वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०४ पृ. ५-६
  • राज्य सभागृह बांधकाम कार्यक्रमात वृद्धी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • राज्य सभागृह बांधकाम कार्यक्रमात वृद्धी
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • मे सेवा अहवाल
    आमची राज्य सेवा—१९९७
  • उल्लेखनीय वाढीमुळे जलद विस्ताराची आवश्‍यकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • पूर्व युरोपमध्ये सत्य उपासनेची अखंड वृद्धी
    आमची राज्य सेवा—२०००
  • राज्य सभागृह बांधकामाची गरज पूर्ण करणे
    आमची राज्य सेवा—१९९७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ४/०४ पृ. ५-६

राज्य सभागृह बांधकाम कार्यक्रमात वृद्धी

१ “राज्य एकता” या १९८३ साली अमेरिकेत झालेल्या प्रांतीय अधिवेशनांत अशी घोषणा करण्यात आली, की संपूर्ण अमेरिकेत व कॅनडात राज्य सभागृहांच्या बांधकामासाठी व पुनःनिर्माणासाठी एक खास निधी गोळा केला जाईल. अशा लहानशा सुरवातीमुळे इतके मोठे आशीर्वाद मिळतील असा आपण तेव्हा विचार देखील केला नव्हता. स्तोत्र ९२:४ मध्ये जे अगदी उचितपणे म्हटले आहे त्याची प्रचिती या बंधूभगिनींना मिळू लागली जेथे म्हटले आहे: “हे परमेश्‍वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे; तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जयजयकार करितो.” नंतर, या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला; या निधीतील पैशाचा, आफ्रिका, आशिया, मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि पूर्व युरोपसारख्या आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या देशांतील बांधवांना मदत करण्याकरता वापर करण्यात येऊ लागला.

२ जे साध्य केले जात आहे त्याच्याबद्दल आपण सर्वजण आता खूप आनंदी होऊ शकतो. आज, एक विश्‍वव्यापी राज्य सभागृह बांधकाम कार्यक्रम कार्यरत आहे. पण इथे भारतात राहून आपण या कार्यात सहभाग कसा घेऊ शकतो? आपल्या देशातील राज्य सभागृह बांधकाम कार्यक्रमाला देणगी देण्याद्वारे; हा कार्यक्रम सध्या स्थानीय मंडळ्यांकडून येणाऱ्‍या लहान-मोठ्या देणग्यांवर अवलंबून आहे. पुष्कळ बंधूभगिनी अशा प्रकल्पांच्या संबंधाने स्वेच्छेने आपला वेळ, आपल्या क्षमता, आपल्या कौशल्यांचा उपयोग करू शकतात. यामध्ये आपण कितीही देत असलो तरी, आपल्याला ही जाणीव आहे, की संपूर्ण व्यवस्था यहोवाच्या मार्गदर्शनामुळे, पाठिंब्यामुळे आणि आपल्या संयुक्‍त प्रयत्नांवरील त्याच्या समृद्ध आशीर्वादांमुळेच यशस्वी होते.—स्तो. १२७:१.

३ संपूर्ण देशांतील राज्य सभागृहांत, एक दानपेटी आहे ज्यात, राज्य सभागृह निधीसाठी प्रचारक आपल्या देणग्या टाकतात. याशिवाय, अनेक मंडळ्यांनी आपल्या मंडळीच्या निधीतून दर महिन्याला देणगी पाठवण्याचा निश्‍चय केला आहे. काही मंडळ्यांनी आपला पैसा फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्याऐवजी, राज्य सभागृह निधीला पाठवून दिला आहे; त्यांना ही खात्री आहे, की त्यांचा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता असेल तेव्हा त्यांना, केवळ आपल्याच डिपॉझिटचा फायदा होणार नाही तर ज्या मंडळ्यांना सध्या तरी राज्य सभागृह बांधण्याची गरज नाही अशा मंडळ्यांच्या डिपॉझिटचा देखील फायदा होईल.

४ आतापर्यंत या योजनेला कसा प्रतिसाद मिळाला आहे? गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यापासून जेव्हा प्रचारकांना या नव्या व्यवस्थेची जाणीव झाली तेव्हापासून, दोन नवीन राज्य सभागृह बांधून पूर्ण केले जाऊ शकतील इतके डिपॉझिट जमा झाले आहे. ज्या मंडळ्यांना निधीचा फायदा झाला व गरजेनुसार त्यांचा राज्य सभागृह बांधून झाला अशा मंडळ्या देखील नियमितरीत्या देणग्या पाठवत आहेत जेणेकरून इतर मंडळ्यांनाही त्यांच्याप्रमाणे फायदा होईल, हे खरोखरच प्रोत्साहनदायक आहे. स्वतःचा राज्य सभागृह बांधण्याच्या स्थितीत नसलेल्या मंडळ्या आता प्रत्येक महिन्याला देणग्या पाठवू लागल्या आहेत. त्यांना हे ऐकून आनंद वाटेल, की देशात कुठेतरी, राज्य सभागृह तत्काळ बांधण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाऊ शकतो आणि मग, जेव्हा त्यांचा स्वतःचा राज्य सभागृह बांधण्याची उचित वेळ येईल तेव्हा त्यांनाही या निधीचा लाभ मिळेल.

५ इतर राष्ट्रांतील या कार्यक्रमावर यहोवाच्या आशीर्वादाचे पुरावे, बांधून झालेल्या राज्य सभागृहांच्या या चित्रांमधून तुम्हाला दिसून येतील. अशा बांधकामांमुळे, त्या राष्ट्रांतील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर किती जबरदस्त प्रभाव पडला आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता. हे तीन विविध क्षेत्रांच्याबाबतीत खरे आहे—आपल्या विश्‍वव्यापी बंधूसमाजातील ऐक्य, स्थानीय समाजावरील परिणाम आणि मंडळीच्या सभांची वाढलेली उपस्थिती. या पुरवणीत आफ्रिकेतील राज्य सभागृहांविषयी सांगितलेले असले तरी, भारतात राज्य सभागृह बांधकाम कार्यक्रमात प्रगती कशी होत आहे यावर भविष्यात आमची राज्य सेवा यात माहिती येईल अशी आम्ही आशा करतो. तुमच्या मंडळीला या कार्यक्रमाचा फायदा होऊ शकेल का? या कार्यक्रमात होता होईल तितका सहभाग घेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवाचा आशीर्वाद असो.

[[५ पानांवरील चित्र]

बिम्बो, बांगुई

मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक

बगुआ, बांगुई

[[६ पानांवरील चित्र]

उकोंगा, टान्झानिया

सलाला, लाइबीरिया

पेमी, टोगो

सोकोडे, टोगो

करोई, झिम्बाब्वे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा