सर्व वयोगटांतील लोकांना कौटुंबिक सौख्यानंद पुस्तक द्या
१ कॅलिफोर्नियाच्या एका ११ वर्षांच्या मुलाने कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाचे खूप कौतुक केले. त्याने लिहिले: “या पुस्तकासाठी मी तुमचे आभार मानतो आणि मला सर्वांना सांगावंसं वाटतं, की हे पुस्तक जरूर वाचा कारण हे खरंच एक उत्तम पुस्तक आहे. या पुस्तकामुळेच आज आमच्या कुटुंबात शांती आहे, आनंद आहे.” या तरुण मुलाच्या अनुभवाने सर्व वयोगटांतील लोकांना कौटुंबिक सौख्यानंद पुस्तक देण्याचे आपल्याला प्रोत्साहन मिळते. फेब्रुवारी महिन्यात तुम्ही उपयोग करू शकता अशा काही उपयुक्त सूचना पुढे दिलेल्या आहेत:
२ एखादी तरुण व्यक्ती भेटल्यास तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “तुमच्या वयाचे पुष्कळ तरुण आज लग्नाचा विचार करत आहेत. पण या विषयावर विश्वसनीय माहिती तुम्हाला कोठे मिळू शकते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बऱ्याच तरुणांना, आपण हे पाऊल उचलण्यासाठी तयार आहोत किंवा नाही याविषयी खात्री नसते. पण, या विषयावर हे पुस्तक काय म्हणतं हे मी तुला दाखवू इच्छितो.” कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकातले १४ वे पान काढा आणि त्यावरील परिच्छेद ३ वाचा. मग त्या अध्यायातील प्रत्येक उपशीर्षक दाखवा. पुस्तक द्या आणि पुन्हा भेट घेण्याची व्यवस्था करा.
३ पालकांशी बोलताना तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “मुलांचे यशस्वीरित्या संगोपन करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या काही व्यावहारिक, मार्गदर्शक सूचनांची माहिती आज सर्व पालकांना आम्ही देत आहोत. कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकात त्या सूचना दिलेल्या आहेत.” मग पान ५५ उघडा. त्यावरील १० वा परिच्छेद वाचल्यानंतर ११ व्या परिच्छेदात दिलेले अनुवाद ६:६, ७ हे वचन वाचा. मग परिच्छेद १२ ते १६ मधील तिरक्या वळणात दिलेली वाक्ये दाखवा. पुढे असे म्हणा: “या पुस्तकामुळे बऱ्याच जणांना पालक म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आणखी मदत झाली आहे. तुम्हालाही हे पुस्तक वाचण्याची इच्छा असल्यास तुम्ही ते ठेवू शकता.”
४ एखाद्या वयस्कर व्यक्तीशी बोलताना असे म्हणा:
◼ “ही दोन वाक्यं मी तुमच्यासाठी वाचतो आणि मग त्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कृपया मला सांगा.” कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकातील १६९ पानावरील १७ व्या परिच्छेदाची पहिली दोन वाक्ये वाचा. मग त्यांचे मत काय ते विचारा. त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार, पुस्तक सादर करण्याआधी पुस्तकातले आणखीन काही उतारे तुम्ही त्यांच्यासाठी वाचू शकता.
५ कौटुंबिक सौख्यानंद पुस्तक दिले आहे तिथे पुन्हा भेट देताना बायबल अभ्यास सुरू करण्याचे ध्येय राखा. यासाठी अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ८ आणि ज्ञान पुस्तकातील अध्याय १५ पासून सुरू करणे उचित ठरेल. सर्व वयोगटांतील लोकांना आनंदी ख्रिस्ती कौटुंबिक जीवन उभारण्यास मदत करण्याचा आपण प्रयत्न करत राहू.