देण्यासाठी आध्यात्मिकरित्या बलवान केलेले” असे असून हे भाषण आपल्याला दाखवून देईल, की राज्याविषयी निर्भीडपणे साक्ष देण्यासाठी मंडळीतर्फे केल्या जाणाऱ्‍या तरतुदी आपल्याला कशा सुसज्ज करू शकतात. कोणाला या कार्यक्रमापासून लाभ घ्यावासा वाटणार नाही बरे?

बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या नवीन समर्पितांनी शक्य तितक्या लवकर अध्यक्षीय पर्यवेक्षकांना याची माहिती द्यावी. आमचा विश्‍वास आहे, की खास संमेलन दिवसाच्या योजनेच्या १२ व्या वर्षांत पदार्पण करताना उपस्थित असलेल्या सर्वांनाच पुढील कार्यासाठी आध्यात्मिक उभारी मिळेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा