शाळेचा सर्वाधिक लाभ घ्या
१ वर्षाच्या या वेळी अनेक युवक शाळेमध्ये एका नवीन वर्गात गेलेले आहेत. शाळेचे एक नवीन वर्ष सुरू होण्यासंबंधी काही अडचणी व चिंता उद्भवल्या असल्या तरी आपल्या शिक्षणातून सर्वाधिक लाभ घेण्यासाठी पराकाष्ठा करणाऱ्या युवकांसाठी अनेक फायदे देखील आहेत.
२ उत्तम स्वरूपाचे मूलभूत शिक्षण एखाद्याच्या आध्यात्मिक प्रगतीत भर घालते. युवावस्थेत असताना एक युवक जे काही करतो त्याचा परिणाम प्रौढावस्थेत तो जे काही साध्य करील त्याच्यावर पडत असतो. शालेय शिक्षणासंबंधी देखील, “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलती. ६:७) शाळेचा अभ्यास मेहनतीने करणारे युवक अशी कौशल्ये प्राप्त करू शकतील ज्यांमुळे पुढे यहोवा या लोकांचा अधिक उपयोग करू शकेल.
३ एखाद्याला शालेय अभ्यासक्रमांची डोळसपणे निवड करायची असल्यास काळजीपूर्वक दूरदृष्टीची आवश्यकता आहे. जीवनात आध्यात्मिक ध्येये गाठण्याकरता व्यावहारिक प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम निवडण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मदत केली पाहिजे. आपली कौशल्ये विकसित केल्याने युवकांना आपल्या पायनियर सेवेत स्वयंपूर्ण होणे शक्य होईल. ते जेथे कोठे सेवा करतात तेथे त्यांच्या मूलभूत शालेय शिक्षणामुळे त्यांना यहोवाची स्तुती करण्यास मदत झाली पाहिजे.
४ युवकांनो, तुमच्या शालेय जीवनातून सर्वाधिक लाभ घेण्याचा प्रयास करा. असे करत असताना, जगिक ध्येयांच्या मागे लागण्याऐवजी पवित्र सेवेतील अर्थपूर्ण व तृप्त जीवन जगण्यावर लक्ष केंद्रित करा. यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात आपले संपूर्ण आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करा. परिणामी, यहोवाची स्तुती करण्यासाठी तुम्ही आपल्या मार्गक्रमणात यशस्वी व्हाल.—स्तोत्र १:३.