वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९७ पृ. ५
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • उपशिर्षक
  • पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:
  • पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:
  • पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:
  • पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:
  • पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:
आमची राज्य सेवा—१९९७
km ८/९७ पृ. ५

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत मे ५ ते ऑगस्ट १८, १९९७ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्‍नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.

[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्‍नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्‍तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]

पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:

१. मार्क १:४१ मध्ये वर्णिलेली येशूची करुणा, यहोवाला लोकांबद्दल असणाऱ्‍या चिंतेचे एक हृदयस्पर्शी चित्र रेखाटते. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR ३/१/९६ पृ. ५.]

२. शेवटल्या काळाची लक्षणे केवळ मत्तय २४, मार्क १३ आणि लूक २१ यांतच आढळतात. [kl-MR पृ. १०२ पेटी]

३. लूक ७:१९ मध्ये बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने विचारलेला प्रश्‍न, त्याच्याठायी विश्‍वासाची उणीव असल्याचे प्रकट करतो. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR ७/१/८९ पृ. १२.]

४. आपल्या शिष्यांसोबतच्या येशूच्या शेवटल्या वल्हांडण सणाच्या वेळी, केवळ पेत्रानेच असे म्हटले: “मी आपणाला नाकारणार नाही.” [साप्ताहिक बायबल वाचन]

५. प्रेषित पेत्र विवाहबद्ध पुरुष असल्याचे सूचित करणारा कोणताही बायबल पुरवा नाही. [साप्ताहिक बायबल वाचन]

६. शास्त्रवचनांत कोठेही, पवित्र आत्म्याला एक वैयक्‍तिक नाव देण्यात आलेले नाही. [rs पृ. ४०७ परि. १]

७. येशूने ज्या राज्याचा प्रचार केला ते देवाच्या विश्‍वसार्वभौमत्वापुढे दुय्यम स्वरूपाचे आहे. [kl-MR पृ. ९१ परि. ४]

८. योहान २०:१७ यात नमूद केल्याप्रमाणे, जरी येशूने यहोवाचा उल्लेख “माझा देव” असा केला तरी, शास्त्रवचनांत कोठेही यहोवा, येशूचा उल्लेख “माझा देव” असा करत नाही; शिवाय, यहोवाने अथवा येशूने पवित्र आत्म्याचा कदापिही “माझा देव” असा उल्लेख केला नाही. [rs पृ. ४११ परि. ४]

९. इतर तीन संयुक्‍त शुभवर्तमानांच्या तुलनेत लूकच्या पुस्तकातला शब्दसंग्रह, विलक्षण वैविध्यपूर्ण का आहे यासाठी कोणतेही तर्कशुद्ध स्पष्टीकरण नाही. [si पृ. १८७ परि. २]

१०. देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे असे येशूने परूश्‍यांना म्हटले तेव्हा तो स्वतःला भावी राजा असे संबोधित होता. (लूक १७:२१) [kl-MR पृ. ९१ परि. ६]

पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:

११. जेव्हा बायबलच्या एखाद्या उताऱ्‍याचा व्याकरणदृष्ट्या एकाहून अधिक तऱ्‍हेने अनुवाद करता येतो तेव्हा अनुवादकाने कोणते मार्गदर्शक तत्त्व अनुसरावे? [rs पृ. ४१६ परि. १]

१२. कोणती गोष्ट, सल्ला स्वीकारण्यास काही लोकांना अडसर घालते? [uw-MR पृ. १२७ परि. ४]

१३. त्रैक्यावरील विश्‍वासास बिलगून राहाणाऱ्‍या लोकांना हा विश्‍वास कोणत्या स्थितीत लोटून देतो? [rs पृ. ४२४ परि. ३]

१४. “तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा,” असे म्हणण्याचा येशूचा अर्थ काय होता? (मार्क ९:५०) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR ६/१/८६ पृ. १२ परि. १२.]

१५. गरीब विधवेने दिलेल्या दानाप्रती येशूने दाखवलेल्या प्रतिक्रियेतून आपण कोणता बहुमोल धडा घेऊ शकतो? (मार्क १२:४२-४४) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR १०/१/८८ पृ. २७ परि. ६-७.]

१६. मार्कच्या लिखाणशैलीत पेत्राची गुणवैशिष्टे कशाप्रकारे दिसून येतात आणि असे असण्याचे कारण काय असावे? [si पृ. १८२ परि. ५-६]

१७. मत्तय ६:९, १० आणि लूक ११:२-४ यांची तुलना केल्यावर आपण या निष्कर्षास का पोहंचू शकतो, की नमुनेदार प्रार्थनेतील शब्दानुशब्दाचा पुनरुच्चार करायचा नव्हता? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR ९/१/९१ पृ. १७ परि. ६.]

१८. लूक ३:१, २ यांसारखी शास्त्रवचने आपण वाचतो तेव्हा बायबलचा खात्रीलायकपणा यावरील आपला विश्‍वास कशामुळे बळकट होतो? [si पृ. १८८ परि. ७]

१९. स्तोत्रसंहिता आणि इब्री लोकांस पत्र यांतील कोणती शास्त्रवचने दाखवून देतात, की येशूचा राज्याधिकार, त्याचे स्वर्गारोहण झाल्यानंतर लगेच सुरू होणार नव्हता. [kl-MR पृ. ९६ परि. १५)

२०. येशूठायी देवावरील विश्‍वासाची उणीव नव्हती हे आपल्याला माहीतच आहे, मग “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला?” अशी येशूने आरोळी का मारली? (मार्क १५:३४) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८७ ६/१५ पृ. ३१.]

पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:

२१. स्मारकदिनाच्या वेळी वापरली जाणारी भाकर _________________________ आणि द्राक्षारस _________________________ प्रतिनिधीत्व करणारी केवळ _________________________ आहेत. [uw-MR पृ. ११५ परि. १३]

२२. प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टींचा विचार करता, _________________________ पार्थिव आशा स्पष्टपणे लक्षात आली तेव्हा, _________________________ साली, स्वर्गीय पाचारण सर्वसाधारणपणे संपुष्टात आले असल्याचे उघड आहे असे वाटते. [uw-MR पृ. १११ परि. ६]

२३. बाप्तिस्मा करणारा योहान प्रचार करू लागला तेव्हा _________________________ यहुदीयाचा अधिकारी होता आणि _________________________ गालीलाचा मांडलिक होता. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा लूक ३:१.]

२४. देवाचे पुत्र असलेल्यांच्या मनाला आणि हृदयाला प्रेरणा देणाऱ्‍या शक्‍तीस _________________________ साक्ष देते. [uw-MR पृ. ११३ परि. ९]

२५. लूक १०:१६ मध्ये सूचित केल्यानुसार, _________________________ आणि त्याच्या नियमन मंडळामार्फत येणाऱ्‍या आध्यात्मिक तरतुदींचा आपण कृतज्ञपूर्वक स्वीकार करतो तेव्हा आपण _________________________ आदर करत असतो. [uw-MR पृ. १२३ परि. १३]

पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:

२६. मत्तय २७:५२ मध्ये उल्लेखिलेले पवित्र जन (शारीरिकरित्या तात्पुरते पुनरुत्थित केलेले, खरे तर, भूकंपामुळे बाहेर फेकले गेलेले निर्जीव देह; येशूच्या आधी स्वर्गीय जीवनाकरता उठविलेले) होते. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९० ९/१ पृ. ७.]

२७. कलस्सैकर १:१५ येथे येशूला “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ” असे संबोधले आहे ज्याचा अर्थ, तो (देवासारखा असून त्याला सुरवात नाही; पृथ्वीवरील देवाच्या पुत्रांमध्ये ज्येष्ठ आहे; देवाच्या पुत्र कुटुंबांत तो थोरला आहे). [rs पृ. ४०८ परि. १]

२८. (सा.यु. ३३; १९१८; १९१९) यावर्षी पवित्र आत्म्याद्वारे ‘विश्‍वासू आणि बुद्धीमान दासाची’ नेमणूक पक्की झाली. (मत्त. २४:४५) [uw-MR पृ. ११९ परि. ६]

२९. सर्व ख्रिश्‍चनांनी परंतु विशेषकरून देवाच्या संघटनेत देखरेखीच्या पदावर असलेल्यांनी अनुसरावा तो नियम म्हणजे, “तुम्हा सर्वांमध्ये जो (गर्विष्ठ; महत्त्वपूर्ण; कनिष्ठ) आहे तोच श्रेष्ठ आहे.” (लूक ९:४८) [uw-MR पृ. १२२ परि. १२]

३०. (मत्तय १०, मत्तय २४; लूक २१) यात नमूद केल्यानुसार, येशूने ज्यांना प्रचार करण्यास पाठविले त्यांना सेवेसंबंधी विशिष्ट सूचना दिल्या. [si पृ. १८० परि. ३१]

पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:

नीति. ४:१३; दानी. ७:९, १०, १३, १४; मार्क ७:२०-२३; १३:१०; लूक ८:३१

३१. आपल्या मनात व हृदयात येणारा कोणताही अपवित्र किंवा भ्रष्ट प्रभाव ओळखण्यास व तो मूळ धरण्याआधी त्याचे उच्चाटन करण्यास आपण जागरूक असले पाहिजे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR ५/१/९० पृ. २३ परि. १६.]

३२. मरणप्राय निष्क्रियतेच्या ‘हजार वर्षांच्या’ काळादरम्यान दुरात्मे सैतानाला जाऊन मिळतील. (प्रकटी. २०:३) [साप्ताहिक बायबल वाचन]

३३. मर्यादित समयात, विश्‍वव्यापी साक्षीकार्य पूर्ण करण्यासाठी निकडीची जाणीव राखण्याचा आत्मा आवश्‍यक आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR १०/१/९५ पृ. २७.]

३४. सल्ला स्वीकारल्याने, ज्यामुळे पश्‍चात्ताप करावा लागेल अशा अनेक गोष्टी बोलण्यापासून व करण्यापासून आपला बचाव होईल. [uw-MR पृ. १२८ परि. ६]

३५. आपण आत्मिक प्राण्यांना पाहू शकत नसलो तरी, यहोवाचे वचन त्याच्या अदृश्‍य स्वर्गीय संघटनेचे तसेच पृथ्वीवरील त्याच्या उपासकांवर परिणाम करणाऱ्‍या त्या संघटनेच्या कार्यांचे ओझरते दर्शन देते. [uw-MR पृ. ११७ परि. १]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा