चिरकालिक भवितव्य संपादन करण्यासाठी कुटुंबांना मदत करणे
१ एका अर्थव्यवस्थापकाने कॉलेजच्या पदवीधर होणाऱ्या वर्गास सांगितले: “लोभ हा श्रेयस्कर असतो, तुम्ही लोभी असूनही आपली मानप्रतिष्ठा राखू शकता.” ही गोष्ट, एखाद्याच्या भवितव्याची खात्री करून घेण्याचा मार्ग म्हणून जग ज्याप्रमाणे स्वहितास बढती देते त्याचाच एक नमुना आहे. याच्या अगदी विपरीत येशूने शिकवले की एखाद्या ख्रिश्चनाने, “स्वतःचा त्याग करावा . . . मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ?” (मत्त. १६:२४-२६) चिरकालिक भवितव्य संपादन करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने देवाची इच्छा पूर्ण करण्यावर आपले संपूर्ण जीवन केंद्रित करण्यास हवे जे आजच्या कुटुंबांकरता सर्वात महत्त्वपूर्ण असे ध्येय आहे. (स्तोत्र १४३:१०; १ तीम. ४:८) कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य ह्या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायात हा संदेश ध्वनित करण्यात आला आहे. जीवनात सर्वात महत्त्वपूर्ण काय आहे आणि आपल्या कुटुंबांचे हित साधण्याकरता लोक काय करू शकतात, ह्या दिशेने विचार करण्यास हे नवीन प्रकाशन लोकांना मदत करते. सातत्याने सर्वत्र सुवार्तेचा प्रचार करत असताना आपण ज्यांना भेटतो त्यांना कौटुंबिक सौख्यानंद हे पुस्तक वाचण्यास प्रेरणा मिळावी याकरता आपण काय म्हणू शकतो? येथे काही सूचना दिल्या आहेत:
२ दारावर तसेच रस्त्यावर, “कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा” ही पत्रिका वापरण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. तुम्ही असे विचारू शकता:
▪ “हल्ली आपलं जीवन चिंतेनं किती ग्रासलेलं आहे हे लक्षात घेता, एक खरोखर आनंदी कौटुंबिक जीवन शक्य आहे असं तुम्हाला वाटतं का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] ही पत्रिका आपल्याला खात्री देते, की हे शक्य आहे. तुम्हाला वाचण्यास आवडेल का?” ती स्वीकारल्यास तुम्ही पुढे असे म्हणू शकता: “तुम्हाला हा विषय आवडला त्याअर्थी कौटुंबिक वर्तुळात आनंद कसा मिळवावा यावर विस्तृत सल्ला देणारं हे पुस्तकही तुम्हाला आवडेल.” कौटुंबिक सौख्यानंद ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका दाखवा. काही लक्षवेधक अध्यायांची शीर्षके दाखवा. पृष्ठ १० उघडा व परिच्छेद १७ च्या शेवटच्या वाक्यापासून ते परिच्छेद १८ पर्यंत वाचा. पुस्तक सादर करा. सांगण्यासारखे आणखी पुष्कळ काही तुमच्याजवळ आहे असे सांगा तसेच पुन्हा त्यांची भेट केव्हा घेता येईल याविषयी विचारणा करा.
३ आनंदी कौटुंबिक जीवनाविषयीचे तुमचे प्रारंभिक संभाषण, असे म्हणून तुम्ही पुढे चालू ठेवू शकता:
▪ “तुम्ही घेतलेल्या पुस्तकातून, माझ्या मते तुम्हाला आवडेल असं काही मी तुम्हाला दाखवू इच्छितो. शेवटचा अध्याय, कौटुंबिक सौख्यानंदांच्या खऱ्या रहस्यावर भर देतो. [पृष्ठ १८३ वरील परिच्छेद २ वाचा.] इथं दाखवल्याप्रमाणे, कुटुंब या नात्याने एकत्रितरित्या देवाच्या इच्छेप्रमाणे करणे हीच त्याची गुरुकिल्ली आहे. देवाची इच्छा काय आहे व आपल्या कुटुंबात ती कशी पूर्ण करावी यासाठी कुटुंबांनी एकत्र मिळून बायबलचा अभ्यास करावा असा सल्ला आम्ही त्यांना देत आहोत. केवळ काही महिन्यांतच पूर्ण होईल असा एक मोफत बायबल अभ्यासक्रम आम्ही देत असतो. तुमची इच्छा असल्यास तो कसा चालवला जातो हे मी तुम्हाला दाखवू इच्छितो.” देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक अथवा ज्ञान पुस्तक, यांपैकी जे कोणते उचित असेल त्यासह पुन्हा भेट द्या.
४ शाळेत वर्गसोबत्यांशी बोलताना अथवा क्षेत्रांत तरुणांशी बोलताना तुम्ही असा एक प्रश्न विचारून प्रतिसाद मिळवू शकता:
▪ “पालक व मुलं यांनी एकमेकांमध्ये खुलं दळणवळण राखणं किती महत्त्वाचं आहे? [प्रतिसादासाठी वाव द्या.] कौटुंबिक जीवनावरील हे लहान पुस्तक, ‘प्रामाणिक आणि खुले दळणवळण’ याविषयी काय म्हणते ते पाहा. [कौटुंबिक सौख्यानंद या पुस्तकात पृष्ठ ६५ वरील परिच्छेद ४ संपूर्ण वाचा आणि परिच्छेद ५ चे पहिले वाक्यही वाचा.] कुटुंबातील दळणवळण कसे सुधारावे यावर पुढील परिच्छेद व्यावहारिक सूचना देतात. ह्या पुस्तकाचं शीर्षक आहे कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य. तू याची एक प्रत घेऊन वाचावी अशी माझी इच्छा आहे.” ते वाचून त्याला कसं वाटलं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पुन्हा भेट घ्याल असं त्याला सांगा.
५ पालक-मूल यांच्यातील दळणवळण यावर एखाद्या युवकाबरोबरील तुमचे प्रारंभिक संभाषण, असे म्हणून तुम्ही पुढे चालू ठेवू शकता:
▪ “कुटुंबात चांगले दळणवळण राखण्याच्या महत्त्वाविषयी तुला आवड आहे हे पाहून मला आनंद वाटला. तुला काय वाटतं, पालक आणि मुलांनी चर्चा करावी, असा सर्वात महत्त्वपूर्ण विषय कोणता आहे?” प्रतिसादासाठी वाव द्या. मग कौटुंबिक सौख्यानंद ह्या पुस्तकात पृष्ठ ६८ उघडा आणि परिच्छेद ११ च्या सुरवातीच्या भागात दिलेले याचे उत्तर वाचा. “साप्ताहिक बायबल अभ्यास हा देवाचे ज्ञान संपादण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग होय.” देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक सादर करा. यातील १६ धडे बायबलच्या संदेशाची एक मूळ रुपरेषा प्रदान करतात याचे स्पष्टीकरण द्या. पृष्ठ २ वरील प्रस्तावना वाचा आणि मग, एकत्र मिळून पहिल्या धड्याची चर्चा करा.
६ घरोघरच्या कार्यात किंवा कदाचित बागेत अथवा प्लेग्राउन्डवर कोणा पालकाशी तुमची गाठ पडल्यास त्यांची आस्था वाढवण्यासाठी तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “तुम्ही हे मान्य कराल, की हल्ली मुलांना वाढवणं खूपच कठीण होत चाललंय. तुम्हाला काय वाटतं, कोणती गोष्ट वाईट परिणामांपासून तुमच्या मुलांचं संरक्षण करू शकेल? [प्रतिसादासाठी वाव द्या.] येथील एक मुद्दा मला देखील खूप आवडला.” कौटुंबिक सौख्यानंद ह्या पुस्तकाच्या पृष्ठ ९० वरील परिच्छेद १ मध्ये दिलेले उदाहरण सांगा आणि परिच्छेद २ वाचा. विध्वंसक परिणामांपासून कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी हे पुस्तक परिणामकारक संतुलित मार्गदर्शन कसे देते याचे स्पष्टीकरण द्या. पुस्तक सादर करा आणि उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याची तयारी दाखवा.
७ ज्या पालकाने “कौटुंबिक सौख्यानंद” हे पुस्तक स्वीकारले होते त्याना दुसऱ्यांदा भेट देताना तुम्ही आपले संभाषण अशाप्रकारे जारी ठेवू शकता:
▪ “आपल्या पहिल्या भेटीत मी हे पाहिलं, की तुम्हाला तुमच्या मुलांची खरोखर काळजी आहे आणि वाईट परिणामांपासून त्यांचं संरक्षण करण्यास तुम्ही इच्छुक आहात. तुम्ही कदाचित अजून वाचलं नसेल, पण मी तुम्हाला देऊन गेलेल्या पुस्तकात एक खूपच महत्त्वपूर्ण गोष्ट दाखवलेली आहे. [पृष्ठ ५९ वरील परिच्छेद १९ वाचा.] देवासोबत नातेसंबंध जोडण्यात त्याचे वचन, बायबल याद्वारे देवाला जाणून घेणं अंतर्भूत आहे. तुमची इच्छा असल्यास, कुटुंब या नात्याने आम्ही बायबलचा अभ्यास कसा करतो हे मी तुम्हाला दाखवू शकतो का?”
८ जगिक सल्लागार कुटुंबांना सौख्यानंदाचा मार्ग दाखवू शकत नाहीत उलट त्यांना निराश करतात. कौटुंबिक सौख्यानंद ह्या पुस्तकाचे आपण विस्तृत प्रमाणात वितरण करू जेणेकरून सर्वत्र, देवाच्या वचनामार्फत एक चिरकालिक भवितव्य संपादन करण्यास लोकांना मदत मिळेल.—१ तीम. ६:१९.