सप्टेंबरसाठी सेवा सभा
सप्टेंबर १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २६ (३)
१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१५ मि:“अधिक महत्त्वपूर्ण गोष्टी अग्रस्थानी ठेवा.” प्रश्नोत्तरे. वेळ असल्यास फेब्रुवारी २२, १९८७, सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठे ८-९ वरील “योग्य प्राथमिकता राखणे” यावर विवेचन मांडा.
२० मि:“कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य इतरांना देऊ करणे.” परिच्छेद १ आणि ६-८ यांवर भाषण. परिच्छेद २-५ वर प्रात्यक्षिके दाखवा. शिष्य बनविणे व अभ्यास सुरू करण्याचे ध्येय सतत लक्षात ठेवण्यावर जोर द्या.
गीत १०७ (४) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २७ (२९)
१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि:स्थानिक घोषणा.
२० मि:“शिष्य बनविणारे बायबल अभ्यास.” भाषण व सामूहिक चर्चा. वडील लेखाची उजळणी करतात. मग, अभ्यास संचालित करणाऱ्या अनुभवी प्रचारकांसोबत ते, “विद्यार्थ्यांना समर्पण आणि बाप्तिस्मा यांसाठी चालना द्या” (km-MR ६/९६ पुरवणी, परि. २०-२) याची चर्चा करतात.
गीत १०९ (२) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३० (२२)
१० मि:स्थानिक घोषणा.
१५ मि:संभाषण कसे सुरू करावे. सेवेतील आपले अधिकतर यश, इतरांना अर्थपूर्ण संभाषणांत निमग्न करण्याच्या आपल्या कुवतीवरच अवलंबून असते. आपण, इतरांचे लक्ष वेधून घेण्याजोगे काहीतरी म्हणू शकलो म्हणजे साक्षीकार्यात अनुभवत असलेल्या मोठ्यातल्या मोठ्या अटकावावर आपण मात केली आहे असेच समजा. प्रशाला मार्गदर्शन पुस्तकात (इंग्रजी), अध्याय १६, परिच्छेद ११-१४ मध्ये दिलेल्या प्रमुख सूचनांची श्रोत्यांसोबत चर्चा करा. (१) रस्त्यावरील वाटसरू, (२) बसमधील प्रवासी, (३) काउन्टरवरील क्लार्क, (४) पार्किंगच्या ठिकाणी भेटणारा ग्राहक (५) बागेतील बाकावर बसलेली व्यक्ती आणि (६) टेलिफोनमार्फत संपर्क साधलेली व्यक्ती, अशा लोकांसोबत बोलताना, संभाषण सुरू करण्यात कुशल व प्रभावशाली असलेले प्रचारक सुरवातीला काय म्हणत असतात त्याचे कथन त्यांना करावयास सांगा.
२० मि:तुम्ही शाळा माहितीपत्रकाचा वापर करता का? वडील, काही पालक व मुलांसोबत ऑक्टोबर १, १९८५, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठे ३०-१ ची चर्चा करतात. शाळा माहितीपत्रकाचा त्यांनी कसा वापर केला याचे व्यक्तिगत अनुभव ते कथित करतात.
गीत ११२ (१६) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३२ (३)
५ मि:स्थानिक घोषणा.
२३ मि:“१९९७ ‘देवाच्या वचनावर विश्वास’ प्रांतीय अधिवेशन.” (परिच्छेद १-१६) प्रश्नोत्तरे. परिच्छेद १०, १२, आणि १५ वाचा. आपले सभ्य ख्रिस्ती स्वरूप व आचरण काळजीपूर्वक राखण्याच्या तसेच आपल्या मुलांवर योग्य पाळत ठेवण्याच्या शास्त्रवचनीय महत्त्वावर जोर द्या.
१७ मि:मंडळीच्या १९९७ सेवा वर्ष अहवालाची उजळणी करा. विशेषतः मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान मंडळीने केलेल्या उत्तम परिश्रमाची सेवाकार्य पर्यवेक्षक वाखाणणी करतात. सुधारणा करण्यासाठी सूचना देतात. नवीन सेवा वर्षासाठी काही व्यवहार्य ध्येयांचे तसेच पाच सप्ताहांत असलेल्या महिन्यांत—नोव्हेंबर, मे, ऑगस्टमध्ये सहायक पायनियरींग करण्याविषयी ते सांगतात.
गीत ११३ (१२) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३७ (९)
१३ मि:स्थानिक घोषणा. सर्वांना क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. पुढील सप्ताहात पुस्तक अभ्यासात आपण कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकाचा अभ्यास करण्यास सुरवात करणार आहोत असे सांगा. ऑक्टोबरच्या वर्गणी सादरतेसाठी तयारी करताना, ऑक्टोबर १९९६ ची आमची राज्य सेवा, पृष्ठ ८ वरील “तुमच्या क्षेत्राचा अभ्यास करा,” “नियतकालिकांशी परिचित व्हा,” “प्रास्ताविक शब्दांची तयारी करा,” “घरमालकाशी जुळवून घ्या,” आणि “एकमेकांस साहाय्य करा” या गरजांची चर्चा करा.
२० मि:“१९९७ ‘देवाच्या वचनावर विश्वास’ प्रांतीय अधिवेशन.” (परिच्छेद १७-२२) प्रश्नोत्तरे. परिच्छेद १७ व उद्धृत केलेली शास्त्रवचने वाचा. विशेषकरून बैठकींचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा सुव्यवस्थीतपणाच्या व इतरांसंबंधी विचारशील असण्याच्या गरजेवर भर द्या. “प्रांतीय अधिवेशन स्मरणिका” याची संक्षिप्त उजळणी करून समारोप करा.
१२ मि:तुमची सेवा गौरवित करा. आपली सेवा पुस्तकात, पृष्ठे ८१-३ ची श्रोत्यांसोबत चर्चा. मुख्य मुद्दे ठळकपणे मांडण्यासाठी पुढील प्रश्न विचारा: (१) येशूच्या उदाहरणाचे अनुकरण केल्याने आपल्याला कसा फायदा होतो? (२) प्रचार करण्याची आपली जबाबदारी किती महत्त्वपूर्ण आहे? (३) कोणत्या हेतुंमुळे आपण यहोवाला आपले जीवन समर्पित करण्यास प्रवृत्त झालो? (४) एखाद्याला देवाची सेवा करायची असल्यास त्याच्याकडून कोणत्या आचरणाची मागणी केली जाते? (५) येशूच्या प्रचार करण्याच्या पद्धतीवरून आपण काय शिकू शकतो?
गीत १२१ (२१) व समाप्तीची प्रार्थना.