वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९७ पृ. १
  • शिष्य बनविणारे बायबल अभ्यास

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शिष्य बनविणारे बायबल अभ्यास
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • “कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार?”
    आमची राज्य सेवा—२०००
  • बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला आपण मदत कशी करू शकतो?—भाग १
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • पवित्र शास्त्राभ्यास घेणाऱ्‍या विद्यार्थ्यांना प्रगति करण्याचे उत्तेजन द्या
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ज्ञान पुस्तकाद्वारे शिष्य कसे बनवावेत
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९७
km ९/९७ पृ. १

शिष्य बनविणारे बायबल अभ्यास

१ “मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” असा प्रश्‍न कुशी षंढाने केला जेव्हा फिलिप्पाने “येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.” (प्रे. कृत्ये ८:२७-३९) षंढाच्या बाबतीत पाहता, त्याला आधीपासून देवाच्या प्रेरित वचनांची आवड होती आणि म्हणूनच फिलिप्पाकडून आध्यात्मिक मदत मिळाल्यानंतर तो एक शिष्य होऊ इच्छित होता. परंतु, आपण स्वतः शास्त्रवचनांचे परीक्षण केले पाहिजे ही गोष्ट मात्र सर्वच लोकांच्या मनाला पटत नाही.

२ आपल्या काळासाठी असणारा बायबलचा संदेश अल्पावधित परीक्षण्यास मदत व्हावी म्हणून यहोवाच्या संघटनेने, देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक पुरवले आहे यासाठी आभार मानायला हवे. सुशिक्षित असलेल्या, परंतु बायबलचे तुटपुंजे ज्ञान असणाऱ्‍या प्रांजळ लोकांसाठी माहितीपत्रकातील माहिती अपीलकारक ठरेल. बायबलचे अवलोकन करण्यास लोकांना प्रवृत्त करण्याच्या हेतूने ह्‍या उत्तम साधनाची रचना करण्यात आली आहे.

३ बायबल अभ्यास सुरू करत असताना, जून १९९६ ची आमची राज्य सेवा पुरवणी यात, ज्ञान पुस्तकामार्फत सुफल अभ्यास कसा संचालित केला जाऊ शकतो यावरील उत्कृष्ट सुचनांची उजळणी करणे उपयुक्‍त ठरू शकते. अभ्यासक्रमाच्या दरम्यान, विद्यार्थ्याच्या प्रगतीची नोंद घ्या जेणेकरून अधिक अवधानाची गरज असलेली क्षेत्रे तुम्ही ओळखू शकाल. आपल्या पाठांची पूर्वतयारी करण्यास व शास्त्रवचने आधीच वाचून ठेवण्यास विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्या. त्याने आपल्या स्वतःच्या शब्दांत मांडलेली विवेचने सत्याबद्दल असणारी त्याची मनस्वी कदर प्रकट करतील. संस्थेच्या प्रकाशनांचे अतिरिक्‍त वाचन करणारे तसेच नियमितपणे मंडळीच्या सभांना उपस्थित राहणारे लोक बहुधा जलदगतीने प्रगती करतात. विद्यार्थी जे काही शिकत आहे, त्याबद्दल इतरांपाशी अनौपचारिकरित्या बोलण्यास त्याला प्रोत्साहन द्या. आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी त्याने काय केले पाहिजे ते प्रेमळपणे त्याला दाखवून द्या. चंचल मनोवृत्ती असलेल्या लोकांसोबत आपण वर्षानुवर्षे अभ्यास करत राहू नये. सत्य शिकण्यासाठी, सत्याकरता एक दृढ भूमिका घेण्यासाठी व समर्पण आणि बाप्तिस्म्याप्रत प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्याने स्वतः पुढाकार घेतला पाहिजे.

४ कुटुंबातील सर्वच सदस्य एकत्र बसून अभ्यास करत नसल्यामुळे काही कुटुंबांत एकाहून अधिक अभ्यास संचालित केले जातात. तथापि पुष्कळदा, एक संयुक्‍त कौटुंबिक अभ्यास असणे अधिक चांगले असू शकते कारण त्यामुळे आध्यात्मिकरित्या संयुक्‍त होण्यास एखाद्या कुटुंबाला मदत होऊ शकेल.

५ आपण जाऊन शिष्य बनवावे अशी येशूची आज्ञा आहे. (मत्त. २८:१९) ते करण्यासाठी, आपण असे बायबल अभ्यास संचालित करावेत की ज्यांमुळे, “मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” असा प्रश्‍न विचारण्याप्रत प्रगती करण्यास आपण इतरांना मदत करू शकू.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा