सतत होणारी वाढ राज्य सभागृहांची गरज वाढवते
१ बऱ्याच काळाआधी देवाच्या संदेष्ट्याने, “सर्व राष्ट्रातील निवडक वस्तु” आल्या पाहिजेत असे भाकीत केले होते. (हाग्ग. २:७) निश्चितच, ईश्वरी शिक्षण लोकांच्या प्रचंड समूहाला सत्य शिकण्यास आणि यहोवाचे उपासक होण्यास मदत करीत आहे याचा पुरावा आपण पाहत आहोत. केवळ भारतातच १९९४ च्या सेवा वर्षात, १,३१२ लोकांनी बाप्तिस्मा घेतला याकडे लक्ष देणे किती हर्षदायक आहे! या सर्व नवीन जणांना साहाय्य करत राहण्यासाठी व देवाच्या कार्याला शक्य होईल तितका संपूर्ण पाठिंबा देत आहोत याची खात्री असण्यासाठी आपण ‘आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवले पाहिजे.’ (पडताळा हाग्गय १:५) होय, यहोवाची स्तुती करणाऱ्या नवोदितांच्या जमावांना उपयुक्त उपासना गृहे पुरवून मदत करीत राहणे हा देवाच्या कार्याला आपला पाठिंबा देण्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
२ १९९४ च्या दरम्यान, काही नवीन राज्य सभागृहांचे समर्पण करण्यात आले आणि आणखी पुष्कळ बांधले जात आहेत. यहोवाचे कार्य खरोखरच “पर्वताच्या माथ्यावर” उंचावण्यात आले आहे. (यश. २:२) संस्थेने ५२ मंडळ्यांना नवीन राज्य सभागृहांची सुविधा मिळवून दिली आहे. मंडळ्यांना दिलेली आर्थिक मदत संस्थेला परत केली जात आहे जेणेकरून अधिक मंडळ्यांना नवीन राज्य सभागृहे बांधण्यास मदत केली जाते. यास्तव, राज्य सभागृहासाठी आर्थिक साहाय्य पुरवून ज्या मंडळ्यांचे साहाय्य केले जाते त्या, प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला विश्वासूपणाने ते तत्काळ पाठवून आपली कृतज्ञता दाखवत आहेत. समर्पण झालेल्या काही राज्य सभागृहांसाठी स्वतः मंडळ्यांनी सर्व खर्च केला ही वास्तविकता आणखी एक उत्तेजक विकास आहे. लक्षणीय गोष्ट अशी की, यातील काही मंडळ्या भौतिकरित्या संपन्न नाहीत परंतु त्यांच्या समाजात खऱ्या उपासनेला उंचावलेले पाहण्यासाठी ते निश्चित होते.
३ पाहणारे प्रभावीत झाले: राज्य सभागृह बांधणी प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या बांधवांवर यहोवाचा पवित्र आत्मा कार्य करतो ही स्पष्ट गोष्ट इतरांना एक साक्ष बनली आहे. वॉसलुरस, जोहान्सबर्ग येथे त्वरित बांधण्यात आलेल्या राज्य सभागृहाच्या परिणामांनी एक जगिक व्यक्ती इतकी उत्तेजित झाली की, देशात भांडण होत असतानाही यहोवाच्या साक्षीदारांनी साध्य केलेल्या गोष्टींबद्दल प्रशंसा व्यक्त करण्यासाठी तिने स्थानिक रेडिओ केंद्राला त्याबद्दल सांगितले. दुसऱ्या प्रसंगी, उत्तरेकडील ट्रान्सवल येथील वडील वर्गाने लिहिले: “या सभागृहाच्या बांधणीचा थेट प्रभाव पाहणाऱ्यांवर पडतो. प्रवाश्यांनी पाहिलेल्या गोष्टी वास्तविक आहेत याची खात्री करून घेण्यासाठी बसेस, टॅक्सी तसेच कार्स थांबत होत्या. एका व्यापाऱ्याने म्हटले: ‘गृहस्थांनो, मी बायबलमध्ये वाचलेली प्रीती आणि एकता तुम्ही आता प्रदर्शित करत आहात. खरोखर तुम्हीच खरा ख्रिस्ती विश्वास प्रदर्शित करणारा तो एकमेव गट आहात.’ . . गावाच्या प्रमुखाने म्हटले: ‘हे कार्य ज्याद्वारे साध्य झाले त्या आत्म्याची मी प्रशंसा करतो.... खरोखरच, राजनैतिक लोकांनी तुमच्याप्रमाणे कार्य केले असते, तर आज पाहत असलेली हत्या घडली नसती. यास्तव, मी ठामपणे सांगतो की, तुमच्या धर्माला कार्य करण्यासाठी आणि तुम्हाला जमत असलेल्या वेळेप्रमाणे सभा भरवण्यासाठी अनुमती दिली जात आहे. त्यावर कोणताच निर्बंध नाही.’”
४ “‘अविश्वसनीय!’ असे एका पाहणाऱ्याने म्लुझी येथील विलक्षणीय बांधणी प्रकल्पात विविध जातीय गटांतून आलेल्या ३०० पेक्षा अधिक स्वंयसेवक कामकऱ्यांबद्दल म्हटले,” असा अहवाल स्थानिक वृत्तपत्राने दिला. दुसऱ्या भागातील मंडळीच्या सेवा समितीने खालीलप्रमाणे लिहिले: “दोन दिवसात राज्य सभागृह बांधल्याचे पाहून स्थानिक लोक इतके आश्चर्यचकित झाले की आम्ही खरोखरच्या विटांनीच बांधकाम करत होतो की नाही हे स्पर्श करून पाहण्यासाठी ते तिकडे आले. पाहत असलेल्या गोष्टींमुळे काही लोक बायबल अभ्यास करण्याची मागणी करण्यासाठी आले.”
५ अधिक स्वयंसेवकांची गरज: बांधणी समित्या नवीन किंवा दुरुस्त केल्या जाणाऱ्या राज्य सभागृहांसाठी गरज असणारे मंडळीतील उपलब्ध कौशल्य वापरण्याचा प्रयत्न करतात. समिती इतर स्थानिक वडील किंवा सेवा सेवकांना जवळ असलेली कामे करण्यात प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्यासोबत कार्य करते. राज्य सभागृह बांधण्यामध्ये उपयुक्त असणारी कला शिकल्याने, हे आध्यात्मिकरित्या प्रौढ बांधव त्या भागात योजलेल्या इतर राज्य सभागृह प्रकल्पांमध्ये साहाय्य देऊ शकतात. यास्तव, राज्य सभागृह बांधणी प्रकल्पात गोवलेल्या मंडळ्यांच्या सहवासात असणाऱ्यांनी इच्छुक आणि सहयोगाचा आत्मा प्रदर्शित केला पाहिजे. बांधणी समिती आणि त्यासोबत काम करणारे त्यांच्या राज्य सभागृहाच्या सर्व कार्याची काळजी घेतील अशी अपेक्षा त्यांनी करू नये. (नहे. ४:६ब) प्रशिक्षण प्राप्त झाल्यावर, नवीन किंवा सुधारित सुविधांची अत्यंत गरज असणाऱ्या इतर मंडळ्यांकरता राज्य सभागृह बांधण्यात मदत करण्यासाठी बांधवांनी प्रेमाने प्रवृत्त झाले पाहिजे. (नहे. ५:१९; फिलिप्पै. २:३, ४) उचित कला असलेले बाप्तिस्मा घेतलेले प्रचारक आणि मंडळीत चांगले नावलौकिक असणाऱ्यांना या विस्तारित कार्याच्या नेमणूकीत मदत करण्यासाठी स्वेच्छेने कार्य करण्यास उत्तेजित केले जाते.
६ स्वेच्छेने दिलेल्या साहाय्याची गुणग्राहकता बाळगली जाते: राज्य सभागृहाच्या बांधणी प्रकल्पात गोवण्याआधी, तो प्रकल्प पूर्ण करणे हे स्वीकारलेले किती मोठे कार्य आहे याची फारच कमी लोकांना जाणीव असते. एका राज्य सभागृहाचा बांधणी प्रकल्प पूर्ण केल्यावर, वडिलांनी लिहिले: “बांधणी समितीच्या बांधवांकडून मिळालेले सहनशीलतेचे मार्गदर्शन आम्हासाठी एका प्रचंड आशीर्वादाप्रमाणे होते. . . संपूर्ण प्रकल्पाच्या दरम्यान, मोजता न येण्याजोगे असे अनेक प्रसंग होते, जेव्हा बांधवांनी दूरदूरच्या ठिकाणाहून प्रवास केला, तासंतास घालवले, त्यांच्या साधन-साम्रगीचा उपयोग करावयास दिला, त्याचप्रमाणे साहित्य देखील पुरवले, या सर्व गोष्टी त्यांनी केवळ आम्हाला आमच्या नवीन राज्य सभागृहाच्या बांधकामात मदत करण्यासाठी केल्या. या बांधवांना ‘बंधुवर्गावर प्रीती’ असल्याचे त्यांच्या उदारतेवरून भव्यतेने प्रदर्शित होते. तसेच आम्हासाठी ते किती उत्तेजनाचे होते!”—१ पेत्र २:१७.
७ बांधवांचा इच्छुक आत्मा आणि आवेश स्पष्ट आहे, त्याबद्दल एका मंडळीने लिहिले: “इच्छुक बंधु व बहिणींबद्दल फार आभारी आहे. त्यांनी अतिशय कष्टाने काम करून पाहणाऱ्या सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले.” स्तोत्र १३३:१, ३ चे शब्द खरोखरच सत्य आहेत: “पाहा! बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!” शेजारच्या मंडळीला त्यांच्या राज्य सभागृहाच्या प्रकल्पात मदत करण्यासाठी काही राज्य सभागृहाचे बांधकाम कामकरी नोकरीवरून सुटी घेतात. त्याबदली, यजमान मंडळी प्रकल्पाला संपूर्ण पाठिंबा देऊन प्रामाणिक गुणग्राहकता व्यक्त करतात. एका समितीसोबत कार्य केलेल्या वडिलांनी त्यांच्या बांधवांची सेवा करणे हा किती मोठा विशेषाधिकार होता हे व्यक्त करण्यासाठी लिहिले. त्यांनी असे म्हटले की, “मंडळ्यांचे यहोवाला केलेले समर्पण साध्य करण्यासाठी बांधवांना शेकडो किलोमीटर अंतरावरून मदतीसाठी येत असलेले पाहून मंडळ्या खूप उत्तेजित आहेत. . . खरेच, आपण सगळे मिळून एक प्रेमळ बंधुवर्ग बनवतो!” एका बहिणीने अशाप्रकारे तिच्या भावना व्यक्त केल्या: “राज्य सभागृहाच्या बांधकामाच्या ठिकाणी मला जो आनंद प्राप्त झाला त्याबद्दल आभार न मानता मला राहावलेच नाही. मी आता या तिसऱ्या सभागृहाच्या बांधकामात भाग घेत आहे.”
८ एका मंडळीने त्यांचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रादेशिक बांधणी समितीला (मोठ्या शाखांमध्ये, राज्य सभागृह बांधकामाच्या वाढत्या संख्येला मदत देण्यासाठी प्रादेशिक बांधणी समित्या स्थापल्या जातात. तथापि, अशा समित्या अद्याप भारतात स्थापलेल्या नाहीत) एका पत्रात खालीलप्रमाणे लिहिले: “आम्ही आपले फार आभार मानण्यासाठी हे पत्र लिहीत आहोत! येथे येऊन आमच्यासाठी सभागृह बांधण्याकरता तुम्ही तुमच्या मंडळीच्या सभा, तुमची झोप, तुमच्या कुटुंबासोबत राहण्याचा आनंद, तुमचे मनोरंजन, तुमची क्षेत्र सेवा आणि पुष्कळ गोष्टी चुकवल्या आहेत. तुम्ही आमच्यासाठी जे केले त्याला आम्ही मुळीच पात्र नाही. आम्हाला तुमच्यासारख्या उत्तम व समर्पित बांधवांच्या सहवासात असल्याचा अभिमान आहे आणि आम्हाला सन्मानित झाल्यासारखे वाटते. आम्हाला तुमच्या कुटुंबांचे देखील आभार मानण्यास आवडेल कारण त्यांनीही झोंबणारा वारा, उष्णता आणि थंडीत हसमुख चेहऱ्याने तुमच्यासोबत उदारतेने काम केले. पुन्हा एकदा, आभारी आहोत. ‘परमेश्वर [यहोवा, NW] तुमच्या हितार्थ तुमचे स्मरण ठेवो’”—नहे. १३:३१.
९ राज्य सभागृहाची सुरक्षा: राज्य सभागृहांमध्ये चोऱ्या होण्यात हळूहळू वाढ होत आहे. पुष्कळ प्रसंगी ध्वनी सामग्री चोरली गेली. खालील सूचनांनी काही प्रमाणात या समस्येवर आळा घालण्यास मदत केली पाहिजे: (१) सर्व ध्वनी सामग्री एका भक्कम (बाजारात उपलब्ध असलेल्या) स्टीलच्या पेटीत बसवा आणि त्यातील गोष्टींना सुरक्षित ठेवण्याकरता चांगले कुलुप लावले आहे याची खात्री करा; (२) सहजगत्या दृष्टीत न येण्यासारख्या जागेत पेटी ठेवा आणि त्यास जमिनीला किंवा भिंतीला खीळ घालून ठेवा; (३) सर्व सामग्रीवर मंडळीचे नाव टाका, अशाप्रकारे, ओळखण्यास आणि चोरलेल्या वस्तू परत करण्यास पोलिसांना मदत मिळेल.
१० काही मंडळ्यांनी सुरक्षिततेसाठी राज्य सभागृहासोबत एक फ्लॅट बांधला आहे. त्याबाबतीत, मंडळीने एक दूरध्वनी घ्यावा व त्यांच्या नावाने त्याची नोंद करावी अशी शिफारस आम्ही करतो. अशाप्रकारे, निकडीच्या प्रसंगी काळजीवाहू व्यक्ती मदत मागू शकते. आपल्या व्यक्तिगत कॉलसाठी पैसे भरण्याची जबाबदारी काळजीवाहूची आहे. त्याशिवाय, वडील वर्गाने भाडे, राहणाऱ्या व्यक्तींची मर्यादा, जबाबदाऱ्या आणि घर सोडून देताना द्यावी लागणारी सूचना या गोष्टींचा काळजीवाहू व्यक्तीसोबत एक साधा लेखी करार करण्याची गरज आहे.
११ आर्थिक देणग्या मदत करीत राहतात: संस्थेला उदारपणे देणग्या दिल्यामुळे गतकाळात मंडळ्यांना मदत मिळाली आणि त्याचप्रमाणे भविष्यातही मिळत राहील. निःस्वार्थीपणे देण्यामध्ये यहोवानेच स्वतः पुढाकार घेतलेला नाही का? (याको. १:१७) आपल्या देण्याच्या क्षमता आणि संधी विविध असल्या, तरी आपल्या व्यक्तिगत खर्चात काही तडजोडी केल्याने बांधकामाच्या कार्याला संपूर्ण पाठिंबा देण्यामध्ये आपण कदाचित भाग घेऊ शकतो. अशा औदार्यामुळे यहोवाचे अंतःकरण निश्चितच आनंदी होते तसेच आपल्या बांधवांना देखील खूप उत्तेजन मिळते.
१२ आज वाढत्या प्रमाणात, “मोठा लोकसमुदाय” राज्याच्या संदेशाला प्रतिसाद देत आहे. यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात “निवडक वस्तु” झुंडीने येत आहेत आणि तो ‘त्याचे मंदिर वैभवाने भरून टाकत’ आहेत. (प्रकटी. ७:९; हाग्ग. २:७) हाग्गयच्या दिवसातील विश्वासू यहुद्यांप्रमाणे, आपण देवाच्या कार्यावर आपली अंतःकरणे लावून ठेवू या आणि अधिक राज्य सभागृहांच्या निकडीच्या गरजेला पूर्ण पाठिंबा देऊ या. अलिकडील वर्षात पुष्कळ उत्तम राज्य सभागृहे बांधण्यात आली असली, तरी वाढ वेगात होत आहे आणि असे असतानाही पुष्कळ मंडळ्या अजूनही प्रतिकूल परिस्थितींमध्ये भेटत आहेत. शक्य होईल तितक्या प्रमाणात देवाच्या कार्याला सतत पाठिंबा देत राहणे हे त्याने आपल्याला सोपवून दिलेल्या कार्यात भाग घेण्याचे उत्तम माध्यम आहे.
[चौकट]
राज्य सभागृह कसे प्राप्त करावे
या सुरवातीच्या कार्यपद्धतींना क्रमाने अनुसरा:
तुमच्या विभागीय पर्यवेक्षकांना भेटा
प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण बाबींची चर्चा करा
एक विश्वस्त व्यवस्था तयार करा
ठरावाद्वारे विश्वस्त संस्थेला नियुक्त करून विश्वस्त व्यवस्था तयार करा. संविधानाच्या नमुन्यासाठी संस्थेला लिहा. संस्थेकडून फॉर्म्सची विनंती करा. कायदेशीर अधिकाऱ्यांसोबत विश्वस्त व्यवस्थेची नोंदणी करा. विश्वस्त व्यवस्थेच्या नावाने बांधकामाच्या निधीसाठी बचत खाते उघडा
बांधणी समिती नियुक्त करा
बांधणी समितीमध्ये विशेषतः व्यापार/बांधकामाचा अनुभव असणाऱ्या तीन किंवा अधिक वडिलांचा समावेश असतो.
संभाव्य जागा शोधा, अधिक प्रचारकांना सोयीची असेल अशी
विशेषतः सपाटीची जागा; धार्मिक विभाग; चिकण मातीची खडकाळ जमीन आणि अधिक आवाज असणारे ठिकाण टाळा.
तुमच्या विश्वस्त व्यवस्थेच्या नावाने ती जमीन मिळवा आणि तिची नोंद करवून घ्या
उदाहरणार्थ: यहोवाच्या साक्षीदारांच्या नवीन जगाच्या मंडळीची विश्वस्त व्यवस्था. संस्थेच्या नावाने नोंद करू नका.
जागेच्या दस्तऐवजाची (किंवा हक्कविलेखाची) प्रत संस्थेला पाठवा.
उपलब्ध असलेल्या निधीची रक्कम ठरवा
तुम्हाला केवळ बांधकामासाठीच आर्थिक मदत हवी असल्यास संस्थेला लिहा.
जागेत कोणत्याही कार्यास आरंभ करण्याआधी त्याचा विमा उतरवा
विम्याबद्दल संस्थेला लिहा.
संस्थेकडे चौकशी करा
तुम्हाला हाताळता येत नसलेल्या समस्या उद्भवल्या तर, संस्थेकडे चौकशी करा.