वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९७ पृ. ३-४
  • राज्य सभागृह बांधकामाची गरज पूर्ण करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • राज्य सभागृह बांधकामाची गरज पूर्ण करणे
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • सतत होणारी वाढ राज्य सभागृहांची गरज वाढवते
    आमची राज्य सेवा—१९९४
  • राज्य सभागृह बांधकाम —पवित्र सेवेचा महत्त्वपूर्ण पैलू
    आमची राज्य सेवा—२००६
  • मे सेवा अहवाल
    आमची राज्य सेवा—१९९७
  • राज्य सभागृह बांधकाम कार्यक्रमात वृद्धी
    आमची राज्य सेवा—२००४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९७
km ८/९७ पृ. ३-४

राज्य सभागृह बांधकामाची गरज पूर्ण करणे

१ आपण जगभराच्या क्षेत्राचे अवलोकन करतो तेव्हा यहोवाची पृथ्वीवरील संघटना अनुभवत असलेली भरघोस वाढ पाहून मन उल्लसित होते. मागील वर्षी, अवघ्या भारतात सुमारे २५ मंडळ्या स्थापन झाल्या, तर जगभर एकूण ३,२८८ मंडळ्यांची भर पडली. ही वाढ लक्षात घेता, आणखीन राज्य सभागृहांची गरज असल्याचे आश्‍चर्य वाटू नये.

२ प्रादेशिक बांधकाम समिती: राज्य सभागृह बांधकामाच्या कार्यक्रमास वेग आणण्यासाठी सध्या संस्थेने दोन प्रादेशिक बांधकाम समिती नियुक्‍त केल्या आहेत; यांपैकी एक तामिळनाडू विभागांतील मंडळ्यांना साह्‍य करण्यासाठी आहे, तर दुसरी केरळ विभागांसाठी आहे. या प्रादेशिक समितींकडे, राज्य सभागृह प्रकल्पांची देखरेख करण्याचे कार्य सोपवून दिले आहे; मग त्या नवीन इमारती असोत किंवा त्यांची डागडुजी असो. जगात सर्वसामान्यपणे प्रदर्शित केल्या जाणाऱ्‍या आत्म्याच्या विषमतेत असलेल्या उदारतेच्या व स्वत्यागाच्या ख्रिस्ती आत्म्यामुळेच राज्य सभागृह बांधकामाच्या संपूर्ण व्यवस्थेची साध्यता होते.—२ तीम. ३:२, ४.

३ बांधकामाच्या प्लॅन्सची पाहणी करण्यासाठी संस्थेने प्रादेशिक समितींना काही मार्गदर्शक सूचना पुरवल्या आहेत. अशाप्रकारे, या समिती, सुबक व कार्यात्मक, शिवाय ज्यात समर्पित साधनसामग्रींचाही सदुपयोग होईल अशा एका राज्य सभागृहाची योजना आखण्याकरता स्थानिक वडिलांची मदत करू शकतात. प्रादेशिक बांधकाम समितींत सेवा करण्यास नियुक्‍त केलेल्या अनुभवी वडिलांच्या अभिप्रायांचा पुरेपूर फायदा घेऊन वडील वर्गांनी सर्व काही काळजीपूर्वक तोलून पाहणे उत्तम ठरेल.—लूक १४:२८-३०.

४ बांधकाम खर्च कमीतकमी ठेवणे: एखाद्या कार्यक्षम वडिलांच्या देखरेखीखाली स्थानिक मंडळीसाठी एका खरेदी विभागाचे संघटन करण्याचे निर्देशन, प्रादेशिक बांधकाम समितींना देण्यात आले आहे. या विभागात कार्य करणारे बांधव, विविध विक्रेत्यांच्या दरांची तुलना करून शिवाय सवंग सौदा करून माफक किंमती ठरवण्यासाठी मेहनतीनिशी बाजारभाव पाहतात. अशाप्रकारे, कोणाकडून माल घ्यावा व कोणत्या मालाची खरेदी केली जावी हे ठरवता येते.

५ आपल्या राज्य सभागृहाचा प्रकल्प पूर्ण करण्याकरता काही मंडळ्यांना अतिरिक्‍त अर्थसाहाय्याची गरज भासते. संस्थेकडे आगाऊ रकमेची विनंती करण्याआधी वडिलांनी पुढील गोष्टी निश्‍चित करण्यासाठी स्थानिकरित्या सर्वेक्षण घ्यावे: (१) विद्यमान गरज व भावी वाढही पूर्ण करू शकेल इतकी विस्तारीत जमीन खरेदी करण्यास तसेच बांधकाम खर्चाला हातभार लावण्यास सुरवातीला किती अनुदान दिले जाईल, (२) सदर मंडळीशी सहवास राखणारे स्थानिकरित्या किती कर्ज देऊ शकतील आणि (३) मंडळीचा खर्च भागवण्याकरता व संस्थेकडून घेतलेली आगाऊ रक्कम फेडायला दरमहा किती अनुदान दिले जाईल. हे सर्वेक्षण घेतल्यानंतर पाठवलेल्या स्लिप्सवर कोणतीही नावे लिहू नये.

६ राज्य सभागृहाची डिझाईन साधीसुधी ठेवा: राज्य सभागृह प्रमाणबद्ध करण्यासाठी संस्थेजवळ, १००, १५० आणि २५० लोकांच्या बैठकीसाठी तीन प्रमाणभूत राज्य सभागृह डिझाईन्स आहेत. मित्रांवर अथवा संस्थेच्या राज्य सभागृह निधीवर अनावश्‍यक दडपण न आणता व भावी वाढ लक्षात ठेवून आपली गरज भागवण्यासाठी वडिलजन या मूलभूत डिझाईन्समधून आपली निवड करू शकतात.

७ एखादी डिझाईन निवडण्याआधी, मंडळीतील वडिलांनी प्रादेशिक समितीशी संपर्क साधावा व संस्थेने पुरवलेल्या डिझाईन्सचा मार्गदर्शक म्हणून उपयोग करून संपूर्ण इमारतीच्या रचनेची चर्चा करावी. जेथे प्रादेशिक बांधकाम समिती अद्याप नियुक्‍त केलेली नाही तेथील वडिलांनी आपल्या राज्य सभागृह प्रकल्पासंबंधी कोणतीही पावले उचलण्याआधी संस्थेशी संपर्क साधावा.

८ स्वयंसेवक एका उत्तम कामास पाठबळ देतात: राज्य सभागृह बांधकामास हातभार लावणाऱ्‍या अनेक स्वयंसेवकांविषयी संस्था कृतज्ञ आहे. तथापि, प्रादेशिक बांधकाम समितीच्या सांगण्यानुसार आणखीन पुष्कळ स्वयंसेवकांची गरज आहे. राज्य आस्थांच्या मदतीसाठी ही एक आवश्‍यक सेवा आहे.—१ करिंथ. १५:५८.

९ एक व्यक्‍ती स्वयंसेवक म्हणून स्वतःस कशी सादर करते? वडिलांनी मागणी केल्यास संस्था, राज्य सभागृह बांधकाम कर्मचारी प्रश्‍नावली फॉर्म्स पुरवते. मग हे फॉर्म्स कार्यक्षम कर्मचाऱ्‍यांना दिले जातात. उचित कौशल्ये असणाऱ्‍या व मंडळीत चांगला नावलौकिक असणाऱ्‍या बाप्तिस्माप्राप्त प्रचारकांना स्वयंसेवक म्हणून स्वतःस सादर करण्याचे उत्तेजन दिले जाते. बांधकामाची तसेच बांधकामाशी संबंधित नसलेली कौशल्ये, अशा दोन्ही कौशल्यांची गरज आहे. स्वयंसेवक, आवश्‍यक ते फॉर्म्स त्यांच्या मंडळीतील अध्यक्षीय पर्यवेक्षकांकडून किंवा सचिवांकडून प्राप्त करू शकतात; त्यांनी कारागिरीचा अथवा भोजन सेवा, सुरक्षा, माल हाताळणे, जमाखर्च हाताळणे व कायदेविषयक कागदपत्रे हाताळणे अशा क्षेत्रांतील आपला अनुभव त्यात सूचित करावा.

१० त्याचप्रमाणे, एखाद्या राज्य सभागृहाचे बांधकाम जवळपासच कुठे चालू असल्यास बांधकामात कुशल नसणारे तुमच्या मंडळीतील प्रचारक देखील बाकीच्या कामगारांसोबत काम करण्याच्या संधीचा फायदा घेऊ शकतात. या कर्मचाऱ्‍यांनी स्वयंसेवक प्रश्‍नावली भरू नये. केवळ या प्रसंगासाठी असणाऱ्‍या गरजेसंबंधी कळवले जाते व बांधकाम प्रकल्पात समाविष्ट असणाऱ्‍या मंडळीतील वडिलांमार्फत व शेजारच्या मंडळीतील वडिलांमार्फत व्यवस्था केल्या जातात.

[४ पानांवरील चौकट]

राज्य सभागृह प्राप्त करण्याची पावले:

(१) या प्रकल्पासाठी व मंडळीचे विश्‍वस्त मंडळ नियुक्‍त करण्यासाठी मंडळीमार्फत ठराव पास केला जातो

(२) वडील वर्ग, बहुधा व्यापारी/बांधकाम अनुभव असलेल्या दोन किंवा तीन वडिलांची एक स्थानिक बांधकाम समिती नियुक्‍त करतो

(३) राज्य सभागृह डिझाईनची निवड करण्यासाठी स्थानिक बांधकाम समिती, प्रादेशिक बांधकाम समितीशी किंवा संस्थेशी संपर्क साधते

(४) निवडलेली डिझाईन संमतीसाठी संस्थेला पाठवली जाते व स्थानिक अधिकाऱ्‍यांच्या मंजुरीसाठी ती पाठवली जाते

(५) प्रकल्पासाठी उपलब्ध असलेला निधी वडील निश्‍चित करतात. (अर्थसाहाय्याची गरज असल्यास संस्थेला लिहा)

(६) स्थानिक बांधकाम समिती, बहुतेक प्रचारकांसाठी केंद्रस्थानी असेल अशी जमीन शोधते, ती प्राप्त करते व विश्‍वस्त मंडळाच्या नावावर तिची नोंदणी करते

(७) राज्य सभागृह प्रकल्प पूर्ण करण्याकरता प्रादेशिक बांधकाम समिती व स्थानिक बांधकाम समिती एकजुटीने कार्य करतात

[५ पानांवरील चौकट]

जमीन पारखण्याची तपासणी-सूची

प्लॉट

विस्तार (विद्यमान गरज व भावी वाढ यांसाठी बराच मोठा?)

आकार (संपूर्ण जमीन वापरणे कठीण?)

माती (तुमची इमारत भक्कम धरू शकेल का?)

पाणी (जलमय होण्याचा धोका? सेप्टिक टँकमधून निचरा होईल का?)

शेजारीपाजरी (तुमच्या इमारतीची त्यांना काही हरकत असेल का?)

सार्वजनिक उपयुक्‍तता व सेवा

उपलब्धता (सांडपाणी, पाणी, गॅस, वीज, फोन)

केरकचऱ्‍याची व्यवस्था

पोलिस व अग्नी संरक्षण

नियमित टपाल सेवा

जवळपास शाळा आहेत का? त्या चांगल्या आहेत का?

शेजारचा परिसर

जीवनाचा दर्जा (उच्चभ्रू, निम्न, स्थिर?)

पर्यावरण स्थिती (हमरस्ता, कारखाने?)

स्थान

तेथे सार्वजनिक परिवहनाची सोय आहे का?

मर्यादा

तुम्हाला तुमच्या जमिनीचा पूर्ण मालकी हक्क मिळेल का? (एखाद्या वकिलाची मदत घ्या)

करारपत्रासंबंधी निर्बंध आहेत का?

झोनिंगसंबंधी निर्बंध आहेत का? (जागा सोडणे, परिमाण)

तुम्ही सुविधाधिकार व मार्गाधिकार बाळगावेत का?

अर्थसाहाय्य

तुम्हाला ती जमीन परवडेल का?

तुम्हाला कर्जाची गरज भासेल का

काही अज्ञात खर्च आहेत का?

(विशेष आकारणी, बाकी कर?)

तुम्हाला किती कर भरावा लागेल?

[[४ पानांवरील चित्रशीर्षक]

बांधकाम कायदेकानून लागू होत असलेली विशिष्ट क्षेत्रे

झोनिंगचे कायदे

झोनिंगचे मुलूख निर्णीत करणे

इमारतींचा वापर कसा केला जाऊ शकतो

इमारतीसाठी किती टक्के जमीन उपयुक्‍त असेल (घनता)

इमारतीचे कमाल परिमाण

कमाल उंची

रस्त्यापासून व शेजाऱ्‍यांपासून सोडलेली जागा

पार्किंगचे कायदे

किमान प्लॉट-आकारमानाच्या अपेक्षा

“शेजार प्रदेश स्वरूप” राखण्यास अथवा बदलण्यास वापरले जाऊ शकतात

इमारतीचे कायदेकानून

अग्नी संरक्षण

सुरक्षित निर्गमन (निर्गमन मार्ग)

इमारतीच्या संभाव्य धोकेदायक उपयुक्‍ततांसंबंधी काही व्यवस्था

जनसमूहासाठी संरचना करणे (सार्वजनिक इमारती)

रचनात्मक सुरक्षा

पुरेसा प्रकाश व खेळती हवा

सांडपाणी

अग्निशामक साधने

बांधकामादरम्यान सुरक्षा

इमारतीत राहणाऱ्‍यांचे जीवन वाचवणे व त्यांचे हित साधणे हा प्रमुख उद्देश आहे

[[४ पानांवरील चित्रशीर्षक]

निकृष्ट

[[४ पानांवरील चित्रशीर्षक]

त्कृष्ट

[[४ पानांवरील चित्रशीर्षक]

बऱ्‍यापैकी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा