कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य इतरांना देऊ करणे
१ कुटुंब ही मानवी समाजाची एक आधारभूत संस्था असून तिच्यातूनच गावांचा, शहरांचा, राज्यांचा, इतकेच काय तर अख्ख्या राष्ट्रांचा देखील उगम होतो. आज कुटुंब संस्था एका अभूतपूर्व प्रमाणात दबावाखाली आहे. अनेक शक्तिशाली प्रभाव कार्यरत असून कौटुंबिक जीवनाच्या मूळ अस्तित्वालाच ते धोका पोहंचवत आहेत. आपणास कौटुंबिक सौख्यानंद प्राप्त व्हावे म्हणून कुटुंब व्यवस्थेचा रचनाकार, यहोवा याने आपल्याला सूचना पुरवल्या आहेत यासाठी आपण त्याचे किती कृतज्ञ आहोत बरे! त्याच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करणाऱ्यांना हे सत्य कळून चुकले आहे, की त्यामुळे त्यांच्या समस्या कमी होऊन, परिणामी एक यशस्वी कुटुंब संस्था जन्माला येते. सप्टेंबर महिन्यात, कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक इतरांना वाटण्याचा एक विशेषाधिकार आपल्याला आहे. कौटुंबिक जीवनाच्या विषयावर लोकांसोबत संवाद करण्यासाठी पुढाकार घ्या. मैत्रीपूर्ण, विधायक तसेच सूक्ष्मदर्शी असा. तुम्ही काय म्हणू शकता बरे?
२ तुम्ही एखादा प्रश्न विचारून सुरू करू शकता, उदाहरणार्थ:
◼ “आज अनेक कुटुंबांना जीवनातल्या दबावांना तोंड देणं अत्यंत कठीण होत असल्याचं तुमच्या लक्षात आलं आहे का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] अहवाल दाखवून देतात, की कित्येक लोकांच्या घरातली परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. तुमच्या मते, अधिक स्थिरता व आनंद प्राप्त करण्यासाठी कोणती गोष्ट कुटुंबांची मदत करू शकेल बरं? [प्रतिसादासाठी वाव द्या.] देवानंच जर कुटुंब व्यवस्थेचा पाया रचला आहे तर त्यानंच पुरवलेल्या मार्गदर्शक सुचनांचं परीक्षण करणं समंजसपणाचं असेल असं वाटत नाही का? [वाचा २ तीमथ्य ३:१६, १७.] अशा लाभदायक सूचना कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकात दिलेल्या आहेत.” मग एखाद्या सर्वसामान्य कौटुंबिक समस्येबद्दल त्याला विचारा व ती समस्या हाताळणारा अध्याय दाखवा व पुस्तक सादर करा.
३ पुनर्भेटीत तुम्ही कदाचित पुढीलप्रमाणे म्हणून बायबल अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयाचा पाठपुरावा करू शकता:
◼ “मागच्या वेळी तुम्ही कौटुंबिक जीवनाविषयी जे काही बोललात त्यावर मी विचार केला आहे आणि तुम्हाला आवडेल असे काहीतरी मी तुमच्यासाठी आणलं आहे. [अपेक्षा माहितीपत्रक दाखवा, पृष्ठ १६ उघडा आणि वर दिलेले सहा प्रश्न विचारा.] स्पष्टच आहे, की कुटुंबाच्या आनंदास हातभार लावण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं आपापली भूमिका पार पाडली पाहिजे. तुम्ही थोडासा वेळ देऊ शकलात, तर या माहितीतून तुम्हाला अधिक लाभ कसा होऊ शकतो ते मी दाखवू इच्छितो.” मग पाठ ८ वाचण्यास सुरवात करा.
४ चर्चा सुरू करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे एखाद्या समस्येचा उल्लेख करणे, कदाचित असे म्हणण्याद्वारे:
◼ “अनेक लोक तृप्ती व समाधानाची आस धरून असले तरी असं दिसतं जणू अनेक कुटुंबांच्या वाट्याला अजूनपर्यंत तरी यश आलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं, खरा आनंद मिळवण्यास कोणती गोष्ट त्यांची मदत करील बरं? [प्रतिसादासाठी वाव द्या.] आज कुटुंबांमध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या समस्या दिसून येतील त्याविषयी बायबलनं कितीतरी आधी दाखवून दिलं होतं. [वाचा २ तीमथ्य ३:१-३.] तथापि, ह्या समस्या सोडवण्यासाठी कुटुंबांनी काय करावं व चिरकालिक आनंद कसा प्राप्त करावा हे देखील बायबल सांगतं. त्याची तत्त्वं कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकात दिलेली आहेत.” मग, उचित अध्यायाच्या शेवटी असलेली उजळणी पेटी दाखवा, ती वाचा आणि पुस्तक सादर करा.
५ तुम्ही पुन्हा भेट देता तेव्हा अभ्यास सुरू करण्यासाठी “अपेक्षा” माहितीपत्रकाचा उपयोग करा. तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “कौटुंबिक जीवनाला लागू होणाऱ्या बायबल तत्त्वांचं परीक्षण करण्याची तुमची मनस्वी इच्छा पाहून मला खरोखर खूप आनंद वाटला होता. अनुभव दाखवून देतात, की बायबलमध्ये दिलेला व्यावहारिक सल्ला पाळल्यानं उत्तम परिणाम साध्य होतात. त्याचं कारण या साध्याशा स्पष्टीकरणात दिलेलं आहे.” अपेक्षा माहितीपत्रकातील पहिल्या पाठाचा पहिलाच परिच्छेद वाचा व त्याबरोबरच स्तोत्र १:१-३ किंवा यशया ४८:१७, १८ देखील वाचा. परिस्थिती अनुमती देत असल्यास उर्वरित पाठही विचारात घ्या. पुढील पाठ अभ्यासण्यासाठी तुम्ही पुन्हा याल असे सांगा.
६ अतूट विश्वास बाळगणारे परंतु त्याचवेळी बायबलची मसलत जाणून घेण्याचे महत्त्व न जाणणाऱ्यांसोबत बोलत असताना तुम्ही अशी एक संक्षिप्त प्रस्तुती देऊ शकता:
◼ “लोकांचा धार्मिक विश्वास कोणताही असो, पण बहुतेक लोक मान्य करतात, की आज कुटुंबं अनेक समस्यांना तोंड देत आहेत. काहीजण आपल्या पवित्र ग्रंथांमध्ये यावरील सल्ला शोधतात परंतु दुःखाची गोष्ट अशी, की आज अनेक तरुण लोक असा विचार करतात, की धार्मिक शास्त्रवचनं कालबाह्य झाली आहेत. आपण आपलं जीवन सर्वोत्तम प्रकारे कसं जगू शकतो यावर आपल्या निर्माणकर्त्यानं काही सूचना पुरवल्या असतील असं तुम्हाला वाटतं का? अगदी कौटुंबिक जीवनातसुद्धा, देव आणि धर्म या दोन्हींचा विचार करणं किती महत्त्वपूर्ण आहे हे दाखवणारं एक प्रकाशन माझ्याकडे आहे.” पुस्तक सादर करा.
७ किंवा तुम्ही केवळ असे म्हणू शकता:
◼ “जगभरात कौटुंबिक समस्या सतत वाढत आहेत आणि समाजाचे जबाबदार सदस्य याविषयी अत्यंत चिंतातूर आहेत. आपल्या कुटुंबाच्या हितासाठी विशिष्ट अशी विश्वव्यापी तत्त्वं लागू करण्यास ह्या पुस्तकानं लोकांची मदत केली आहे; त्यामुळं सबंध जगभरात अत्यंत उपयुक्त ठरलेलं हे प्रकाशन तुम्हीही घ्यावं अशी माझी इच्छा आहे. त्यातील विवेचनं कुठल्याही एका विशिष्ट धर्मासाठी किंवा संस्कृतीसाठी नसल्यामुळं तुमची व्यक्तिगत मतं कोणतीही असली तरी मला खात्री आहे, की या पुस्तकात तुम्हाला व्यावहारिक सूचना आढळतील.”
८ देवाच्या वचनात घालून दिलेल्या सूचना पाळून कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य इतरांना वाटण्यात आपण आपल्या परीने होता होईल तितके करू या.—स्तोत्र १९:७-१०.